Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मविआच्या अडचणी वाढणार! वंचितचा उमेदवार वाढवणार काँग्रेसच्या दिग्गज नेत्याचं टेन्शन? संगमनेरात आंबेडकरी तोफ धडाडणार

10

Sangamner Assembly Constituency : संगमनेरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारामुळे महाविकास आघाडीट्या नेत्याचं टेन्शन वाढलं आहे. प्रचारासाठी आंबेडकरी तोफ धडाडणार असल्याने ते नेमका काय संवाद साधणार याकडे अनेकांचं लक्ष आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

संगमनेर, मोबीन खान : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून अनेक ठिकाणी प्रचाराला वेग आला आहे. अनेक ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडीमधील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून संगमनेर विधानसभा मतदारसंघात देखील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने महाविकास आघाडीचे उमेदवार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे टेन्शन वाढवले आहे. वंचितचा उमेदवार उभा असल्याने काँग्रेसचे मातब्बर नेते बाळासाहेब थोरात अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यातच प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर विजयी संकल्प सभा घेणार असून संगमनेरात आंबेडकरी तोफ धडाडणार आहे.
Sharad Pawar : ३० वर्ष जबाबदारी, तरी कामं झालं नाही; आता नेतृत्व बदलण्याची गरज, शरद पवारांचा अजितदादांवर निशाणा

महाविकास आघाडीसमोर वंचितचं आव्हान

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमुळे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीला मोठा फटका बसला होता. त्यांनंतर आघाडीच्या नेत्यांकडून वंचित भाजपची बी टीम असल्याच्या प्रतिक्रिया समोर आल्या. वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार असल्याने काँग्रेसची वोट बँक असलेले दलित मुस्लिम मतांचा विभाजन होत असल्याचे यापूर्वी अनेक काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांसमोर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचेही तगडे आव्हान असणार आहे. सध्या प्रकाश आंबेडकर ओबीसी, दलित मुस्लिम आदिवासींसाठी प्रामाणिक भूमिका मांडत असल्याने त्यांचा फॅक्टर या निवडणुकीत किती उपयोगी ठरणार? हे पाहणं महत्त्वाचं असेल.
Raigad News : निवडणुकीच्या तोंडावर भाजपची मोठी कारवाई, बड्या नेत्याची पक्षातून हकालपट्टी; कारणही सांगितलं

मविआचा संभाव्य मुख्यमंत्री पदाचा चेहरा अडचणीत येणार?

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली, तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा संगमनेर मतदारसंघात सुरू आहेत. परंतु संगमनेर मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून अमोल खताळ यांचं तगड आव्हान असून त्यांना विखे पिता – पुत्र बळ देत आहेत. अशातच वंचित बहुजन आघाडीकडून अब्दुल अजीज ओहरा उमेदवारी करत असल्याने दलित मुस्लिम आदिवासी मतांचे विभाजन होऊन बाळासाहेब थोरात यांना याचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बाळासाहेब थोरात या निवडणुकीत अडचणीत येणार अशा चर्चा सध्या सुरू आहे.
Thane News : कोपरी – पाचपाखाडीत ठाकरे गटाची डोकेदुखी कायम, केदार दिघेंविरोधातील बंडखोरी शमवण्यात अपयश

थोरातांच्या बालेकिल्ल्यात सुजात आंबेडकरांची सभा

संगमनेर मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अब्दुल अजीज वोहरा यांच्या प्रचारार्थ वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर बुधवारी संगमनेर येथे विजयी संकल्प सभा घेणार असून सुजात आंबेडकर संगमनेरात येऊन काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मविआच्या अडचणी वाढणार! वंचितचा उमेदवार वाढवणार काँग्रेसच्या दिग्गज नेत्याचं टेन्शन? संगमनेरात आंबेडकरी तोफ धडाडणार

प्रकाश आंबेडकरही प्रचारासाठी मैदानात उतरणार

गेल्या काही दिवसांपासून प्रकृती स्थिर नसल्याने वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर रुग्णालयात उपचार घेत होते, मात्र सध्या त्यांच्या प्रकृतीत सुधार झाल्याने आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून लवकरच प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे.

करिश्मा भुर्के

लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.