Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आचारसंहितेच्या तक्रारी ‘सी-व्हिजिल’वर नोंदवा; प्रशासनाचे आवाहन, टोल फ्री क्रमांकही उपलब्ध

7

Chhatrapati Sambhajinagar News: आचारसंहितेचा भंग होत असेल तर नागरिकांनी प्रशासनास तत्काळ माहिती द्यावी, यासाठी १९५० हा टोल फ्री क्रमांकही देण्यात आला आहे.

महाराष्ट्र टाइम्स
sambhajinagar municipality

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता जोमाने सुरू झाली आहे. त्यामुळे निवडणूक आचारसंहिता कक्षही अलर्ट मोडवर आले आहे. या काळात आदर्श आचारसंहितेचे भंग झाल्यास सी-व्हिजिल अपवर; तसेच १९५० या टोल फ्री नंबरवर नागरिकांनी तक्रार करावी, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके यांनी केले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने १५ ऑक्टोबर रोजी निवडणुकीची घोषणा केली असून, तेव्हापासून आदर्श आचासंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेचा भंग होत असेल तर नागरिकांनी प्रशासनास तत्काळ माहिती द्यावी, यासाठी १९५० हा टोल फ्री क्रमांकही देण्यात आला आहे. यासह सी व्हिजिल या अॅपच्या माध्यमातून आचारसंहिता भंगाच्या तक्रारी प्रशासनापर्यंत पोहोचवू शकतात, अशी माहिती कटके यांनी दिली. दरम्यान, जिल्ह्यात ९९ स्थिर सर्वेक्षण पथके, ११८ फिरते पथक, ४६ व्हिडिओग्राफी पथक, १३ व्हिडिओ फुटेज तपासणी पथक कार्यान्वित असून महत्त्वाच्या ठिकाणी चेकपोस्ट नाके आहेत.

‘पैशांचा गैरवापर प्राप्तिकर विभागाला कळवा’
विधानसभा निवडणूक २०२४ च्या दरम्यान काळ्या पैशाचा वापर रोखण्यासाठी प्राप्तिकर विभाग अलर्ट मोडवर आला आहे. निवडणूकीत रोख रकमेचा वापर, वाटप, रकमेची वाहतुक अशा बाबतीत नागरिकांनी विभागाला माहिती द्यावी, माहिती देणाऱ्याची ओळख गुप्त ठेवण्यात येईल, असेही विभागाने पत्रकाद्वारे नमूद केले. ही माहिती टोल फ्री क्रमांक १८००-२३३-०३५५, १८००-२३३-०३५६ वर माहिती द्यावी तसेच ९४०३३९०९८० या व्हॉट्सअॅप क्रमांकावर उपलब्ध असलेली छायाचित्रे, व्हिडीओ पाठवावीत, तसेच nagpur addidit.inv@incometax.gov.in व nashik addidit.inv@incometax.gov.in या इमेलवरही माहिती देऊ शकता. माहिती देणाऱ्या व्यक्तिचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे जिल्हा अग्रणी व्यवस्थापक मंगेश केदार यांनी नमूद केले.
दिवाळीची सुट्टी, जायचे कोणत्या मामाच्या घरी? लाडक्या भाच्यांबाबत नेटकऱ्यांना प्रश्न; सोशल मीडियावर गमतीदार Post Viral
आचारसंहिता अंमलबजावणीसाठी नियुक्त भरारी पथके, स्थिर पथके, व्हिडिओ पथके नियुक्त करण्यात आलेली आहे. त्याद्वारे करडी नजर ठेवली जात आहे. आचारसंहितेचे कुठे भंग होत असेल तर नागरिकांनी सी-व्हिजिल अॅपवर; तसेच १९५० या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करू शकतात. नागरिकांनी या सुविधांचा वापर करावा. – देवेंद्र कटके, उपजिल्हा निवडणूक अधिकारी

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.