Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Sindhudurg Fire: सिंधुदुर्गात बेकरीला भीषण आग, नगराध्यक्षांचं कार्यालयही जळून खाक, धडकी भरवणारे फोटो समोर

11

Sindhudurg Bekari caught fire: सिंधुदुर्गात एका बेकरीला पहाटेच्या सुमारास आग लागल्याची भीषण घटना घडली. यामध्ये बेकरीचं मोठं नुकसान झालं आहे तर नगराध्यक्ष समीर नलावडे यांचं कार्यालयही जळून खाक झालं आहे.

Lipi

प्रसाद रानडे, सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली येथील आर बी बेकरी या दुकानाला पहाटेच्या सुमारास मोठी आग लागल्याने बेकारीसह एक मेडिकल या आगीत भस्मसात झाले आहे. तसेच, नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे कार्यालयही या आगीच्या भक्षस्थानी पडले आहे. ही घटना आज शुक्रवारी (१ नोव्हेंबर) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती आहे. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या काही नागरिकांना ही आग लागल्याचे लक्षात आले. त्यामुळे तात्काळ प्रशासनाला या सगळ्याची माहिती देऊन येथील व्यापारी आणि नागरिकांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

कणकवली, मालवण, कुडाळनमधून अग्निशमन दलाला पाचारण

या आगीचे भीषण रौद्ररूप पाहून तात्काळ कणकवली येथील अग्निशम दलाच्या बंबाबरोबरच मालवण, कुडाळ एमआयडीसी येथील अग्निशमन दलाच्या बंबानाही पाचारण करण्यात आले होते. सकाळी सात ते आठ ते नऊ वाजण्याची सुमारास ही आग पूर्णपणे विझवण्यात यश आलं आहे. ऐन दिवाळीच्या सणातच कणकवली शहरात अग्नीतांडव पाहायला मिळालं यामुळे लाखो रुपयांची हानी झाली आहे. सुदैवाने यामध्ये कोणतेही जीवित हानी झालेली नाही.
UP News: अंधारमय दिवाळी! घराबाहेर सिलिंडरचा स्फोट, हात तुटून लांब फेकला गेला, पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर
ही आग लागल्याची माहिती कळताच तात्काळ नगराध्यक्ष समीर नलावडे, नगरसेवक अबित नाईक, मंदार मराठे, राजू गवाणकर, राजा कामत, अमेय नायर, भूषण वाडेकर, बाळू सवादे, संजय मालंडकर, चंदू कांबळी, मेडिकल स्टोरचे दादा बर्डे, गवाणकर बंधू आदी व्यापारी स्थानिकांनी ही आग विझवण्यासाठी तात्काळ घटनास्थळी दाखल होत धावपळ करत ही आग विझविण्यासाठी पुढाकार घेतला होता.

Sindhudurg Fire: सिंधुदुर्गात बेकरीला भीषण आग, नगराध्यक्षांचं कार्यालयही जळून खाक, धडकी भरवणारे फोटो समोर

कणकवली शहरातील अप्पासाहेब पटवर्धन या मुख्य चौकाच्या परिसरातच ही मोठी बेकरी आहे. शॉर्टसर्किटमुळे ही मोठी आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या आगीत बेकरीचे साहित्य फर्निचर जळून खाक झाले आहे. बाजूलाच बर्डे यांचे मेडिकल स्टोर आहे, हे मेडिकल स्टोर हे या आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असून लाखो रुपयांची हानी झाली आहे. यावेळी कणकवली पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासनाचे कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले होते.

नुपूर उप्पल

लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.