Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे राशिभविष्य, २१ ऑक्टोबर २०२४ : मकरसह २ राशींनी पैसे उधार देणे टाळा! आरोग्याची काळजी घ्या, वाचा सोमवारचे राशीभविष्य

4

Rashi Bhavishya 21 october 2024 Today Horoscope in Marathi : आज २१ ऑक्टोबर सोमवार असून आठवड्याचा पहिलाच दिवस आहे. त्यामुळे मकरसह काही राशींना सावध राहावे लागणार आहे. तुमच्या खाण्याच्या सवयींबाबत काळजी घ्यावी लागेल. पोटाशी संबंधित समस्या तुम्हाला त्रास देतील. प्रेम जीवनात जगणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहिल. चला जाणून घेऊया मेष ते मीन राशीच्या सर्व 12 राशींसाठी सोमवारचा दिवस कसा आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
आजचे राशिभविष्य, २१ ऑक्टोबर २०२४ : मकरसह २ राशींनी पैसे उधार देणे टाळा! आरोग्याची काळजी घ्या, वाचा सोमवारचे राशीभविष्य

Aaj che Rashi Bhavishya 21 october 2024 :
आज २१ ऑक्टोबर सोमवार असून आठवड्याचा पहिलाच दिवस आहे. त्यामुळे मकरसह काही राशींना सावध राहावे लागणार आहे. तुमच्या खाण्याच्या सवयींबाबत काळजी घ्यावी लागेल. पोटाशी संबंधित समस्या तुम्हाला त्रास देतील. प्रेम जीवनात जगणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहिल. कुटुंबात काही वाद सुरु असतील. नोकरीच्या दिशेने काम करणाऱ्यांना उत्कृष्ट संधी मिळेल. भविष्यात तुम्हाला त्याचा फायदा होईल. कोणाताही निर्णय विचारपूर्वक घ्या. घरात शुभ कार्याची चर्चा होईल. जाणून घेऊया ज्योतिषी चिराग दारुवालांकडून आजचे राशीभविष्य

मेष – आरोग्याची काळजी घ्या

आज स्वत:साठी काही स्वप्न पाहिली असतील ती पूर्ण केलेली पाहाल, ज्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. नोकरीत तुमच्या जबाबदारीने काम करावे लागेल. तुमचे काही काम बिघडू शकते. त्यामुळे प्रमोशन थांबू शकते. तुमच्या खाण्याच्या सवयींबाबत काळजी घ्यावी लागेल. पोटाशी संबंधित समस्या तुम्हाला त्रास देतील. प्रेम जीवनात जगणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहिल. कुटुंबात काही वाद सुरु असतील.
आज भाग्य ८५ टक्के तुमच्या बाजूने असेल. गाईला चपाती खाऊ घाला

वृषभ – व्यवसायात नुकसान

आज पार्टनरशीपमध्ये व्यवसाय केल्यास नुकसान होईल. नवीन मालमत्ता खरेदी करण्यासाठी सक्षम असाल. व्यवसायात प्रगतीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. आर्थिक कारणामुळे कुटुंबात वाद होतील. खूप मेहनत केल्यानंतर रखडलेले पैसे मिळतील. पालकांची सेवा करण्यात वेळ घालवाल.
आज भाग्य ६६ टक्के तुमच्या बाजूने असेल. श्रीकृष्णाला लोणी खडीसाखर अर्पण करा

मिथुन – पैसे मिळतील

आज तुमच्यात नवीन ऊर्जा संचारेल. तुमची रखडलेली कामे पूर्ण करण्यास तयार असाल. सामाजिक कारणांसाठी वेळ काढावा लागेल, त्यात यश मिळेल. एखाद्याला पैसे दिले असतील परत मिळतील. तुम्ही आनंदी असाल.
आज भाग्य ९० टक्के तुमच्या बाजूने असेल. योग आणि प्राणायमचा अभ्यास करा

कर्क – विचारपूर्वक निर्णय घ्या

आज भावाच्या मदतीने काही फायदा होईल. मुलांच्या शिक्षणातील अडथळे दूर करण्यासाठी प्रवास करावा लागेल. नोकरीच्या दिशेने काम करणाऱ्यांना उत्कृष्ट संधी मिळेल. भविष्यात तुम्हाला त्याचा फायदा होईल. कोणाताही निर्णय विचारपूर्वक घ्या. घरात शुभ कार्याची चर्चा होईल.
आज भाग्य ८९ टक्के तुमच्या बाजूने असेल. गायत्री मंत्राचे पठण करा

सिंह – नोकरीत बढती

आज कोणीतरी तुमचे काम बिघडवण्याचा प्रयत्न करेल. नोकरीत बढती मिळू शकते. त्यामुळ शत्रू नुकसान करण्याचा प्रयत्न करतील. मुलांबद्दल चिंतेत असाल. शेजारच्यांशी वाद टाळावे.
आज भाग्य ७१ टक्के तुमच्या बाजूने असेल. पिंपळाच्या झाडावर दूध मिश्रित पाणी अर्पण करा.

