Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
CM Eknath Shinde Nomination Form : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे २४ ऑक्टोबर रोजी अर्ज भरणार होते. मात्र हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. आता २८ ऑक्टोबरला एकनाथ शिंदे अर्ज भरणार आहेत. सोमवारी त्यांचा अर्ज भरताना महायुतीकडून शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी १४७ कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदार संघासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उमेदवारी अर्ज २४ ऑक्टोबर रोजी भरण्याचे निश्चित करण्यात आले होते. तथापि, महाराष्टातील शिवसेना महायुतीच्या उमेदवारांचे उमेदवारी अर्ज संबंधित विधानसभा क्षेत्रात भरावयाचे असल्याने २४ ऑक्टोबर रोजीचा दिवस रद्द करण्यात आला असून, सोमवार २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता एकनाथ शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी दिली आहे. दरम्यान, काल मंगळवारी रात्री शिवसेना एकनाथ शिंदे गटाची पहिली ४५ जणांची यादी जाहीर करण्यात आली.
वडील जेलमध्ये गेले, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध? अणुशक्तीनगरमधून मिळाले तिकीट मिळालेल्या सना मलिक कोण?
महायुतीचे जोरदार शक्तिप्रदर्शन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोपरी – पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. सकाळी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिवसेनेच्या तीन हात नाका येथील परबवाडी शाखेजवळील जागृती क्रीडा मैदानातून रॅली निघणार आहे. वागळे इस्टेट येथील आयटीआय रोड क्रमांक २८ च्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात शिंदे उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यावेळी शिंदे यांच्या शिवसेनेसह महायुतीचे जिल्ह्यातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे म्हस्के यांनी सांगितले आहे.
लॉरेन्स बिश्नोईची राजकारणात एन्ट्री? या पक्षाकडून महाराष्ट्रात विधानसभा लढण्याची ऑफर
गुरुपुष्यामृत नव्हे आता वसुबारसचा मुहूर्त, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार
लाडक्या भावाची टॅगलाईन
‘चला भगवा फडकवूया, लाडक्या भावाचा फॉर्म भरु या’ अशी टॅगलाईन देत मुख्यमंत्री शिंदे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे बॅनर समाज माध्यमावर व्हायरल होत आहेत. या बॅनरवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांची छबी झळकवण्यात आली आहे.