Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे अंकभविष्य, 28 ऑक्टोबर 2024: मनात विचारांचे काहूर ! कामातील घाईगडबड करेल विनाश ! जाणून घ्या, अंकशास्त्रानुसार तुमचे राशीभविष्य

6

Numerology Prediction, 28 October 2024 : 28 ऑक्टोबर, सोमवार, मूलांक 1 आणि मूलांक 2 साठी आजचा दिवस फारसा ठिक नाही. तुम्हाला कामे करताना अडचणींचा सामना करावा लागेल. मूलांक 4 च्या मनात विचारांचे काहूर असेल एकावेळी एकच गोष्ट करा. मूलांक 6 असणाऱ्या जातकांनी कामे करताना सावध राहा, अन्यथा ओरडा पडेल, मूलांक 8 चे लोक नवीन गोष्टी शिकणार आहेत. मूलांक 9 च्या जातकांना कामे मिळणार तसेच एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीची भेट होईल जो भविष्यात खूप मदत करेल. मूलांक 1 ते 9 साठी आजचा दिवस कसा आहे? तुमचा मूलांक काय सांगतो?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
आजचे अंकभविष्य, 28 ऑक्टोबर 2024: मनात विचारांचे काहूर ! कामातील घाईगडबड करेल विनाश ! जाणून घ्या, अंकशास्त्रानुसार तुमचे राशीभविष्य

Aajche Ank bhavishya, 28 October 2024: 28 ऑक्टोबर, मूलांक 1सह या मूलांकासाठी दिवस फारसा चांगला नाही. कामे वाढणार मग तुम्ही घाई घाईत काम करणार यामुळे कामे बिघडू शकतात. कामात फोकस ठेवा, सावध आणि सतर्क राहा. तुमचे बोलणे आणि राग आज फार वाढेल पण त्यावर नियंत्रण महत्त्वाचे आहे. या मूलांकाचे जातक काहीतरी नवीन शिकतील त्याचा भविष्यात लाभ होईल. आजच्या दिवसाबद्दल तुमचा मूलांक काय सांगतो? मूलांक 1 ते 9 या क्रमांकाचे कोणते लोक आज भाग्यशाली आहेत ते पाहूया.

मूलांक 1 – अडचणींचा सामना, चिडचिड फार

मूलांक 1 असलेल्यांसाठी आजचा दिवस फारसा ठिक नाही. तुम्हाला कामे करताना अडचणींचा सामना करावा लागेल. तुमची खूप चिडचिड होणार आहे पण तुम्हाला शांत रहावं लागेल. जे काही होते आहे ते चांगल्यासाठी आहे असे समजा. घरातील एखाद्या सदस्याची तब्येत बिघडू शकते त्यामुळे तुम्ही टेन्शनमध्ये असाल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष द्या तरच यश मिळेल. जीवनात शॉर्टकट असे काही नाही, मेहनत गरजेची आहे.

मूलांक 2 – अडचणीत वाढ, निराश होवू नका

मूलांक 2 असणाऱ्या जातकांसाठी आजचा दिवस ठिक नाही. सकाळपासून अडचणी येणार आहेत त्यामुळे तुम्ही निराश व्हाल. कामे खूप आहेत त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढू शकणार नाही. आध्यात्मिक गोष्टीत अधिक रुची घेणार आहात. तीर्थयात्रेचे नियोजन करू शकता. कार्यक्षेत्रात फोकस महत्त्वाचा आहे. सकारात्मक विचार करा.

मूलांक 3 – अती घाई संकटात नेई

मूलांक 3 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस ठिक आहे तुम्ही कोणतेही काम उत्साहाने करणार आहात. आज घाईगडबड नको कारण यामुळे चूक होवू शकते. लवलाइफ ठिक आहे. आज सावध आणि सतर्क रहायला हवे फसवणुकिची शक्यता आहे. कुटुंबातील वातावरण ठिक असेल. व्यवसायात तुमचे लक्ष महत्त्वाचे आहे.

मूलांक 4 – मनात विचारांचे काहूर ! एकावेळी एक गोष्ट करा

मूलांक 4 साठी आजचा दिवस चांगला आहे. कुटुंबातील सदस्य तुम्हाला कामात मदत करतील. आज काही काळ निराशेचा सामना करावा लागेल पण सकारात्मक विचार करा. तुम्हाला खूप काही करायचं आहे. तुमच्या मनात अनेक विचार आहेत पण एक एक गोष्ट मार्गी लावा. काही कारणाने राग अनावर होईल, शांत राहण्याचा प्रयत्न करा.

मूलांक 5 – वेळेचा सदुपयोग करा, कामे वेळेत पूर्ण करा

मूलांक 5 साठी आजचा दिवस ठिक आहे तुम्ही मजामस्तीच्या मूडमध्ये असाल. पण मजा करतानादेखील जास्त वेळ वाया जाणार नाही असे पाहा. वेळ वाया गेला तर तुमचे काम थांबू शकते. वेळेत कामे पूर्ण होणार नाहीत. तुम्ही स्वतःच्या मनाने कामे करायला जाणार पण इतरांच्या हस्तक्षेपामुळे मनाप्रमाणे तुम्हाला काम करता येणार नाही.

मूलांक 6 – कामे करताना सावध राहा, अन्यथा ओरडा पडेल

मूलांक 6 साठी आजचा दिवस ठिक आहे. लवलाइफ उत्तम असून नातेसंबंध अधिक दृढ होतील. तुम्ही अनेक कामे एकसाथ करण्याचा प्रयत्न करणार आहात त्यासाठी योग्य नियोजन गरजेचे आहे. तुम्हाला कोणीतरी आज ओरडणार आहे, त्यामुळे जे काही काम कराल त्यात चूक होणार नाही याची काळजी घ्या.

मूलांक 7 – बोलणे आणि राग यावर नियंत्रण हवे

मूलांक 7 साठी आजचा दिवस ठिक आहे. तुमच्या कामावर बारीक लक्ष ठेवा, अन्यथा अडचणीत वाढ होईल. आज मनात खूप विचार येतील त्यामुळे तुम्ही गोंधळून जाणार आहात. काही चांगल्या संधी मिळतील त्याचा लाभ घ्या. तुमचा राग आणि बोलणे यावर नियंत्रण ठेवा, नाहीतर वाद वाढतील. पती-पत्नीमध्ये नाराजीचे सुर असतील.

मूलांक 8 – नवीन गोष्टी शिकणार

मूलांक 8 साठी आजचा दिवस चांगला असून तुम्ही काही नवीन गोष्टी शिकणार आहात. ज्याचा फायदा तुम्हाला भविष्यात येवू शकतो. आर्थिक बाबतीत काळजी घ्या अन्यथा मनासारखे पैसे खर्च करता येणार नाहीत. अडचणी आहेत पण त्याचा धैर्याने सामना करा. वैवाहिक जीवन ठिक आहे पण एकमेकांना मदत करणार आहात.

मूलांक 9 – कामे मिळणार, तज्ज्ञ व्यक्तीची भेट होणार

मूलांक 9 साठी आजचा दिवस ठिक आहे तुमचा संपर्क एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीसोबत होवू शकतो. अचानक तुम्हाला काही नवीन कामे मिळतील. स्वतःला उत्साही बनवण्यासाठी तुमच्या आवडी प्रमाणे कामे करा. सरकारी कामासंदर्भात नुकसान होण्याची शक्यता आहे.

अनिता किंदळेकर

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.