Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
आर्थिक राशिभविष्य 3 नोव्हेंबर 2024: भाऊबीज! वृषभ राशीची मनोकामना पूर्ण! मिथुन राशीला आवडीचे काम करण्याची संधी ! पाहा, तुमचे राशिभविष्य
Finance Horoscope Today 3 November 2024 In Marathi : 3 नोव्हेंबर, रविवार आणि भाऊबीज असून आज प्रत्येक राशीला शुभलाभाचे योग आहेत. आर्थिक प्रगती होईल पण कामात फोकस आणि मेहनत महत्त्वाची आहे. विशेष मानसन्मान आणि भौतिक गोष्टीत प्रगती आहे. मेष, वृषभसह या राशीसाठी दिवस उत्तम असून नवीन प्रोजेक्ट सुरु होतील. आवडीचे काम करण्याची संधी मिळेल.चला तर करिअर आणि आर्थिक बाबतीत आजचा दिवस कसा असेल ते पाहूया.
मेष आर्थिक राशिभविष्य : विशेष मानसन्मान मिळणार
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास असून तुम्हाला विशेष मानसन्मान मिळणार आहे. भौतिक प्रगतीच्या बाबतीत दिवस चांगला आहे. व्यवसायात महत्त्वाची डिल फायनल होणार आहे. एखाद्या मंगल कार्यात सहभागी व्हाल. समाजात चांगल्या कामासाठी खर्च करणार आहात. तुम्ही जे काम कराल ते यशस्वी होईल.
वृषभ आर्थिक राशिभविष्य : नवीन योजनेत यश, मनोकामना पूर्ण होतील
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असून नवीन योजना सफल होतील. कोणत्यातरी देवस्थानाची यात्रा मनाला शांतता आणि समाधान देईल. कायदेशीर वादात यश आहे. तसेच तुम्ही रिलोकेशनचा विचार करत असाल तर त्यावर ठाम निर्णय घ्याल. आज दिवसभर काही अडचणी त्रास देतील पण तुम्ही त्यातून मार्ग काढाल. तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. कार्यक्षेत्रात तुम्हाला अनुकूल वातावरण तयार होईल.
मिथुन आर्थिक राशिभविष्य : आवडीचे काम करण्याची संधी
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असून तुम्ही क्रिएटिव्ह आणि आर्टिस्टिक कामात दिवस व्यतीत करणार आहात. तुम्हाला जे आवडते ते काम करण्याची संधी मिळेल. तुम्ही रिलॅक्स फिल कराल. तुमचे वरिष्ठ तुम्हाला मदत करतील त्यामुळे कामे पटापट मार्गी लागतील. सकारात्मक विचारात वाढ होईल.
कर्क आर्थिक राशिभविष्य : अपूर्ण कामे पूर्ण होणार
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस छान असून तुम्ही जे काही काम कराल त्यात तुम्हाला यश मिळेल. तुमची अपूर्ण कामे पूर्ण होतील तसेच काही महत्त्वाच्या चर्चांमधून प्रश्न सुटतील. कार्यक्षेत्रात तुमच्या विचारांनुसार वातावरण असेल. तसेच तुमचे सहकारी तुम्हाल सहकार्य करतील. रात्री एखाद्या मंगलकार्यात सहभागी होणार आहात.
सिंह आर्थिक राशिभविष्य : दिवसभर व्यस्त, दानधर्म करणार
सिंह राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस चांगला असून दिवसभर तुम्ही व्यस्त राहणार आहात. आज तुम्ही आध्यत्मिक कामासाठी वेळ काढाल. कार्यक्षेत्रात वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करतील. संध्याकाळी एखाद्या शुभ कार्यात सहभागी होणार आहात.
कन्या आर्थिक राशिभविष्य : वादविवादापासून दूर राहा
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ठिक आहे पण तुम्हाल सावध रहावे लागेल. तुमच्या आसपास जे लोक आहेत त्यांच्यासोबत वादविवाद होणार नाही याची काळजी घ्या. कोणत्यातरी शुभ कार्याची चर्चा आज होवू शकते. नशिबावर विश्वास ठेवा आणि आत्मविश्वासाने काम करा, तुम्हाला नक्की यश मिळेल. संध्याकाळी परिस्थिती तुम्हाला अनुकूल अशी असेल.
तुळ आर्थिक राशिभविष्य : नवीन प्रोजेक्टवर काम सुरू होईल
तुळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असून कार्यक्षेत्राशी संबंधीत सर्व वादांवर तोडगा निघणार आहे. नवीन प्रोजेक्टवर काम सुरू होऊ शकते. जमीन- मालमत्ता या संदर्भात नातेवाईक आणि आसापसचे लोक अडचणी निर्माण करतील. प्रवासाचा योग असून प्रवास सफल होईल.
वृश्चिक आर्थिक राशिभविष्य : कार्यक्षेत्रात नवीन गोष्टी लाभदायक
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आर्थिक परिस्थितीच्या दृष्टीने उत्तम आहे. दिवसभर शुभलाभाचे योग असून तुमचे कौतुक होईल. तुमच्या कामात फोकस असू दे म्हणजे काम पटापट मार्गी लागेल. नोकरी किंवा व्यवसायात काही नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला लाभ होईल. तुमच्या कामात एक वेगळा उत्साह असेल.
धनू आर्थिक राशिभविष्य : कामे करताना सावध राहा
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ठिक आहे पण कोणतेही काम करताना सावधगिरी आणि सतर्कता ठेवा. व्यवसायात थोडी रिस्क घेतल्याशिवाय लाभ मिळत नाही हे लक्षात ठेवा. काही नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला लाभ होईल. आज जवळच्या व्यक्तीसाठी पैशांची व्यवस्था करावी लागेल. नवीन आणि लाभदायक संधी आजूबाजूला आहेत त्या ओळखा आणि त्याचा लाभ घ्या.
मकर आर्थिक राशिभविष्य : अनेक कामे एकत्र झाल्याने चिडचिड होणार
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य आहे. भागीदारीत केलेला व्यवसाय लाभदायक आहे. घरगुती कामे पूर्ण करण्यासाठी दिवस उत्तम आहे. मुलांच्या बाबतीत तुम्ही काही ठोस निर्णय घेणार आहात. नियमांचे पालन करा आणि आज जे काही काम कराल त्यात प्रामाणिक राहा. आज खूप कामे एकसाथ आल्यामुळे तुमची चिडचिड होवू शकते.
कुंभ आर्थिक राशिभविष्य : घाईत निर्णय घेवू नका, कामात फोकस हवा
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ठिक आहे पण तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. हवामान बदलामुळे काही आजार डोके वर काढतील. खाण्यापिण्याच्या बाबतीत सतर्क राहा आणि जंक फूड खावू नका. व्यापाऱ्यांसाठी दिवस उत्तम असून निर्णय घेताना घाई करू नका. प्रत्येक काम विचारपूर्वक करा.
मीन आर्थिक राशिभविष्य : समस्या सुटतील, वाणीवर नियंत्रण ठेवा
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभलाभाचा आहे. तुम्ही व्यवसायात जोखीम घेतल्यामुळे तुम्हाला उत्तम लाभ होईल. समस्या सुटतील फक्त वाणीवर नियंत्रण ठेवा. तुमचे वर्तन सुधारा. तुम्ही बुद्धी चातुर्याचा वापर करून जे हवे आहे ते प्राप्त करु शकता. आज एखाद्या गरजवंताला किंवा संकटात सापडलेल्या व्यक्तीला मदत करा.