Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आर्थिक राशिभविष्य 26 ऑक्टोबर 2024: या राशींसाठी शनिवार भाग्यवान ! भेटवस्तू मिळतील, धनलाभाचा योग ! पाहा, तुमचे राशिभविष्य

9

Finance Horoscope Today 26 October 2024 In Marathi : 26 ऑक्टोबर, मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम असून प्रत्येक कामात नशिबाची उत्तम साथ मिळणार आहे. वृषभ राशीच्या लोकांना समस्या आणि अडचणींचा सामना करावा लागेल. कर्क राशीची अपूर्ण कामे पूर्ण होतील. कन्या राशीला व्यवसायात नफा आहे पण खर्च जास्त होणार आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनी तब्येतीची काळजी घ्या तसेच अचानक काही कारणामुळे खर्च वाढण्याची शक्यता आहे. कुंभ राशीच्या लोकांनी नवीन योजनांकडे लक्ष द्यावे तर मीन राशीला समस्या आणि अडचणींचा सामना करावा लागू शकतो. चला तर करिअर आणि आर्थिक बाबतीत आजचा दिवस कसा असेल ते पाहूया.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
आर्थिक राशिभविष्य 26 ऑक्टोबर 2024: या राशींसाठी शनिवार भाग्यवान ! भेटवस्तू मिळतील, धनलाभाचा योग ! पाहा, तुमचे राशिभविष्य

Aaj che Aarthik Rashi Bhavishya 26 October 2024 : 26 ऑक्टोबर, मेष, मिथुन, सिंहसह या राशींसाठी दिवस उत्तम आहे. कामे मार्गी लागतील, आर्थिक स्थिती उत्तम असेल. ताणतणाव कमी होईल, अगदी मौल्यवान वस्तू देखील मिळतील. वृषभसह या राशींसाठी दिवस अडचणींनी भरलेला आहे. तब्येतीची काळजी घ्या तसेच अचानक खर्च देखील वाढतील. चला तर पाहूया करिअर आणि आर्थिक बाबतीत मेष ते मीन राशीपर्यंतच्या सर्व राशींसाठी आर्थिक कुंडली काय म्हणते आहे, जाणून घेऊया.

मेष आर्थिक राशिभविष्य : प्रगतीचे नवीन मार्ग खुले होणार

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम असून प्रत्येक कामात नशिबाची उत्तम साथ मिळणार आहे. तुमच्यासाठी प्रगतीचे नवीन मार्ग खुले होत आहेत, त्याचा लाभ घ्या. संध्याकाळी धार्मिक कार्यात सहभाग घ्याल यामुळे ताणतणाव कमी होईल. तुम्ही व्यवसाय करत असाल तर नवीन बदल करण्यासाठी काळ उत्तम आहे. व्यवसायात नफा आहे तेव्हा आर्थिक स्थिती उत्तम आहे.

वृषभ आर्थिक राशिभविष्य : समस्या आणि अडचणींचा सामना

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फारसा ठिक नाही. कामात अडचण आणि घरात त्रास याचा सामना करावा लागेल. भौतिक सुख कमी होणार असून वाद वाढण्याची शक्यता आहे. संध्याकाळी समस्येत सापडू शकता तेव्हा सावध राहा आणि कामे करा. व्यवसायात काही अडचणी येतील सतर्क राहा. ऑफिसमध्ये सहकारी मदत करतील तसेच आज मित्रांची उत्तम साथ मिळेल.

मिथुन आर्थिक राशिभविष्य : करिअरच्या बाबतीत भाग्यवान आहात

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभलाभाचा असून करिअरच्या बाबतीत तुम्ही लकी आहात. अपूर्ण राहीलेली किंवा काही कारणाने रखडलेली कामे पूर्ण होणार आहेत. एखाद्या कामात गुंतवणूक करायची असेल तर वेळ उत्तम आहे. कुटुंबासोबत थोडी नाराजी मनमुटाव राहू शकतो. संध्याकाळी वाहन खराब झाल्यामुळे खर्च वाढण्याची शक्यता आहे. कोणतेही काम घाई घाईत करू नका ते व्यवस्थित पूर्ण होणार नाही.

कर्क आर्थिक राशिभविष्य : राहिलेली कामे पूर्ण होणार

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असून तुमची राहिलेली कामे तुम्ही पूर्ण करणार आहात. भौतिक सुख-सुविधांमध्ये वाढ असून आज सगळ्या समस्यांवर तोडगा सापडेल. ऑफिसमध्ये तुमचे कौतुक होईल. इतरांच्या दोषांवर दुर्लक्ष करा, कारण तुम्ही लक्ष दिले तर तुमचा वेळ वाया जाईल. व्यवसायात दिवस चांगला असून शुभलाभ आहे.

