Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
आजचे अंकभविष्य, 26 ऑक्टोबर 2024: भागिदारीतील व्यवसायासाठी वेळ उत्तम ! सरकारी कामे करताना दस्तऐवज तपासा ! जाणून घ्या, अंकशास्त्रानुसार तुमचे राशीभविष्य
Numerology Prediction, 26 October 2024 : 26 ऑक्टोबर, शनिवार, मूलांक 1 असलेल्यांसाठी आजचा दिवस चांगला असून तुम्हाला सकारात्मक अनुभव येणार आहे. मूलांक 2 चा मान-सन्मान वाढणार असून धनप्राप्तीचे योग आहेत. मूलांक 4 चे लोक सरकारी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे तेव्हा सतर्क राहा. मूलांक 6 साठी भागिदारीतील व्यवसायासाठी वेळ उत्तम आहे. मूलांक 8 च्या लोकांचा मानसिक तणाव वाढण्याची शक्यता आहे. मूलांक 9 असणाऱ्यांनी रागावर नियंत्रण ठेवावे, भावंडांसोबत वाद होण्याची शक्यता आहे. मूलांक 1 ते 9 साठी आजचा दिवस कसा आहे? तुमचा मूलांक काय सांगतो?
मूलांक 1 – रागावर नियंत्रण ठेवा
मूलांक 1 असलेल्यांसाठी आजचा दिवस चांगला असून तुम्हाला सकारात्मक अनुभव येणार आहे. जिथे गरज आहे तिथे बोला अन्यथा वादविवाद होवू शकतात. सरकारी अधिकाऱ्यांसोबत संबंध चांगले होतील, त्याचा भविष्यात फायदा होईल. रागावर नियंत्रण ठेवा. आज सूर्याला जल अर्पण करून दिवसाची सुरुवात करा, म्हणजे कामे पटापट मार्गी लागतील.
मूलांक 2 – मान-सन्मानात वाढ, धनप्राप्तीचा योग
मूलांक 2 असणाऱ्या जातकांसाठी आजचा दिवस उत्साह वाढविणारा आहे. तुमचा मान सन्मान होणार असून धनप्राप्तीचे योग आहेत. गुंतवणुकीसाठीचा दिवस उत्तम आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांसोबत संबंध अधिक दृढ होतील. तब्येतीची काळजी घ्या, जर रक्तासंदर्भात काही आजार असतील तर लक्ष द्यायला हवे, आज त्रास होण्याची शक्यता आहे.
मूलांक 3 – प्रत्येक कामात फोकस महत्त्वाचा
मूलांक 3 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. घरात धार्मिक कार्याच्या आयोजनाचा विचार कराल. प्रत्येक काम विचारपूर्वक पूर्ण करा. एखाद्या रिसर्च कार्यक्रमात सहभाग घ्यायचा असेल तर आजचा दिवस उत्तम आहे. तुम्हाला सरकारी नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर वेळ चांगली आहे. तुमच्या इच्छापूर्तीचा दिवस आहे फक्त कामात फोकस ठेवा.
मूलांक 4 – सरकारी अडचणीत सापडण्याची शक्यता
मूलांक 4 साठी आजचा दिवस सामान्य असेल. जे काही काम हाती घ्याल त्याचे आधी परिक्षण करा, अन्यथा सरकारी अडचणीत सापडू शकता. वडिलांची तब्येत अचानक बिघडू शकते तेव्हा सतर्क राहा. व्यवसायात भरपूर काम आहे आणि तुम्ही ते पटापट मार्गी लावणार आहात. तुम्ही जर राजकारणात असाल तर आज वेळ कठिण आहे, सावध राहा.
मूलांक 5 – समस्येवर तोडगा सापडेल
मूलांक 5 साठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुमची ओळख एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीशी होणार आहे त्याचा तुम्हाला व्यवसायात फायदा होईल. तुमच्या तल्लख बुद्धीने तुम्ही प्रश्न पटापट मार्गी लावाल. धनसंपत्ती मिळविण्याचे मार्ग खुले होतील त्याचा लाभ घ्या. नशिब प्रत्येक कामात साथ देईल. शेअर मार्केटमधील गुंतवणूक लाभदायक होवू शकते.
मूलांक 6 – भागिदारीतल व्यवसायासाठी वेळ उत्तम
मूलांक 6 साठी आजचा दिवस चांगला आहे. नातेसंबध जपा कारण तेच आपल्या मदतीला येत असतात. तब्येतीची काळजी घ्या, तुम्ही काय खात आहात त्याकडे कटाक्षाने लक्ष द्या. पित्ताचा त्रास होवू शकतो, डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुम्ही सरकारी कामात असाल तर एखाद्या महिलेमुळे तुम्हाला त्रास होवू शकतो. भागीदारीत व्यवसाय सुरु करायचा असेल तर वेळ उत्तम आहे.
मूलांक 7 – वडिल तुम्हाला रागावतील
मूलांक 7 साठी आजचा दिवस फारसा चांगला नाही. कोणत्यातरी गोष्टीची चिंता तुम्हाला सतावत राहणार आहे. वडिल आज तुम्हाला असे काही बोलतील त्यामुळे तुम्ही खूप दुःखाी व्हाल. आज निराशेचे डोंगर सभोवताली उभे राहतील. कामांमध्ये अडथळे तसेच चिडचिड होवू शकते. आईची तब्येत अचानक बिघडल्यामुळे त्रास होवू शकतो.
मूलांक 8 – मानसिक तणाव वाढण्याची शक्यता
मूलांक 8 साठी आजचा दिवस ओके आहे पण तुम्हाला महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल तर तो टाळावा. भौतिक सुखांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. मानसिक ताण तणाव वाढल्यासारखा वाटेल तसेच तुम्ही एखाद्या सरकारी समस्येत अडकण्याची शक्यता आहे. तेव्हा कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या तसेच दस्तऐवज नीट तपासा. ऑफिसमध्ये वरिष्ठ तुम्हाला त्रास देवू शकतात.
मूलांक 9 – भावंडांसोबत वाद होण्याची शक्यता
मूलांक 9 साठी आजचा दिवस ठिक आहे पण रागाचा पारा प्रचंड असेल. तुम्हाला काहीही करून रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. धनसंपत्तीचे व्यवस्थापन तुम्ही उत्तम पद्धतीने करणार आहात. भावंडांसोबत वाद होण्याची शक्यता आहे, संवादाद्वारे भांडण मिटविण्याचा प्रयत्न करा. अती घाई संकटात नेई असे म्हणतात त्यामुळे कामे घाईत करू नका. कोणताही निर्णय घेताना भविष्यात त्याचे परिणाम काय होतील ते पाहा.