Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
NCP SP Candidate List: शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं विधानसभा निवडणुकीसाठी ४५ जणांच्या नावाची पहिली यादी जाहीर केली आहे. बारामतीमधून अजित पवारांविरोधात युगेंद्र पवारांनी तिकीट देण्यात आलेलं आहे.
शरद पवारांचे निष्ठावंत मानले जाणाऱ्या शशिकांत शिंदेंना साताऱ्याच्या कोरेगावातून उमेदवारी जाहीर झालेली आहे. २०१९ मध्ये शिंदे यांचा अटीतटीच्या लढतीत पराभव झाला. शिवसेनेच्या महेश शिंदे यांनी त्यांना पराभूत केलं. त्यावेळी विधानसभा निवडणुकीसोबतच सातारा लोकसभेसाठीही पोटनिवडणूक झाली होती. राष्ट्रवादीकडून २०१९ मध्ये लोकसभेवर निवडून गेलेल्या उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसोबतच सातारा लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली.
NCP SP Candidate List: शरद पवारांच्या पक्षाकडून पहिली उमेदवार यादी जाहीर; अजित पवारांविरोधात शिलेदार ठरला
राज्यात भाजप-शिवसेनेचं वातावरण असताना त्यावेळी शरद पवारांनी त्यांचे मित्र श्रीनिवास पाटील यांना साताऱ्यातून उमेदवारी दिली. त्यांच्या प्रचारासाठी पवारांनी सभा घेतली. त्यावेळी पाऊस आला. पवारांनी भरपावसात भाषण केलं आणि प्रचाराचा नूर पालटला. पाटील यांनी साताऱ्याची जागा जिंकली. उदयनराजे भोसलेंना मोठा धक्का बसला. पण त्याचवेळी विधानसभा निवडणुकीत कोरेगावात शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला. साताऱ्याचा गड आला, पण सिंह गेला, अशी पवारांची भावना होती. त्यामुळे त्यांनी सेलिब्रेशन टाळलं.
NCP SP Candidate List: पवारांची उमेदवार यादी आली; दादांच्या २ मंत्र्यांविरोधात ‘तुतारी वाजवणारा माणूस’ नाही
शशिकांत शिंदे यांना पवारांनी २०२० मध्ये विधान परिषदेवर संधी दिली. ते आमदार झाले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पवारांनी शिंदे यांना साताऱ्यातून उमेदवारी दिली. त्यांच्यासमोर भाजपच्या उदयनराजे भोसलेंचं आव्हान होतं. शिंदे तुतारी चिन्हावर लढले. पण तुतारीशी साधर्म्य असलेल्या चिन्हावर लढलेल्या अपक्ष उमेदवारानं ३७ हजार मतं घेतली. शिंदे यांचा ३२ हजार ७७१ मतांनी पराभव झाला.
NCP SP Candidate List: गड आला पण..; ज्याच्या पराभवानं हळहळले शरद पवार, तो निष्ठावंत शिलेदार पुन्हा निवडणूक रिंगणात
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून शरद पवारांनी सातारा लोकसभेची जागा कधीही गमावलेली नव्हती. पण २०२४ मध्ये तुतारी-पिपाणीच्या गोंधळामुळे मतविभाजन झालं. त्यामुळे सातारची जागा गेली. १० पैकी ८ जागा पक्षानं जिंकल्या. पण साताऱ्यातील शिंदेंचा पराभव पवारांच्या जिव्हारी लागला. त्यातही तिथे शरद पवारांच्या निष्ठावंताचा पराभव झाला. आता पवारांनी त्यांच्या शिलेदाराला पुन्हा विधानसभेची उमेदवारी दिली आहे. २००९ आणि २०१४ मध्ये शिंदे कोरेगावातून निवडून आले होते. त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचं आव्हान त्यांच्यासमोर असेल.