Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Jagdish Mulik meets Devendra Fadnavis :वडगाव शेरीतून अजित पवार यांनी विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांना ‘एबी’ फॉर्म दिल्याची चर्चा आहे, तर येथून प्रबळ इच्छुक असलेले भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनीही मुंबईत देवेंद्र फडणवीस यांची ‘सागर’ बंगल्यावर भेट घेतली
हायलाइट्स:
- भाजपमध्ये खडकवासला मतदारसंघाच्या उमेदवारीवरून गृहयुद्धाची ठिणगी पडली आहे.
- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत इच्छुक उमेदवारांची बैठक मुंबईत पार पडली.
- भाजपने रविवारी राज्यातील 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली, ज्यात पुण्यातील काही मतदारसंघांचा समावेश आहे.
Shaina NC : वरळीत महायुतीचे चक्रव्यूह, भाजप बड्या नेत्याला ‘धनुष्यबाणा’वर उतरवणार, शिंदे कुटुंबातील सदस्यही सज्ज
खडकवासल्याचे पदाधिकारी मुंबईत
यानंतर मंगळवारी सकाळीच खडकवासल्यातील माजी नगरसेवक आणि पक्ष पदाधिकाऱ्यांनी मुंबई गाठली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर या निवासस्थानी तर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची कार्यालयात भेट घेतली. विद्यमान आमदार किंवा पक्षातील अनुभवी नगरसेवकांपैकी एकाला संधी द्यावी. मात्र, बाहेरच्या उमेदवाराला संधी देऊ नये. तसे झाल्यास पक्षाच्या अस्तित्वावर परिणाम होईल, अशी भूमिका मांडली. बाहेरील उमेदवाराविषयीची ‘माहिती’ही त्यांनी वरिष्ठांच्या कानावर घातली. परंतु,कोणतेही ठोस आश्वासन न देताच त्यांना पुण्यात परतून पक्षाचे काम करण्यास सांगण्यात आले. तर यातील इच्छुकांशी स्वतंत्र संवाद साधून योग्य तो ‘संदेश’ दिला गेल्याचे समजते.
Shiv Sena Candidate List : चौघांची मुलं, कुणाची पत्नी, कुणाचा भाऊ; शिंदेंच्या यादीत घराणेशाहीचं दर्शन, कोणाकोणाला संधी?
बहुजन की ब्राह्मण उमेदवार यावरून कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी रखडल्याची चर्चा आहे. या मतदारसंघातील एका प्रमुख दावेदारानेही मुंबई गाठत वरिष्ठांची भेट घेतली. परंतु, पक्षात जबाबदारीच्या पदावर असलेल्या एका बड्या बांधकाम व्यावसायिकानेही सागर बंगल्यावर जात देवेंद्र फडणवीसांची ‘गुफ्तगू’ केली. त्यामुळे कसब्याच्या उमेदवारीत नवा ‘ट्विस्ट’ येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
Devendra Fadnavis : जगदीश मुळीकांची देवेंद्र फडणवीसांशी भेट, सागर बंगल्यावर खलबतं, अखेर स्टेटसमुळे भुवया उंचावल्या
मुळीकांच्या स्टेटसची चर्चा
भाजपने रविवारी राज्यातील ९९ उमेदवारांची पहिल्या यादी जाहीर केली आहे. त्यात पुण्यातील पर्वती, शिवाजीनगर आणि कोथरूड मतदारसंघांचा समावेश असून, खडकवासला, कँटोन्मेंट आणि कसबा पेठ मतदारसंघात अद्याप उमेदवार दिलेले नाहीत, वडगाव शेरीतून अजित पवार यांनी विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांना ‘एबी’ फॉर्म दिल्याची चर्चा आहे, तर येथून प्रबळ इच्छुक असलेले भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनीही मुंबईत देवेंद्र फडणवीस यांची ‘सागर’ बंगल्यावर भेट घेतली. त्यानंतर त्यांनी लढणार आणि जिंकणार असे स्टेटस समाजमाध्यमांवर ठेवल्याने त्यांना पक्षाने हिरवा कंदील दिल्याचीही चर्चा रंगली आहे.