सिंह आर्थिक राशिभविष्य : मौल्यवान वस्तू मिळणार

सिंह राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. मौल्यवान वस्तू मिळणार आहे. सुखासाठी पैसे खर्च कराल तसेच घरातल्यांसाठी गिफ्ट खरेदी कराल. आज तुम्ही गरजवंतांना मदत करणार आहात. तुमच्या बोलण्याने सगळे प्रभावी होतील आणि कामे पटापट मार्गी लागतील. धार्मिक कार्यात अधिक रुची घेणार असून दानधर्म करणार आहात. कार्यक्षेत्रात दिवस चांगला असेल.

कन्या आर्थिक राशिभविष्य : व्यवसायात नफा, खर्च जास्त होणार

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस यश आणि सुख समाधानाने भरलेला आहे. व्यवसायात अपेक्षित नफा झाल्यामुळे तुम्ही आनंदी असाल. तुमच्या प्रतिष्ठेत वाढ होणार असून ऑफिसमध्ये कौतुक होईल. अनावश्यक खर्च होवू शकतात, तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी ते टाळता येणार नाही. मन समाधानी असेल आणि ताणतणाव फारसा नसेल. कुटुंबासोबत दिवस चांगल्याप्रकारे व्यतीत होणार आहे.

तुळ आर्थिक राशिभविष्य : ऑफिसमध्ये सहकारी मदत करतील

तुळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असून दिवसभर तुम्ही व्यस्त राहणार आहात. तुम्हाला ऑफिसच्या कामात मदत मिळाल्यामुळे कामे पटकन होतील. घरात तुमची काही कामे बाकी आहेत त्यासाठी घरातील सदस्यांची मदत मिळेल आणि ती कामे देखील मार्गी लागतील. घरात वातावरण आनंदी असेल, एखादा सदस्य चांगली बातमी देईल. नोकरीमध्ये अधिकारांसह जबाबदारी वाढेल. तुम्ही आखलेल्या योजना यशस्वी होणार आहेत.

वृश्चिक आर्थिक राशिभविष्य : तब्येतीची काळजी घ्या, खर्च वाढण्याची शक्यता

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ठिक आहे. काही कारणामुळे तब्येत बिघडू शकते. अनावश्यक खर्च डोके वर काढणार आहेत त्यामुळे चिडचिड होईल. संध्याकाळी कुटुंबासोबत मंगलकार्यात सहभागी होणार आहात. व्यवसायात कामे वाढणार आहेत नियोजनाकडे कटाक्षाने लक्ष द्या.

धनू आर्थिक राशिभविष्य : ऑफिसच्या कामात यश

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभलाभाचा आहे. तुम्हाला ऑफिसच्या कामात यश मिळेल. नशिबाची साथ मिळाल्यामुळे कामे मार्गी लागतील. तुमचे पेंडीग पेमेंट मिळाल्यामुळे तुम्ही आनंदी असाल. कामे वाढणार त्यामुळे तुम्हाला ताण येणे सहाजीक आहे पण तब्येत सांभाळा. आहाराकडे लक्ष द्या. प्रवासाचा योग आहे आणि त्यातून भविष्यात लाभ मिळणार आहे.

मकर आर्थिक राशिभविष्य : व्यवसायात प्रगती, निर्णय क्षमतेचे कौतुक

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभलाभाचा आहे. व्यवसायात प्रगती असून तुम्ही केलेले नवीन बदल लाभदायक असतील.तुमच्या निर्णय क्षमेतेचे ऑफिसमध्ये कौतुक होईल. कोणता वाद सुरु असेल तर तोडगा निघेल. धनलाभाचा योग असून धार्मिक कार्यात अधिक रूची घेणार आहात. दानधर्म कराल त्यामुळे समाधान मिळेल.

कुंभ आर्थिक राशिभविष्य : नवीन योजनांकडे लक्ष द्या

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असून नवीन योजनांकडे लक्ष द्याल. आध्यात्मिक आणि चांगल्या कार्यात रूची वाढणार आहे. ज्येष्ठ व्यक्तींच्या आशिर्वादामुळे कार्यात यश आहे. संध्याकाळी कुटुंबासोबत मंगलकार्यात जाणार आहात. कार्यक्षेत्रात कामे मार्गी लागतील.

मीन आर्थिक राशिभविष्य : समस्या आणि अडचणींचा सामना करा

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फारसा ठिक नाही. समस्या आणि अडचणींचा सामना करावा लागेल. मानसिक अशांतता, उदासिनता यामुळे तुम्ही त्रस्त असाल. तुमची पदोन्नती थांबलेली असेल तर ती होईल. घरी कोणत्यातरी कारणामुळे ताणतणाव असेल. तुमच्या वाणीने तुम्ही सगळ्यांची मने जिंकाल. पाहुणे अचानक येणार आहेत त्यामुळे त्रास वाढण्याची शक्यता आहे.

अनिता किंदळेकर

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.