Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Maharashtra Election 2024: लोकसभा निवडणुकीत मनसे प्रमुख राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. त्यांनी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभाही घेतल्या.
दादर माहीममधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंना तिकीट दिलं आहे. राज यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. त्यांनी महायुतीच्या उमेदवारांसाठी सभाही घेतल्या. त्यांची बिनशर्त पाठिंब्याची परतफेड करण्यासाठी अमित ठाकरेंविरोधात महायुतीनं उमेदवार देऊ नये, अशी भाजपची भूमिका आहे. भाजपचे नेते आशिष शेलार यांनी तशी भूमिका मांडली आहे. त्यामुळे शिंदेसेनेचे आमदार सदा सरवणकर यांनी निवडणूक लढवू नये यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरु आहेत.
NCP SP Candidate List: ज्याच्या बंडखोरीनं दीड वर्षांपूर्वी सीट पडली; त्यालाच पवारांकडून उमेदवारी; भाजप गोत्यात?
भाजपनं माघारीची भाषा केल्यावर सदा सरवणकर यांनी निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचं म्हटलं होतं. कालच त्यांनी भूमिका जाहीर केली. मी लढवय्या आहे. कबड्डीपटू असल्यानं मैदान सोडून जात नसतो, असं म्हणत त्यांनी निवडणुकीच्या मैदानात ‘सर्व्हिस’ टाकण्याची भाषा केली. पण आता त्यांची ‘पकड’ महायुतीकडूनच होण्याची शक्यता आहे. त्यांनी माघार घ्यावी यासाठी शिंदे, फडणवीस यांच्याकडून शिष्टाई केली जात आहे. त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु आहेत.
पुन्हा ताटातलं वाटीत! मशालीला सर्वप्रथम भिडायला निघालेला भाजप नेता शिंदेंकडे; आज पक्षप्रवेश
मनसेप्रमुख राज ठाकरेंनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदेंसाठी प्रचारसभा घेतली. पण आता शिंदेंनी राज यांच्या लेकाविरोधातच उमेदवार दिला आहे. अमित यांच्याविरोधात शिंदेसेनेविरोधात सदा सरवणकर रिंगणात आहेत. ते २०१४ पासून दादर माहीमचे आमदार आहेत. सरवणकर यांनी माघार घेतल्यास अमित ठाकरेंना निवडणूक सोपी जाऊ शकते.
Maharashtra Election 2024: राज ठाकरेंच्या ‘बिनशर्त’ची परतफेड? वर्षावर हालचालींना वेग, शिंदे-फडणवीसांची बैठक; काय ठरतंय?
ठाकरेसेनेनं दादर माहीम विधानसभेतून महेश सावंत यांना तिकीट दिलं आहे. आदित्य ठाकरे २०१९ मध्ये पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढले. त्यांनी वरळीतून निवडणूक लढवली होती. त्यावेळी राज ठाकरेंनी त्यांच्याविरोधात उमेदवार दिला नव्हता. त्यामुळे अमित ठाकरेंविरोधात उद्धव ठाकरे उमेदवार की नाही, याची उत्सुकता होती. पण उद्धव ठाकरेंनी पुतण्याविरोधात उमेदवार दिला आहे.