Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मासिक अंक ज्योतिष नोव्हेंबर 2024: या जन्मतारखेच्या लोकांना धनलाभासह ऑफिसच्या कामात प्रगती! मोठे बदल टेन्शन वाढविणार ! वाचा अंकशास्त्रानुसार नोव्हेंबरचे राशीभविष्य

12

Numerology Horoscope, November 2024: नोव्हेंबर महिन्यात सूर्य आणि बुधाची वृश्चिक राशीत युती होणार असून बुधादित्य राजयोग तयार होतोय. त्याचा लाभ सर्व मूलांकांना होणार आहे. मूलांक १ साठी नोव्हेंबर महिना भागीदारीतील व्यवसायात लाभदायक आहे. मूलांक २ च्या जातकांना मेहनतीमुळे उत्तम यश मिळेल. मूलांक ४ साठी व्यवसायात उत्तम यश तर मूलांक ६ च्या लोकांना नवीन प्रकल्पात यश मिळणार असून तुमचे सगळीकडे कौतुक होणार आहे. मूलांक ९ च्या जातकांचा प्रोजेक्टवर तुमचा पूर्ण कंट्रोल असेल. चला तर जन्मतारखेनुसार मूलांक १ ते मूलांक ९ असलेल्या लोकांना नोव्हेंबर महिना कसा जाईल ते जाणून घेऊ.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
मासिक अंक ज्योतिष नोव्हेंबर 2024: या जन्मतारखेच्या लोकांना धनलाभासह ऑफिसच्या कामात प्रगती! मोठे बदल टेन्शन वाढविणार ! वाचा अंकशास्त्रानुसार नोव्हेंबरचे राशीभविष्य

November 2024 Monthly Ank Rashifal : नोव्हेंबर महिन्यात मूलांक 1 मूलांक 2 सह या मुलांकासाठी नोव्हेंबर अतिशय उत्तम आहे. व्यवसायात यश, नोकरीमध्ये प्रगती असून कुटुंबात वातावरण चांगले असेल. तुम्ही घरातल्यांना उत्तम वेळ देणार आहात. अहंकाराची बाधा होवू देऊ नका तसेच आळस सोडा आणि कामाला लागा. चला तर जाणून घेऊया, जन्मतारीखानुसार मूलांक 1 ते 9 असलेल्या लोकांसाठी नोव्हेंबर महिना कसा राहील.

मूलांक 1 (जन्म तारीख १, १०, १९, २८): भागीदारीतील काम लाभदायक

नोव्हेंबर महिन्यात कार्य क्षेत्रात उन्नती होणार आहे तसेच मान-सन्मान वाढेल. भागीदारीत केलेले कार्य तुमच्यासाठी शुभ फलदायक असेल. आर्थिक दृष्ट्या वेळ अनुकूल असून गुंतवणुकीतून फायदा होईल. या महिन्यात भविष्याच्या दृष्टीकोनातून गुंतवणूक कराल. व्यवसायात नव्या योजना लाभदायक आहेत. लवलाइफ ओके असेल.

मूलांक 2 (जन्म तारीख २, ११, २०, २९): मेहनतीमुळे उत्तम यश

नोव्हेंबर महिन्यात कार्यक्षेत्रात प्रगती असून मेहनतीच्या जोरावर तुम्हाला उत्तम यश मिळेल. मोठ्या व्यक्तींचे आशीर्वाद तुमच्या सोबत आहेत त्यामुळे प्रत्येक काम मार्गी लागेल. प्रेमसंदर्भात नाते अधिक दृढ होईल. आर्थिक बाबतीत तुमच्या विचारांवर ठाम राहा म्हणजे चांगले परिणाम मिळतील. नोव्हेंबरच्या अखेरीस दानधर्म केल्यामुळे तुम्हाला शुभ परिणाम दिसून येतील.

मूलांक 3 (जन्म तारीख ३, १२, २१, ३०): अहंकार बाजूला ठेवा, कामाला लागा

नोव्हेंबर महिन्यात संयम ठेवणे अत्यंंत गरजेचे आहे. कोणताही निर्णय घेताना पुन्हा एकदा विचार करा. कार्यक्षेत्रात अहंकारामुळे तुमचे काम होणार नाही त्यामुळे अहंकाराला दूर ठेवा. व्यवसायात टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत संवादाने काही प्रश्न मार्ग लागतील. नोव्हेंबरच्या अखेरीस महिलेमुळे तुमचे टेन्शन वाढणार आहे.