कन्या – मतभेद संपतील

आज कामाच्या ठिकाणी आर्थिक लाभ मिळतील. वैवाहिक जीवनात काही तणाव निर्माण होईल. ज्यामुळे डोकेदुखी वाढेल. मालमत्ता खरेदी विक्रीसाठी योग्य वेळ नाही. मुलांच्या विवाहातील अडथळे दूर होतील. भावडांसोबतचे मतभेद आज संपतील. व्यवसायानिमित्त प्रवास करावा लागेल.
आज भाग्य ८४ टक्के तुमच्या बाजूने असेल. गाईला हिरवा चारा खाऊ घाला.

तुळ – आर्थिक स्थिती मजबूत होईल.

आज तुम्हाला पैशांशी संबंधित समस्या सोडवाव्या लागतील. ज्यात तुम्हाला यश मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. उधार दिलेले पैसे आज मिळतील. कुटुंबातील सदस्यांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण कराल. लव्ह लाईफमध्ये तडजोड करावी लागेल. जोडीदारासोबत फिरण्याचा प्लान कराल.
आज भाग्य ८९ टक्के तुमच्या बाजूने असेल. शिवलिंगावर दूध अर्पण करा.

वृश्चिक – वैवाहिक जीवन आनंदी राहिल.

तुमचे आरोग्य काहीसे कमजोर असेल. तुमची शारीरिक क्षमता कमी होईल. आज मेहनत कामाच्या ठिकाणी फळ देईल. ज्याचा फायदा तुम्हाला होईल. परदेशात राहणाऱ्या नातेवाईकांकडून चांगली बातमी ऐकायला मिळणार नाही. सामाजिक क्षेत्रातही तुमचे पद आणि प्रतिष्ठा वाढेल. वैवाहिक जीवन आनंदी राहिल.
आज भाग्य ८६ टक्के तुमच्या बाजूने असेल. पांढरी वस्तू दान करा.

धनु – प्रलंबित कामे पूर्ण होतील

आज तुम्ही परिस्थितीवर सहज मात कराल. कुटुंबातील सदस्यांना पटवून द्याल. व्यावसायिक कारणांसाठी प्रवास करावा लागू शकतो. तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील. तुम्ही विचार खुलेपणाने मांडू शकाल. अधिकारी तुमच्यावर पूर्ण विश्वास दाखवतील. ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल.
आज भाग्य ८२ टक्के तुमच्या बाजूने असेल. शिव चालीसाचे पठण करा

मकर – पैसे उधार देऊ नका.

आज तुमच्या नोकरीतील वातावरण तुमच्या इच्छेनुसार असेल. ज्याचा तुम्हाला फायदा होईल. नवीन काम करणे किंवा कुठेही गुंतवणूक करणे टाळा. ज्यामुळे तुमचे मोठे नुकसान होईल. जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. एखाद्याला पैसे उधार देण्याचा विचार करत असाल तर अजिबात देऊ नका.
आज भाग्य ९३ टक्के तुमच्या बाजूने असेल. वरिष्ठांचा आशीर्वाद घ्या

कुंभ – सांसारिक सुखात वाढ

आज तुमची परिस्थिती अनुकूल असेल. तुम्हाला नवीन स्त्रोतांचा फायदा होईल. कुठेतरी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर दिवस चांगला राहिल. सांसारिक सुखामध्ये वाढ होईल. सामाजिक संवाद वाढेल. त्यामुळे तुमचा आदर वाढेल. धार्मिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय राहाल. विरोधकांपासून सावध राहावे लागेल.
आज भाग्य ८७ टक्के तुमच्या बाजूने असेल. तुळशीला नियमितपणे जल अर्पण करा

मीन – यश मिळेल

आज तुमचे परिश्रम कठोर असतील. ज्यामुळे यश मिळेल. नातेवाईक तुमच्यावर नाराज होतील. मित्रांच्या मदतीने मोठा करार निश्चित कराल. ज्यामुळे व्यवसायाला नवीन चालना मिळेल. कौटुंबिक व्यवसायात सावध राहावे लागेल. कुटुंबातील सदस्यांशी महत्त्वाची चर्चा कराल.
आज भाग्य ८१ टक्के राहिल. गरजू लोकांना तांदूळ दान करा.

कोमल दामुद्रे

लेखकाबद्दलकोमल दामुद्रेकोमल दामुद्रे मागच्या साडेचार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये लिखाण करत आहे. लाईफस्टाइल, टेक, ऑटो, धार्मिक, प्रवास आणि बिझनेस क्षेत्रातील विविध विषयांवर लिखाण. मागच्या दोन वर्षांपासून धार्मिक विषयांवर लिखाण करत आहे. कालनिर्णयमध्ये संपादकीय सहाय्यक. कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक, कालनिर्णय मुख्य एडिशन, कालनिर्णय आरोग्य व कालनिर्णय स्वादिष्ट यावर काम करण्याचा अनुभव. यापूर्वी कोमलने २०१९ मधील लोकसभा निवडणुकांसाठी पीआर म्हणून काम केले. कोमल ला कामाव्यतिरिक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून कविता आणि लेख लिहायला आवडतात. नवीन पुस्तके आणि धार्मिक गोष्टी वाचण्यात अधिक रस…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.