Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

एकुलत्या मुलाच्या निधनाने कुटुंबावर दु:खाचा डोंगर, पण आई-वडिलांचा मोठा निर्णय, तिघांना नवजीवन

2

Nagpur Brain Dead Boy Organ Donation : एका तरुणाच्या मृत्यूनंतर त्याच्या आई-वडिलांनी एकुलत्या एका मुलाचं अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. तरुणाच्या अवयवदानामुळे तिघांना जीवदान मिळालं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : सर्वत्र दिवाळीचा आनंद साजरा होत असतानाच नागपूरमध्ये एकुलत्या एका मुलाच्या निधनाने एका कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. अपघाती मृत्यू झालेल्या अठरा वर्षाच्या एकुलत्या एक मुलाचे अवयवदान करण्याचा प्रसंग माता-पित्यावर ओढवला. या तरुणाच्या अवयवदानामुळे तिघांच्या आयुष्यात नवा प्रकाश पडला आहे. आदित्य धनजोडे असे अवयवदान केलेल्या तरुणाचे नाव आहे.

मुलाला मेंदूमृत घोषित केलं

मौदा तालुक्यातील इसापूर येथील आदित्य हा अकरावीचा विद्यार्थी होता. गणपत आणि अंजली या दाम्पत्याचा तो एकुलता एक मुलगा. २८ ऑक्टोबरला मौदा- भंडारा मार्गावर त्याच्या दुचाकीला अपघात झाला. अज्ञात व्यक्तीने कुटुंबाला कळवल्यावर त्याला मौदा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती खालावत असल्याचे पाहून त्याला नागपूरला न्यू ईरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे एक दिवस उपचार सुरू होते, मात्र मुलाकडून डॉक्टरांच्या उपचारांना प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे डॉ. निलेश अग्रवाल, डॉ. पराग मून, डॉ. विवेक देशपांडे या तज्ज्ञांच्या चमूने त्याला मेंदूमृत घोषित केले.
Mumbai News : ५० डॉक्टरांची टीम, १० तास शस्त्रक्रिया; ‘केईएम’ रुग्णालयाने यशस्वी हृदयप्रत्यारोपण करत रचला इतिहास

एकुलत्या एका मृत मुलाचं अवयवदान, तिघांना जीवदान

न्यू ईरामधील अवयवदान समन्वयक डॉ. अश्विनी चौधरी यांनी नातेवाईकांना अवयवदानाचे महत्त्व समजावून सांगितले. आई-वडिलांनी संमती दिल्यावर विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीला कळवण्यात आले. तेथील समन्वयक दिनेश मंडपे यांनी प्रतीक्षा यादीनुसार अवयव वाटप निश्चित केले. त्यानंतर यकृत न्यू ईरामध्ये ६० वर्षाच्या महिलेला देण्यात आले. मृत आदित्यची एक किडनी तेथेच ३५ वर्षाच्या पुरुषावर, तर दुसरी किडनी व्होकहार्टमध्ये २६ वर्षाच्या पुरुष रुग्णावर प्रत्यारोपित करण्यात आली. न्यू ईरातर्फे आदित्यला श्रद्धांजली वाहून पार्थिव मृत तरुणाच्या मूळ गावी पोहचवण्याची नि:शुल्क व्यवस्था करण्यात आली.
Organ Donation : बाराव्या वर्षी वैदेही गेली, पण चौघांना नवं आयुष्य देऊन, मुंबईकर बालिकेच्या पालकांचा स्तुत्य निर्णय

Nagpur News : एकुलत्या मुलाच्या निधनाने कुटुंबावर दु:खाचा डोंगर, पण आई-वडिलांचा मोठा निर्णय, तिघांना नवजीवन

आदित्यच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांनी घेतलेल्या त्याच्या अवयवदानाच्या निर्णयामुळे इतर तीन लोकांना जीवदान मिळालं आहे. आदित्यच्या निधनानंतरही तो त्याच्या अवयवदानाच्या माध्यमातून जीवंत राहिल. त्याच्या आई-वडिलांनी केलेल्या या कृत्याने तिघांना नवजीवन मिळालं आहे.

करिश्मा भुर्के

लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.