मूलांक 4 (जन्म तारीख ४, १३, २२, ३१): व्यवसायात उत्तम यश

नोव्हेंबर महिन्यात कार्यक्षेत्रात प्रगती असून तुमचा मान-सन्मान वाढणार आहे. व्यवसायात उत्तम यश मिळणार आहे. आर्थिक बाबतीत गुंतवणुकि संदर्भात मन संभ्रमात राहील पण काळजी करू नका सगळं काही ठिक होईल. प्रवासात शुभलाभ आहे त्यामुळे काळजी नसावी. लवलाइफमध्ये बेचैनी वाढू शकते. आरोप-प्रत्योरोप होवू शकतात तेव्हा सतर्क राहा. नोव्हेंबरच्या अखेरीस परिस्थिती अनुकूल असेल.

मूलांक 5 (जन्म तारीख ५, १४, २३): प्रोजेक्ट पूर्ण करण्यास वेळ लागेल

नोव्हेंबर महिन्यात लवलाइफ उत्तम आहे. आर्थिक बाबतीत वेळ अनुकूल असून धनलाभाचे योग आहेत. कार्यक्षेत्रातही हळूहळू प्रगती होईल आणि प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी तुम्हाला वेळ लागणार आहे. या महिन्याच्या अखेरीस परिस्थिती अनुकूल असेल फक्त फार भावूक होवू नका.

मूलांक 6 (जन्म तारीख ६, १५, २४): नवीन प्रकल्पात यश, कौतुक होणार

नोव्हेंबर महिन्यात कार्यक्षेत्रात प्रगती असून नवीन प्रकल्प तुमच्यासाठी यशाचा मार्ग खुला करणार आहे. तुमची प्रगती होणार असून तुमचे कौतुक होईल. क्रिएकटीव्ह कामात यश मिळेल. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. आर्थिक बाबतीत सुधारणा असून महिन्याच्या शेवटी काही कारणामुळे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.

मूलांक 7 (जन्म तारीख ७, १६, २५): प्रोजेक्टमध्ये सकारात्मक बदल

नोव्हेंबर महिन्यात व्यवसाय आणि नोकरीत प्रगती आहे. प्रोजेक्टमध्ये सकारात्मक बदल दिसतील. आर्थिक बाबतीत धन लाभाचे मजबूत योग असून अचानक पेंडीग पेमेट मिळणार आहे. लवलाइफमध्ये संयम महत्त्वाचा आहे तरच सुखसमृद्धीचे योग जुळून येतील. महिन्याच्या अखेरीस तुम्हाला सुख शांती समाधान मिळेल.

मूलांक 8 (जन्म तारीख ८, १७, २६): प्रत्येक समस्येवर मात कराल

आर्थिक बाबतीत वेळ अनुकूल असून धनलाभाचे योग आहेत. तुमच्या व्यवहार कौशल्याने तुम्ही प्रत्येक समस्येवर मात कराल. प्रेमसंबंधात नाते अधिक वृद्धींगत होईल. ऑफिसच्या कामात आळस करू नका. आळस सोडा आणि कामाला लागा. या महिन्याच्या अखेरीस ज्येष्ठांचे आशिर्वाद तुमचे पाठबळ वाढवतील. सकारात्मक विचारात वाढ होईल.

मूलांक 9 (जन्म तारीख ९, १८, २७): प्रोजेक्टवर तुमचा पूर्ण कंट्रोल असेल

कार्यक्षेत्रात प्रगती होणार आहे. तसेच तुम्ही जे काम करत आहात त्यावर तुमचा पूर्ण कंट्रोल राहील. आर्थिक बाबतीत खर्च जास्त होत आहेत तेव्हा काळजी घ्या. गुंतवणुकीवर कटाक्षाने लक्ष द्या त्यामुळे भविष्यात फार टेन्शन येणार नाही. प्रेमसंबंधात एकटेपणा जाणवू शकतो आणि काही कारणाने मन अशांत होवू शकते. नोव्हेंबरच्या अखेरीस अचानक कोणत्या तरी कारणाने तुमचे कष्ट वाढू शकतात.

अनिता किंदळेकर

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.