Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे राशिभविष्य, २७ ऑक्टोबर २०२४ : कन्यासह २ राशींनी रागावर कंट्रोल ठेवा, कामाचा ताण वाढेल! वाचा रविवारचे राशीभविष्य

6

Today Horoscope 27 october in Marathi, आजचे राशीभविष्य:  
आज २७ ऑक्टोबर रविवार असून मघा नक्षत्र आहे. ब्रह्मा योग असून बव करणाचा शुभ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे काही राशींना चांगला फायदा होईल. कन्यासह २ राशींना सावध राहावे लागेल. व्यवसायासातील योजनांमुळे चांगला नफा मिळेल. जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाल. जवळच्या व्यक्तीबद्दल वाईट वाटेल. राजकारणातील लोकांना मोठे यश मिळेल. चला जाणून घेऊया मेष ते मीन राशीच्या सर्व 12 राशींसाठी रविवारचा दिवस कसा आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
आजचे राशिभविष्य, २७ ऑक्टोबर २०२४ : कन्यासह २ राशींनी रागावर कंट्रोल ठेवा, कामाचा ताण वाढेल! वाचा रविवारचे राशीभविष्य

Aaj che Rashi Bhavishya 27 october 2024 :
आज २७ ऑक्टोबर रविवार असून मघा नक्षत्र आहे. ब्रह्मा योग असून बव करणाचा शुभ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे काही राशींना चांगला फायदा होईल. कन्यासह २ राशींना सावध राहावे लागेल. व्यवसायासातील योजनांमुळे चांगला नफा मिळेल. जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाल. जवळच्या व्यक्तीबद्दल वाईट वाटेल. राजकारणातील लोकांना मोठे यश मिळेल. व्यवसायात कोणताही बदल केल्यास फायदा होईल. तुमच्या भावासाठी काही पैशांची व्यवस्था करावी लागेल. वैवाहिक जीवनातील तणाव आज संपतील. मुलांसाठी थोडी धावपळ करावी लागेल. जाणून घेऊया ज्योतिषी चिराग दारुवालांकडून आजचे राशीभविष्य

मेष – कामात ताण जाणवेल

आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी ताण जाणवेल. वरिष्ठांचे सहकार्य मिळणार आहे. व्यवसायासातील योजनांमुळे चांगला नफा मिळेल. जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाल. जवळच्या व्यक्तीबद्दल वाईट वाटेल.
आज भाग्य ६५ टक्के तुमच्या बाजूने असेल. गाईला गुळ खाऊ घाला.

वृषभ – व्यवसायतून फायदा

आज तुम्हाला शारारिक आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागेल. डॉक्टरांचा सल्ला घ्या. राजकारणातील लोकांना मोठे यश मिळेल. व्यवसायात कोणताही बदल केल्यास फायदा होईल.
आज भाग्य ७० टक्के तुमच्या बाजूने असेल. भगवान विष्णुला बेसनाच्या लाडूचा प्रसाद अर्पण करा

मिथुन – कामात यश मिळेल

आज जे काम कराल त्यात आनंद मिळेल. सरकारी नोकरीशी संबंधित लोकांना मोठे यश मिळेल. तुमच्या भावासाठी काही पैशांची व्यवस्था करावी लागेल. वैवाहिक जीवनातील तणाव आज संपतील. मुलांसाठी थोडी धावपळ करावी लागेल.
आज भाग्य ८१ टक्के तुमच्या बाजूने असेल. सूर्य देवाला जल अर्पण करा

कर्क – वाद घालू नका

आज तुमच्या व्यवसायात येणारे अडथळे दूर होतील. व्यवसायात कोणती नवीन योजना सुरु करणार असाल तर फायदा होईल. तुमच्या आर्थिक परिस्थितीबाबत चिंतेत राहाल. कुटुंबातील सदस्याची इच्छा पूर्ण होतील. धार्मिक विधीचे नियोजन सफल होईल. कुणाशीही वाद घालू नका.
आज भाग्य ९५ टक्के तुमच्या बाजूने असेल. गरीबांना अन्न, वस्त्र दान करा

सिंह – उदास होऊ नका

आज करार निश्चित न झाल्यास उदास होऊ नका. ज्यामुळे तुम्हाला तणाव जाणवेल. महत्त्वाची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. पालकांची सेवा करण्यात वेळ घालवाल. लव्ह लाईफमध्ये तणाव निर्माण होईल.
आज भाग्य ९० टक्के तुमच्या बाजूने असेल. गाईला चपाती खाऊ घाला.

