Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Weekly Love Horoscope 4 to 10 November 2024 : मेषसह ३ राशींनी संयम राखा! प्रेमात चिंता वाढेल, कसा असेल प्रेमी जोडप्यांसाठी येणारा आठवडा?

14

Saptahik Love Rashifal 4 to 10 November 2024 : नोव्हेंबरच्या या आठवड्यात समसप्तक योग तयार होत आहे. त्यामुळे शुक्र आणि गुरुचे राशी परिवर्तन योग तयार आहे. मेषसह ३ राशींनी संयम राखा, प्रेमात चिंता वाढेल. कोणत्याही गोष्टीला जास्त महत्त्व देऊ नका. जोडीदाराशी प्रेमाने वागा. जोडीदारासोबत बाहेर जाण्याचा निर्णय घ्याल. जाणून घेऊया मेष ते मीन पर्यंतच्या १२ राशींचे प्रेम राशीभविष्य सविस्तर.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
Weekly Love Horoscope 4 to 10 November 2024 : मेषसह ३ राशींनी संयम राखा! प्रेमात चिंता वाढेल, कसा असेल प्रेमी जोडप्यांसाठी येणारा आठवडा?

Saptahik Love Rashifal :
नोव्हेंबरच्या या आठवड्यात समसप्तक योग तयार होत आहे. त्यामुळे शुक्र आणि गुरुचे राशी परिवर्तन योग तयार आहे. मेषसह ३ राशींनी संयम राखा, प्रेमात चिंता वाढेल. कोणत्याही गोष्टीला जास्त महत्त्व देऊ नका. जोडीदाराशी प्रेमाने वागा. जोडीदारासोबत बाहेर जाण्याचा निर्णय घ्याल. प्रेम जीवनात आनंदी व्हाल. तुम्हाला या काळात हिंमत्तीने काम करावे लागेल. जोडीदारासोबत प्रवास करण्याची योजना आखाल. जीवनात सुख-समृद्धीचे शुभ संयोग घडतील. प्रेम जीवनात समतोल राखून व्यवस्थापित केले तर तुम्ही आनंदी व्हाल. प्रेम जीवन रोमँटिक होईल. जाणून घेऊया नोव्हेंबर महिन्यातील या आठवड्याचे साप्ताहिक प्रेम भविष्य.

मेष साप्‍ताहिक प्रेम भविष्य: संयम राखा

मेष राशीच्या लोकांना हा आठवडा प्रेमाच्या बाबतीत शांततापूर्ण असेल. नातेसंबंधातील समस्या संयमाने सोडवाल. कोणत्याही गोष्टीला जास्त महत्त्व देऊ नका. जोडीदाराशी प्रेमाने वागा. जोडीदारासोबत बाहेर जाण्याचा निर्णय घ्याल. प्रेम जीवनात आनंदी व्हाल.

वृषभ साप्‍ताहिक प्रेम भविष्य: प्रेमजीवनात चिंता वाढेल

या आठवड्यात प्रेम जीवनातील एखाद्या गोष्टीबाबत थोडी चिंता वाटेल. प्रेम जीवनातील निर्णयाबाबत संशयित असाल. तुम्हाला या काळात हिंमत्तीने काम करावे लागेल. जोडीदारासोबत प्रवास करण्याची योजना आखाल.

मिथुन साप्‍ताहिक प्रेम भविष्य: नाते सुधारेल

हा आठवडा प्रेमाच्या बाबतीत संमिश्र राहिल. प्रेम जीवनात काही धाडसी निर्णय घेतल्याने तुम्ही आनंदी व्हाल. जोडीदारासोबतचे नाते सुधारेल. जीवनात सुख-समृद्धीचे शुभ संयोग घडतील. प्रेम जीवनात समतोल राखून व्यवस्थापित केले तर तुम्ही आनंदी व्हाल. प्रेम जीवन रोमँटिक होईल.

कर्क साप्‍ताहिक प्रेम भविष्य: मन अशांत राहिल

कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रेमसंबंधांच्या दृष्टीने शुभ आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला रोमान्स प्रवेश करेल. उत्तरार्धात तुमचे मन अशांत राहिल. कोणत्याही प्रकारच्या बाह्य हस्तक्षेपामुळे जोडीदाराशी भांडण होऊ शकते. काळजीपूर्वक बोला.

सिंह साप्‍ताहिक प्रेम भविष्य: संयम ठेवा

सिंह राशीच्या लोकांसाठी परस्पर प्रेम संबंधांच्या बाबतीत आनंद वाढेल. इच्छुकांचे लग्न जमेल. आयुष्यात प्रगती होईल. उत्तरार्धात तुमचे मन काही गोष्टींबद्दल अस्वस्थ राहाल. प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. प्रत्येक कामात संयमाने वागावे लागेल.

