Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

माहिमवरुन महायुतीत घुसळण, सुषमा अंधारेंचा चिमटा, मुंबईत नाल्यात मृतदेह सापडला, थरकाप उडवणारी घटना

5

महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 28 Oct 2024, 9:37 am

Daily Top 10 Headlines in Marathi; रोजच्या ताज्या ठळक बातम्या: सकाळच्या महत्त्वाच्या हेडलाईन्सचा थोडक्यात आढावा, पुढील लिंकवर क्लिक करुन वाचा सविस्तर बातमी

१. उद्धव ठाकरेंनी महेश सावंत यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पण, आता माहीममध्ये मोठा ट्वीस्ट येण्याची शक्यता आहे. यातच ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी ट्वीटवर (एक्स) एक कविता पोस्ट करत शिंदे गटाला चिमटा काढला आहे. बातमी वाचा सविस्तर…
२. विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने तिन्ही घटक पक्षांना समान जागांचे सूत्र जाहीर केले असले, तरी अद्याप एक-एक जागेसाठी रस्सीखेच सुरूच आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यास दोन दिवस शिल्लक असताना हे समानसूत्र गुंडाळले जाणार असल्याचे सूत्रांकडून समजते. यामध्ये काँग्रेसची सरशी होणार असून, पक्षाच्या वाट्याला १०२ ते १०३ जागा येणार असल्याचे कळते.

३. महाविकास आघाडीच्या जागावाटपात समाधानकारक जागा न मिळाल्याने समाजवादी पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यातच रविवारी समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख हे मातोश्रीवर पोहोचल्याने नव्या राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

४. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेनेत पक्षप्रवेशांचा धडाका कायम आहे. पालघरचे माजी खासदार राजेंद्र गावित, भाजपचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या कन्या संजना जाधव आणि बोईसर येथील माजी आमदार विलास तरे यांनी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यात शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे शिंदे यांच्या शिवसेनेतील इन्कमिंगने संघटनेला बळ मिळाले आहे.

५. विधानसभा निवडणुकीचे महाविकास आघाडी किंवा महायुती यांच्यात अजुनही जागावाटप पूर्ण झालेले नाही. अर्ज भरण्याची उद्या अंतिम तारीख असल्याने आज सर्व जागांची घोषणा केल्या जातील. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये खटके उडाल्याचं दिसलं होतं. अनेक ठिकाणी ठाकरे गटाला कमी जागा मिळाल्याचं यादीवरून दिसत आहे.

६. ‘विधानसभेवर कुणाला पाठवायचे यासंदर्भात मराठा समाजाच्या हिताचाच निर्णय आपण वेळेवर घेणार आहोत. आता येत्या ३० तारखेपर्यंत कुणीच अंतरवाली सराटीत येऊ नये,’ असे प्रतिपादन मनोज जरांगे-पाटील यांनी रविवारी केले.

७. म्हसळा बाजूकडून दिवेआगरकडे मारुती सुझुकी स्विप्टकार क्रमांक एमएच ०३ एझेड ९८६६ भरधाव वेगाने जात असताना पुढे जाण्याच्या प्रयत्नात कार चालकाने दुचाकी क्रमांक एमएच ०६ सीई १७११ दुचाकी चालकाला मागून जोरदार धडक दिली. फरफटत नेल्याने दुचाकीवर प्रवास करणाऱ्या इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बातमी वाचा सविस्तर…

८. दुसऱ्या वन डे सामन्यात महिला न्यूझीलंड संघाने महिला भारतीय संघावर ७६ धावांनी विजय मिळवला आहे. न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० ओव्हरमध्ये २५९ धावा केल्या होत्या. त्यानंतर या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ १८३ धावांवर ऑल आऊट झाला. न्यूझीलंड संघाची कर्णधार सोफी डिव्हाईनने ७९ धावांची दमदार अर्धशतकी खेळी केली होती. बातमी वाचा सविस्तर…

९. अलीकडेच सनीने शेअर केलेली पोस्ट पाहून चाहत्यांना धक्काच बसला. अभिनेत्याने त्याचे वडील धर्मेंद्र यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि लिहिले की तो त्यांना मिस करत आहे. त्याने वडिलांच्या आठवणीत फोटो शेअर केल्याने अनेक चाहत्यांचा गैरसमज झाला.

१०. पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम), नीरज वर्मा यांनी घटनास्थळाची पाहणी केली. ‘प्रवाशांनी रेल्वेगाडीचे दरवाजे बंद असताना डब्यांमध्ये शिरण्याचा प्रयत्न केल्याने ही दुर्घटना घडली. अनारक्षित रेल्वेगाडीची आसन क्षमता २०३७ असताना, अंदाजे २,५४० तिकिटांची विक्री करण्यात आली,’ असे त्यांनी सांगितले.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.