कन्या – रागावर नियंत्रण ठेवा

आज तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल. रखडलेली कामे पूर्ण झाल्याने आनंदी व्हाल. राजकारणाच्या दिशेने केलेले तुमचे कार्य यशस्वी होईल. तुमचे पद आणि प्रतिष्ठा वाढेल. आईशी काही मतभेद होऊ शकतात. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.
आज भाग्य ६९ टक्के तुमच्या बाजूने असेल. भगवान विष्णुचे नामस्मरण करा

तुळ – व्यस्त असाल

आज तुम्ही आनंदी असाल. घरात शुभ कार्य घडेल. तुमचा पूर्ण वेळ कामात जाईल. तुमच्या कुटुंबातील सदस्यांसाठी वेळ काढता येणार नाही. जवळच्या व्यक्तीसाठी काही पैशांची व्यवस्था करावी लागेल.
आज भाग्य ८८ टक्के तुमच्या बाजूने असेल. गरजू लोकांना मदत करा

वृश्चिक – मतभेद होतील

आज राजकारणाशी संबंधित लोकांना आज काही वैचारिक मतभेदांना सामोरे जावे लागू शकते. कामात यश मिळेल आणि जनतेचा पाठिंबा वाढेल.व्यवसायात नफा मिळविण्यासाठी आज तुम्हाला तुमच्या भावांच्या सहकार्याची आवश्यकता असेल. तुमच्या भावांसोबत तुमच्या नात्यात काही तणाव निर्माण होईल.
आज भाग्य ८१ टक्के तुमच्या बाजूने असेल. भगवान श्रीकृष्णाची पूजा करा

धनु – मानसिक शांती मिळेल

आज पैशासाठी काही नवीन मार्ग तयार कराल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुमचे विचार कुणाशीही शेअर करु नका. लाभाच्या मार्गात अडथळे येतील. मुले धार्मिक कार्यात रस दाखवतील. मानसिक शांती मिळेल.
आज भाग्य ६८ टक्के तुमच्या बाजूने असेल. भगवान विष्णुचे १०८ वेळा नामस्मरण करा

मकर – प्रगतीत अडथळे येतील

आज तुम्ही कुणाची तरी मदत घ्याल. व्यवसायात प्रगतीसाठी अडथळे येतील. कुटुंबात भांडणे होऊ शकतात. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. पार्टनरशीपमध्ये व्यवसाय करण्यासाठी दिवस चांगला आहे. देवदर्शन घेऊ शकता.
आज भाग्य ९० टक्के तुमच्या बाजूने असेल. कपाळावर चंदनाचा टिळा लावा.

कुंभ – आरोग्याची काळजी घ्या

आज शत्रूमुळे तुम्हाला त्रास होईल. तुम्हाला कमी फायदा होणार आहे. तुमची रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी मोठ्यांची मदत लागेल. नुकसान होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या समस्या उद्भवतील.
आज भाग्य ९३ टक्के तुमच्या बाजूने असेल. संकटनाशक गणेश स्तोत्राचे पठण करा

मीन – नुकसान होईल

आज तुमच्या सहकाऱ्याशी वाद होतील. कायदेशीर वाद अडकाल. शारीरिक आणि मानसिक समस्या उद्भवतील. नवीन कामात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर नुकसान होईल. शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.
आज भाग्य ९६ टक्के तुमच्या बाजूने राहिल. गणपतीला दूर्वा अर्पण करा

कोमल दामुद्रे

लेखकाबद्दलकोमल दामुद्रेकोमल दामुद्रे मागच्या साडेचार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये लिखाण करत आहे. लाईफस्टाइल, टेक, ऑटो, धार्मिक, प्रवास आणि बिझनेस क्षेत्रातील विविध विषयांवर लिखाण. मागच्या दोन वर्षांपासून धार्मिक विषयांवर लिखाण करत आहे. कालनिर्णयमध्ये संपादकीय सहाय्यक. कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक, कालनिर्णय मुख्य एडिशन, कालनिर्णय आरोग्य व कालनिर्णय स्वादिष्ट यावर काम करण्याचा अनुभव. यापूर्वी कोमलने २०१९ मधील लोकसभा निवडणुकांसाठी पीआर म्हणून काम केले. कोमल ला कामाव्यतिरिक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून कविता आणि लेख लिहायला आवडतात. नवीन पुस्तके आणि धार्मिक गोष्टी वाचण्यात अधिक रस…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.