कन्या साप्‍ताहिक प्रेम भविष्य: चिंता वाढेल

कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अस्वस्थतेने भरलेला राहिल. तुम्हाला काही समस्या येऊ शकतात. ज्यामुळे चिंता वाढेल. सुरुवातीला प्रेम जीवनात अस्वस्थता वाढू शकते. तुमचे मन अस्थिर राहिल. चांगले परिणाम दिसून येतील. प्रेम जीवनात आनंद आणि समृद्धीचे शुभ संयोग घडतील. जोडीदारासोबत नवीन काहीतरी करण्याचा विचार कराल.

तुळ साप्‍ताहिक प्रेम भविष्य: मन प्रसन्न राहिल

प्रेमाच्या दृष्टीने हा आठवडा शुभ राहिल. मातृत्व स्त्रीमुळे प्रेमात समस्या वाढतील. जोडीदाराशी काही कारणाने दूरावा येईल. सप्ताहाच्या उत्तरार्धात कोणत्या स्त्रीच्या मदतीने जीवनात सुख-समृद्धीचे शुभ संयोग निर्माण होतील. मन प्रसन्न राहिल. प्रेम जीवनात तुम्हाला आनंद आणि समृद्धी मिळेल.

वृश्चिक साप्‍ताहिक प्रेम भविष्य: सुख-समृद्धी येईल

वृश्चिक राशीच्या लोकांचा हा आठवडा रोमँटिक राहिल. हा आठवडा जीवनात सुख-समृद्धीचे शुभ संयोग निर्माण होतील. प्रेम जीवनात नियंत्रण ठेवाल. तुम्हाला कुठून तरी चांगली बातमी मिळेल.

धनु साप्‍ताहिक प्रेम भविष्य: संयम ठेवून निर्णय घ्या

धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रेम जीवनात अतिशय सामान्य असेल. सर्वकाही मनाप्रमाणे होईल. लव्हा लाईफमध्ये संयम ठेवून निर्णय घ्या. शांतता आणि आनंदी जीवन जगाल. जोडीदाराला प्रेमाने काही सांगाल.

मकर साप्‍ताहिक प्रेम भविष्य: जपून बोला

मकर राशीच्या लोकांच्या प्रेम जीवनात अहंकाराचा संघर्ष वाढेल. कुणाशीही बोलताना शहाणे व्हा. जोडीदाराशी बोलताना जपून बोला. मनात एखाद्या गोष्टीबद्दल गैरसमज निर्माण होतील. प्रेमसंबंधात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करा.

कुंभ साप्‍ताहिक प्रेम भविष्य: प्रेमसंबंधात चांगली बातमी मिळेल

हा आठवडा कुंभ राशीच्या लोकांसाठी चांगला असेल. परस्पर प्रेम संबंध दृढ होतील. प्रेम जीवन रोमँटिक होईल. तुम्हाला प्रेमसंबंधात काही चांगली बातमी मिळू शकते. लव्ह लाईफबद्दल चिंता वाढेल. अनुभवी लोकांचा सल्ला घ्यावा लागेल.

मीन साप्‍ताहिक प्रेम भविष्य: मन प्रसन्न राहिल.

मीन राशीच्या लोकांना प्रेम संबंधात फायदा होईल. तुमचे प्रेम संबंध दृढ होतील. प्रेम जीवनात शांतता राहिल. तुमच्या आयुष्यात प्रणय प्रवेश करेल. नातेसंबंध सुधारतील. ज्यामुळे मन प्रसन्न राहिल.

कोमल दामुद्रे

लेखकाबद्दलकोमल दामुद्रेकोमल दामुद्रे मागच्या साडेचार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये लिखाण करत आहे. लाईफस्टाइल, टेक, ऑटो, धार्मिक, प्रवास आणि बिझनेस क्षेत्रातील विविध विषयांवर लिखाण. मागच्या दोन वर्षांपासून धार्मिक विषयांवर लिखाण करत आहे. कालनिर्णयमध्ये संपादकीय सहाय्यक. कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक, कालनिर्णय मुख्य एडिशन, कालनिर्णय आरोग्य व कालनिर्णय स्वादिष्ट यावर काम करण्याचा अनुभव. यापूर्वी कोमलने २०१९ मधील लोकसभा निवडणुकांसाठी पीआर म्हणून काम केले. कोमल ला कामाव्यतिरिक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून कविता आणि लेख लिहायला आवडतात. नवीन पुस्तके आणि धार्मिक गोष्टी वाचण्यात अधिक रस…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.