Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

महायुतीच्या उमेदवाराचा अर्ज भरण्यास येणार दिला, भाजप पदाधिकाऱ्याला मारहाण; पाच तोळ्याची चैन गहाळ

5

Raigad Pankaj Anjara Beating : रायगडमध्ये महायुतीच्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येण्यास नकार दिल्याने भाजप पदाधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीत भाजप पदाधिकाऱ्याची सोन्याची चैन गहाण झाली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

अमुलकुमार जैन, रायगड : रायगड जिल्ह्यातील अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारासोबत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाण्यास नकार दिल्याने भाजपच्या तालुका पदाधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली आहे. महायुतीच्या उमेदवारासोबत जाण्याचा नकार दिल्याचा राग मनात धरुन पंकज प्रविण अंजारा यांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे.

महायुतीच्या उमेदवारासोबत अर्ज भरण्यासाठी जाण्यास नकार दिल्याने मारहाण

अलिबाग शहरातील रायगड बाजारसमोर रोशन भगत, महेश मोहिते, राजेश पाटील, सुनिल दामले, उदय काठे यांनी नकार दिलेल्या पंकज प्रविण अंजारा (वय -३७ वर्षे, व्यवसाय-रिसॉर्ट बिझनेस रा, दिनेश पारेख वाडी, थळ चाळमळा, पो.थळ, ता. अलिबाग जि.रायगड) यांना मारहाण केली. या मारहाणीत त्यांची पाच तोळे वजनाची सोन्याची चैन गहाळ झाली असल्याची तक्रार अलिबाग पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.
Ajit Kakade : ऑफिसर पदाचा राजीनामा, जरांगे पाटलांचा आवाज बुलंद करण्यासाठी उच्चशिक्षित तरुण निवडणुकीच्या रिंगणात

भाजपचे तालुका पदाधिकारी पंकज प्रविण अंजारा यांना शिवीगाळ करत मारहाण

मिळालेल्या माहितीनुसार, अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार महेंद्र दळवी यांचा उमेदवारी अर्ज भरण्यास येणार नसल्याचं पंकज प्रविण अंजारा यांनी म्हटलं होतं. तोच राग मनात धरून भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हा पदाधिकारी अँड. महेश मोहिते यांच्यासह रोशन भगत, महेश मोहिते, राजेश पाटील, सुनिल दामले, पंचायत समिती माजी सदस्य तथा तालुका अध्यक्ष उदय काठे यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून भाजपचे तालुका पदाधिकारी पंकज प्रविण अंजारा यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्याने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत पंकज अंजारा यांची पाच तोळे वजनाची सोन्याची चैन गहाळ झाली झाली आहे. याबाबत अलिबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
ती राजकारणावर भाष्य करत नाही, त्यामुळे… दादाच्या विरोधात फॉर्म भरु नको, या अजितदादांच्या विधानावर श्रीनिवास पवारांची प्रतिक्रिया

महायुतीचे उमेदवार महेंद्र दळवी यांच्याकडून धमकी

पंकज अंजारा आणि त्यांच्या पत्नी जान्हवी अंजारा हे दोघे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. थळ परिसरात त्यांनी पक्ष वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू केले असल्याने आमदार महेंद्र दळवी यांचा त्यांच्यावर राग आहे. त्यामुळे त्यांना यापूर्वी अनेकदा धमकावून घाबरवण्याचे देखील प्रकार घडले आहेत. मात्र, आमदारांच्या दहशतीला भिक न घालता अंजारा पती-पत्नी यांनी पक्ष कार्य सुरूच ठेवले आहे. त्यांना वाढता प्रतिसाद पाहून त्यांच्या विरोधात षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप पंकज अंजारा यांनी केला आहे.
मनसेची सहावी यादी जाहीर, कोणाला कुठून उमेदवारी? राज ठाकरेंकडून विधानसभेच्या रिंगणात आतापर्यंत ११७ शिलेदार
महेंद्र दळवी यांच्या दादागिरीमुळे त्यांच्यापासून चार हात लांबच राहण्याचा प्रयत्न ते करत असतात. त्यामुळे त्यांच्या प्रचारात देखील ते सहभागी होत नसल्याचे दिसते. आमदारांकडून मिळत असलेल्या आर्थिक लाभापोटी महेश मोहितेसारख्या काही पदाधिकाऱ्यांनी स्वतःला दळवी यांच्या दावणीला जुंपून घेतले आहे.

महायुतीच्या उमेदवाराचा अर्ज भरण्यास येणार दिला, भाजप पदाधिकाऱ्याला मारहाण; पाच तोळ्याची चैन गहाळ

पंकज अंजारा यांना मारहाण, मारहाणीत दिवे विक्रेत्याचेही नुकसान

रविवारी रात्री रायगड बाजार परिसरात पंकज आंजारा आणि भाजपचे पदाधिकारी महेश मोहिते यांची समोरासमोर भेट झाली. यावेळी महेश मोहिते यांनी सरळ सरळ धमकावत एकेरी भाषेत दळवी सोबत न येण्यावरून जाब विचारला. त्यावर अंजारा यांनी आपल्याला दळवी यांच्याकडून मिळत आलेल्या वागणुकीबद्दल सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र काहीही ऐकून न घेण्याच्या मनःस्थितीत असलेल्या मोहिते याने शिवीगाळ करत आपल्या बाऊन्सरकडून मारहाण करण्यास सुरुवात केली. ही मारहाण एवढी जबर होती की यात अंजारा यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. या मारहाणीत तिथे दिवे विकणाऱ्या विक्रेत्यांचे खूप नुकसान झाले असल्याचे पंकज अंजारा यांनी सांगितले.

करिश्मा भुर्के

लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.