Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Shiv Sena UBT Candidate List: शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत ६५ जणांच्या नावांचा समावेश आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी शिंदे यांचे राजकीय गुरु आणि शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना तिकीट दिलं आहे. शिंदे ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून निवडून येतात. तिथे त्यांच्यासमोर केदार दिघेंना उमेदवारी देण्यात आलेली आहे. मंत्री दीपक केसरकर यांच्याविरोधात सावंतवाडीतून राजन तेली यांना तिकीट देण्यात आलेलं आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी भाजपची साथ सोडत ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
Aaditya Thackeray: वरळीत हायप्रोफाईल फाईट, आदित्य ठाकरेंसमोर मराठी अभिनेत्याचं आव्हान? CMच्या निर्णयाकडे लक्ष
रत्नागिरीतून निवडून येणाऱ्या आणि उद्योग मंत्री असलेल्या उदय सामंत यांच्याविरोधात ठाकरेंनी उमेदवारी दिलेली आहे. माने यांचाही पक्षप्रवेश काही दिवसांपूर्वीच झालेला आहे. तेदेखील आधी भाजपमध्ये होते. सिल्लोडमध्ये मंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात सुरेश बनकर यांना तिकीट देण्यात आलेलं आहे. बनकर यांनी गेल्याच आठवड्यात हाती शिवबंधन बांधलं. तेली, माने यांच्याप्रमाणेच बनकरदेखील आधी भाजपमध्ये होते.
Shiv Sena UBT Candidate List: ठाकरेसेनेकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात हुकमी एक्का मैदानात
मालेगाव बाह्यमधून ठाकरेंनी अद्वय हिरेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केलं आहे. ते मंत्री दादा भुसेंच्या विरोधात लढतील. अद्वय हिरे यांनी जून २०२३ मध्ये भाजप सोडून ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. मंत्री तानाजी सावंत यांच्या विरोधात राहुल पाटील यांना तिकीट देण्यात आलेलं आहे. ते परांड्यातून निवडणूक लढतील.
Shiv Sena UBT Candidate List: शिंदेंच्या मंत्र्यांविरोधात ठाकरेंचे शिलेदार; बहुतांश जणांमागे ‘भाजप फॅक्टर’; पाहा पूर्ण यादी
मंत्री शंभुराज देसाई यांच्याविरोधात पाटणमधून हर्षद कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ते ठाकरेसेनेचे जिल्हाप्रमुख आहेत. मंत्री गुलाबराव पाटील आणि संजय राठोड यांच्याविरोधात ठाकरेंनी अद्याप तरी उमेदवार दिलेले नाहीत. जळगाव ग्रामीण, दिग्रसमधून ठाकरेंनी उमेदवार दिलेले नाहीत. त्यांच्याविरोधात दुसऱ्या यादीत उमेदवार दिले जाऊ शकतात.