Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

संजय राऊत यांनी शिवसेना संपवण्याचा विडा उचलला, महिला पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र; कारण काय?

5

Ahilyanagar Woman Office Bearer Left Shiv Sena : अहिल्यानगरमधील उबाठा गटातील शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेला रामराम करत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. शिवसेना सोडण्यामागचं कारणही त्यांनी दिलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

विजयसिंह होलम, अहिल्यानगर : ज्येष्ठ नेते शरद पवार आणि शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी शिवसेना संपवण्याचा विडा उचलला आहे. त्यांच्या कृतीला बळी पडून शिवसनेचे वरिष्ठ नेतृत्वही चुकीचे निर्णय घेत आहे. एवढेच नाही तर राऊत यांनी अहिल्यानगर (अहमदनगर) येथील शिवसेनेची पारंपरिक हक्काची जागा राष्ट्रवादीला विकली, असा आरोप शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष आशा निंबाळकर यांनी केला. आता शिवसेनेत भवितव्य राहिले नाही, असे म्हणत त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
Raj Thackeray : मुंबई शहर आहे की डान्सबार? राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका, रोषणाईवरुन केलं लक्ष्य
अहमदनगरच्या जागेवरून दीर्घकाळ वाद सुरू होता. ही जागा पूर्वी अनेक वर्षे शिवसेनेकडे होती. आताच्या जागा वाटपात शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जोरदार मागणी केली होती. मात्र, महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडत येथून पवार यांचे जुने निष्ठावान कार्यकर्ते दादा कळमकर यांचे पुतणे माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी उमेदवारी देण्यात आली. यामुळे नाराज झालेल्या पदाधिकाऱ्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर नाराज झालेल्या महिला पदाधिकाऱ्यांनी थेट शिवसेना सोडण्याचाच निर्णय घेतला. महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष आशा निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली शहराध्यक्षा अरुणा गोयल यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्यांनी आमदार संग्राम जगपात यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
मटक्याचा धंदा चालवणाऱ्यांकडून पोलिसांनी लाच मागितली; दारुची बाटली, आणि…. तिघांविरोधात गुन्हा दाखल
यावेळी महिलांनी शिवसेना नेतृत्वावर आरोप केले. आशा निंबाळकर म्हणाल्या, शिवसेना पक्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अंतर्गत वाद आहेत. गेले २० वर्ष आम्ही निष्ठेने काम केले. उपनेते स्वर्गीय अनिल राठोड असताना आम्हाला कधीही त्रास झाला नाही. या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे अस्तित्वच संपले आहे. शरद पवार आणि संजय राऊत यांनी शिवसेना पक्ष संपवण्याचा विडा उचलला आहे. नगर शहरातील शिवसेनेची हक्कची जागा संजय राऊत यांनी विकली आहे, असा गंभीर आरोपही निंबाळकर यांनी केला.
Devendra Fadnavis : फडणवीसांनी थेट २३ नोव्हेंबरचा निकालच सांगितला, राज्यात भाजपच्या इतक्या जागा येतील; केला मोठा दावा
जगताप यांच्यासंबंधी बोलताना त्या म्हणाल्या, नगर शहरात आमदार संग्राम जगताप यांनी केलेल्या विकास कामांनी आम्ही प्रभावीत झालो आहोत. त्यामुळे आम्ही शिवसेनेचे शिवबंधन तोडत आमदार जगताप यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आमदार जगताप यांनी या महिलांचे स्वागत करताना त्यांच्या कामाचे कौतुक केले.

Ahmednagar News : संजय राऊत यांनी शिवसेना संपवण्याचा विडा उचलला, महिला पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र; कारण काय?

ते म्हणाले, शिवसेना पक्षात अनेक वर्षांपासून या महिला चांगले काम करत असताना आपण पाहिले आहे. त्यांनी जिल्ह्यात आणि शहरात एक चळवळ उभी केली. अनेक घटनांना, प्रसंगांना सामोरे जात वाघिणीसारखे तोंड दिले. मात्र शिवसेनेमध्ये यांच्या कामाची कधीही दखल घेतली गेली नाही, त्यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले गेले, महिलांनी केलेल्या अनेक आंदोलनामुळे गुन्हे दाखल झाले. त्यासंबंधी त्यांना पक्षाने सहकार्य केले नाही. त्यामुळे या महिला पदाधिकाऱ्यांनी योग्य निर्णय घेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. एक चांगली काम करणारी टीम आता राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली, असल्याचे जगताप म्हणाले.

विजयसिंह होलम

लेखकाबद्दलविजयसिंह होलमविजयसिंह होलम, ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. पत्रकारितेमधील २२ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी विषयक आणि चालू घडामोडींच्या विषयांवर वेळोवेळी विश्लेषणात्मक लिखाण करतात. पत्रकारितेतील अनुभवांसंबंधी पुस्तकाचेही लेखन…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.