Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे राशिभविष्य, २२ ऑक्टोबर २०२४ : तुळसह २ राशींनी आरोग्याची काळजी घ्या! कामामुळे अस्वस्थ राहाल, वाचा मंगळवारचे राशीभविष्य

6

Rashi Bhavishya 22 october 2024 Today Horoscope in Marathi : आज २२ ऑक्टोबर मंगळवार असून बुध, मिथुन राशीत चंद्राचे संक्रमण होणार आहे. त्यामुळे त्रिपुष्कर योग, रवियोग आणि आर्द्रा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत होईल. ५ राशींसाठी आजचा दिवस लकी असेल. तुमच्या इच्छा पूर्ण करण्याच्या नादात कामाकडे दुर्लक्ष करु नका. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. चला जाणून घेऊया मेष ते मीन राशीच्या सर्व 12 राशींसाठी मंगळवारचा दिवस कसा आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
आजचे राशिभविष्य, २२ ऑक्टोबर २०२४ : तुळसह २ राशींनी आरोग्याची काळजी घ्या! कामामुळे अस्वस्थ राहाल, वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Aaj che Rashi Bhavishya 22 october 2024 :
आज २२ ऑक्टोबर मंगळवार असून बुध, मिथुन राशीत चंद्राचे संक्रमण होणार आहे. त्यामुळे त्रिपुष्कर योग, रवियोग आणि आर्द्रा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत होईल. ५ राशींसाठी आजचा दिवस लकी असेल. तुमच्या इच्छा पूर्ण करण्याच्या नादात कामाकडे दुर्लक्ष करु नका. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. क्षमतेपेक्षा जास्त खर्च केल्याने परिणाम होतील. सहकाऱ्यांच्या अभावामुळे कामावर परिणाम होईल. तुम्हाला कामातुन चांगले उत्पन्न मिळेल. खरेदीसोबतच सुख-सुविधा वाढवण्यासाठी पैसे खर्च होतील. जाणून घेऊया ज्योतिषी चिराग दारुवालांकडून आजचे राशीभविष्य

मेष – कामामुळे अस्वस्थ असाल.

आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक असेल. नोकरदार लोक अतिरिक्त कामामुळे अस्वस्थ असतील. कामात गांभीर्य दाखवा. तुमच्या इच्छा पूर्ण करण्याच्या नादात कामाकडे दुर्लक्ष करु नका. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. क्षमतेपेक्षा जास्त खर्च केल्याने परिणाम होतील.
आज भाग्य ७३ टक्के तुमच्या बाजूने असेल. देवी सरस्वतीची पूजा करा

वृषभ – पैसे खर्च होतील

आजचा दिवस तुमच्यासाठी खूप खर्चिक असेल. अचानक धनलाभ झाल्याने अनावश्यक खर्च करु नका. सामाजिक कार्यात रस घेतल्याने कौटुंबिक प्रतिष्ठा वाढेल. सहकाऱ्यांच्या अभावामुळे कामावर परिणाम होईल. तुम्हाला कामातुन चांगले उत्पन्न मिळेल. खरेदीसोबतच सुख-सुविधा वाढवण्यासाठी पैसे खर्च होतील.
आज भाग्य ६५ टक्के तुमच्या बाजूने असेल. पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा.

मिथुन – मतभेद होतील

आज तुमचा स्वभाव थोडा कोरडा राहिल. हट्टीपणा तुम्हाला सोडावा लागेल. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांमुळे अडचणीत सापडाल. कामाच्या ठिकाणी घाईमुळे नुकसान होईल. इतरांपेक्षा श्रेष्ठपणामुळे अपमान होईल. घरातील वातावरण शांत असेल. काही सदस्यांमध्ये मतभेद होतील, त्यामुळे वाद होऊ शकतात.
आज भाग्य ८८ टक्के तुमच्या बाजूने असेल. भगवान विष्णुची पूजा करा

कर्क – खर्चावर नियंत्रण ठेवा

आज तुम्ही इच्छा नसतानाही वादात सापडाल. तुमच्यावर कोणाकडून तरी टीका होईल. वागण्यात नरमाई आणा. लाभदायक संधीपासून दूर राहाल. आर्थिक दृष्टीकोनातून आजचा दिवस सामान्य राहिल. खर्चावर नियंत्रण ठेवा, अन्यथा बजेट बिघडेल. तब्येत हळूहळू सुधारेल.
आज भाग्य ९१ टक्के तुमच्या बाजूने असेल. भगवान विष्णुची पूजा करा

सिंह – व्यवसायात मंदी येईल

आज तुम्हाला सुख-शांतीचा अनुभव मिळेल. दिवासाच्या सुरुवातीला कामात आळसपणा दाखवाल. आर्थिक दृष्टीकोनातून दिवसाच्या मध्यापर्यंत स्थिती चांगली राहिल. व्यवसायातील मंदीमुळे नफा कमी होईल. नोकरदार लोकांनी चिंता करु नका.
आज भाग्य ८८ टक्के तुमच्या बाजूने असेल. कपाळावर पांढऱ्या चंदनाचा टिळा लावा.

कन्या – पैसे मिळविण्यासाठी मेहनत घ्या.

