Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

स्वप्ननगरीत मुलाच्या आयुष्याचा चेंदामेंदा, इंद्रजितला लोकांनी अक्षरश: तुडवलं

5

Bandra Terminus Stampede: इंद्रजितवर केईएम रुग्णालयात रविवारी दुपारी शस्त्रक्रिया करण्यात आली. इंद्रजीतचा पाय मांडीमध्ये मोडला असून त्यावर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे.

हायलाइट्स:

  • १९ वर्षांचा तरणाबांड इंद्रजित, लोकांनी अक्षरश: तुडवलं
  • स्वप्नांच्या नगरीत पोराच्या जिंदगीचा चेंदामेंदा
  • वांद्र्याच्या चेंगराचेंगरीने सगळं उद्ध्वस्त!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम
वांद्रे टर्मिनस गोरखपूर एक्स्प्रेस

मुंबई : काल मुंबईधून एक हृदयद्रावक बातमी समोर आली. वांद्रे रेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक १वर गोरखपूर एक्सप्रेसमध्ये प्रवाशांची गर्दी वाढल्याने चेंगचेंगरी झाल्याची दुर्घटना घडली. या चेंगराचेंगरीमध्ये अनेकण जण जखमी झाले असून त्यांना भाभा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. जखमींमधील सात जणांची प्रकृती स्थिर असून दोघेजण गंभीर असल्याची माहिती समजत आहे. जखमींचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. सकाळी सहा वाजता वांद्रे रेल्वेस्थानकावर ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या दोघांपैकी एका तरुणाने आपला पाय गमावला. दिवाळी आहे, घरी जाऊ आणि सण साजरा करु असं म्हणत गावी निघालेल्या इंद्रजीत सहानीवर (वय १९) अपघातामुळे पाय गमावण्याची वेळ आली. इंद्रजीत विक्रोळीतील कन्नमवार नगर येथे कंत्राटदारांकडे टाईल्स बसवण्याचं काम करतो. दिवाळीनिमित्त तो रविवारी पहाटेच्या गाडीने गावाला जाण्यासाठी निघाला होता. मात्र, गाडी पकडण्यासाठी झालेल्या चेंगराचेंगरीत त्याच्या पायाला मार बसला. गर्दीतून बाहेर पडण्यासाठी त्याने प्रयत्न देखील केले मात्र, लोक त्याच्या अंगावरून जात होते. त्यामुळे, तो गंभीर जखमी झाला.
Shrinivas Vanga : बंडात साथ, तरी फिरवली पाठ; ज्या आमदाराच्या मुलाच्या बर्थडेचं कारण सांगून सुरत गाठली, त्याचंच तिकीट कापलं

इंद्रजितवर केईएम रुग्णालयात रविवारी दुपारी शस्त्रक्रिया करण्यात आली. इंद्रजीतचा पाय मांडीमध्ये मोडला असून त्यावर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे. पायाच्या रक्तवाहिन्या जोडल्या न गेल्यास पाय कापावा लागू शकतो, असं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. यामधील दृश्य विदारक असून काही प्रवासी गंभीर झालेले पाहायला मिळालं. बेशुद्ध अवस्थेत जखमी प्रवाशांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या प्रवाशांवर आता भाभा रूग्णालयात उपचार सुरू असून रेल्वेचेही अधिकारी तिथे उपस्थित आहेत.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.