आज तुमच्या समाधानी स्वभावामुळे मानसिकदृष्ट्या शांत राहाल. तुमच्या निष्काळजीपणामुळे कुटुंबातील सदस्यांकडून ऐकावे लागेल. कामाच्या ठिकाणी सावध राहा. पैसे मिळविण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. कामातून वेळ काढाल. कुटुंबातील वातावरण अशांत होईल.
आज भाग्य ७२ टक्के तुमच्या बाजूने असेल. गणपतीली दुर्वा अर्पण करा

तुळ – आरोग्याची काळजी घ्या

आज तुम्ही काल्पनिक दुनियेत हरवून जाल. तुमचे विचार जितके मोठे असतील तितकी तुमची कृती चांगली राहिल. व्यावसायिक क्षेत्रात कामात विलंब होईल. आर्थिकदृष्ट्या चांगला नफा कमवाल. कुटुंबात जास्त बोलण्यामुळे वातावरण बिघडू शकते. आरोग्यावर खर्च करावा लागेल.
आज भाग्य ६३ टक्के तुमच्या बाजूने असेल. कुत्र्याला चपाती खाऊ घाला

वृश्चिक – अडचणीत सापडाल

आजचा दिवस तुमच्यासाठी अशुभ राहिल. आज कोणतेही काम करायचे ठरवले तर अडथळे येतील. बिझनेसमध्ये चुकांमुळे नुकसान होईल. जुनी कामे करुन काही फायदा होऊ शकतो. नवीन कामे हातात घेऊ नका. तुम्ही अडचणीत सापडाल. मते भिन्न असल्यामुळे समन्वय राखण्यात अडचणी येतील.
आज भाग्य ७१ टक्के तुमच्या बाजूने असेल. शनिदेवाचे दर्शन घेऊन तेल अर्पण करा

धनु – उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल

आज तुम्ही घरगुती कामांमध्ये व्यस्त असाल. नातेवाईकांना भेटायला जाल. तुमच्या कार्यक्षेत्राकडे जास्त लक्ष देता येणार नाही. तुम्हाला नफ्यावर समाधान मानावे लागेल. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होईल. नोकरदार लोकांना चांगली बातमी मिळेल.

आज भाग्य ७८ टक्के तुमच्या बाजूने असेल. कपाळावर चंदनाचा टिळा लावा.

मकर – अनावश्यक खर्च वाढेल.

आजचा दिवस आनंददायी असेल. दिवसाच्या सुरुवातीला थोडा आळस वाढेल. त्यानंतर तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त दिसाल. आजचा वेळ प्रवास करण्यात जाईल. व्यापारी वर्गातील कामे अपूर्ण राहातील. आर्थिक दृष्टीकोनातून समन्वय राहिल. अनावश्यक खर्च वाढेल.
आज भाग्य ८१ टक्के तुमच्या बाजूने राहिल. ब्राह्मणांना दान करा

कुंभ – पैशाची आवक कमी होईल

आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा व्यस्त असेल. इच्छा पूर्ण न झाल्यामुळे निराश होऊ शकता. तुमचे मत मोकळेपणाने व्यक्त करु शकाल. ज्यामुळे तुमचे नाते घट्ट होईल. कुटुंबासोबचा तुमच्यावर विश्वास वाढेल. आर्थिक घडामोडी सुरळीतपणे पार पाडाल. पैशाची आवक कमी होईल.
आज भाग्य ८७ टक्के तुमच्या बाजूने असेल. देवी पार्वतीची पूजा करा

मीन – आरोग्याची काळजी घ्या

आजचा दिवस तुमच्या विरुद्ध असेल. आरोग्याबाबत अधिक काळजी घ्यावी लागेल. निष्काळजीपणामुळे गंभीर परिणाम होतील. शारीरिक आजारामुळे कोणत्याही कामात लक्ष केंद्रित करु शकणार नाही. पोटाशी संबंधित समस्या उद्भवतील. कोणत्याही कामात जबरदस्ती करण्याचा प्रयत्न टाळा. बाहेर फिरण्याचा प्लान कराल
आज भाग्य ८४ टक्के तुमच्या बाजूने असेल. श्रीकृष्णाची पूजा करा

कोमल दामुद्रे

लेखकाबद्दलकोमल दामुद्रेकोमल दामुद्रे मागच्या साडेचार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये लिखाण करत आहे. लाईफस्टाइल, टेक, ऑटो, धार्मिक, प्रवास आणि बिझनेस क्षेत्रातील विविध विषयांवर लिखाण. मागच्या दोन वर्षांपासून धार्मिक विषयांवर लिखाण करत आहे. कालनिर्णयमध्ये संपादकीय सहाय्यक. कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक, कालनिर्णय मुख्य एडिशन, कालनिर्णय आरोग्य व कालनिर्णय स्वादिष्ट यावर काम करण्याचा अनुभव. यापूर्वी कोमलने २०१९ मधील लोकसभा निवडणुकांसाठी पीआर म्हणून काम केले. कोमल ला कामाव्यतिरिक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून कविता आणि लेख लिहायला आवडतात. नवीन पुस्तके आणि धार्मिक गोष्टी वाचण्यात अधिक रस…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.