Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे अंकभविष्य, 9 नोव्हेंबर 2024: स्वतः निर्णय घ्या, तो दुसऱ्यांसमोर ठेवा ! टेन्शन आरोग्यासाठी घातक, सकारात्मक विचार करा ! जाणून घ्या, अंकशास्त्रानुसार तुमचे राशीभविष्य

9

Numerology Prediction, 9 November 2024 : 9 नोव्हेंबर, मूलांक 1 चे जातक अडचणीतून मार्ग काढतील तसेच संकटात मदत मिळेल. मूलांक 2 च्या लोकांनी स्वतः निर्णय घ्यावा आणि तो दुसऱ्यांसमोर ठेवावा. मूलांक 4 ने लवलाइफमध्ये सावध रहावे. मूलांक 6 साठी छोट्या गोष्टींचे टेन्शन घेणे हानिकारक ठरु शकते.मूलांक 8 च्या लोकांना संकटात मित्रांची मदत मिळेल. मूलांक 9 चे जातक वेगाने प्रगती करतील पण रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. आज मूलांक 1 ते 9 साठी आजचा दिवस कसा आहे? तुमचा मूलांक काय सांगतो?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
आजचे अंकभविष्य, 9 नोव्हेंबर 2024: स्वतः निर्णय घ्या, तो दुसऱ्यांसमोर ठेवा ! टेन्शन आरोग्यासाठी घातक, सकारात्मक विचार करा ! जाणून घ्या, अंकशास्त्रानुसार तुमचे राशीभविष्य

Aajche Ank bhavishya, 9 November 2024: 9 नोव्हेंबर, मूलांक 1 सह या मूलांकासाठी दिवस ठिक असून मेहनत केली तर सफलता मिळेल. मूलांक 6 सह या मूलांकांच्या लोकांनी फार टेन्शन घेवू नये तसेच वादविवादापासून दूर राहावे. या मूलांकाच्या लोकांनी संकटात मित्रांची मदत मिळेल. मूलांक 1 ते 9 या क्रमांकाचे कोणते लोक आज भाग्यशाली आहेत ते पाहूया.

मूलांक 1 – अडचणीतून मार्ग काढाल, मदत मिळणार

मूलांक 1 असलेल्यांसाठी आजचा दिवस ठिक असून तुम्ही खूप दिवसांपासून ज्या गोष्टीची वाट पाहत होतात ती होणार. तुम्हाला प्रत्येक कामात यश आहे तसचे सकारात्मक विचार तुमच्या मनात येतील. तुम्हाला अडचणीतून बाहेर येण्यासाठी मार्ग सापडेल आणि संकटात मदत मिळेल.

मूलांक 2 – स्वतः निर्णय घ्या आणि ते दुसऱ्यांसमोर ठेवा

मूलांक 2 असणाऱ्या जातकांसाठी आजचा दिवस ठिक आहे पण तुमच्या मनातील गोष्टी इतरांना सांगू नका, त्यात तुमचे नुकसान आहे तसेच समोरची व्यक्ती तुम्हाला समजून घेणार नाही. तुम्ही स्वतः निर्णय घ्या आणि ते दुसऱ्यांसमोर ठेवा. घरात आणि ऑफिसमध्ये वातावरण ठिक असेल.

मूलांक 3 – मेहनत केली तरच सफल होणार

मूलांक 3 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस खूप मेहनतीचा आहे. तुम्हाला यश मिळवायचे असेल तर मेहनतीशिवाय पर्याय नाही. तुम्ही समस्यांचा सामना करु शकता तसचे अडचणीतून मार्ग काढू शकता. जोखीम घ्यायला हरकत नाही, पुढे चला तुम्हाला यश नक्की मिळेल.

मूलांक 4 – प्रेमाच्या बाबतीत सावध राहा

मूलांक 4 साठी आजचा दिवस ओके आहे. इतरांसोबत जुळवून घेताना थोडा त्रास होण्याची शक्यता आहे. पण काही गोष्टींचा तुमच्यावर सकारात्मक प्रभाव पडेल. प्रेमाच्या बाबतीत सावध रहा.

मूलांक 5 – कामाचा ताण जाणवेल

मूलांक 5 साठी आजचा दिवस फारसा ठिक नाही. तुमच्यावर कामाचा जास्त प्रेशर असले. कार्यक्षेत्रात कामे वाढलेली आहेत त्यामुळे तुमचा तणाव वाढेल. घाई घाईत कोणताही निर्णय घेवू नका. पैशांचे व्यवहार काळजीपूर्वक करा आणि तुमची उधारी काही प्रमाणात कमी होईल.

मूलांक 6 – छोट्या गोष्टींचे टेन्शन घेवू नका

मूलांक 6 साठी आजचा दिवस ठिक आहे पण तुम्ही लहान लहान गोष्टींची अती विचार करता. सतत टेन्शन घेणे तब्येतीसाठी घातक असून त्याचा परिणाम तुमच्या कामावर होवू शकतो. कामात तुमची काही चूक झाली असेल तर पुन्हा पुन्हा चूका करू नका. दुपारनंतर परिस्थितीत बदल होईल. तुम्हाला जसे हवे तसे वातावरण असेल.

मूलांक 7 – स्वतःसाठी धैर्याने संकटांचा सामना करा

मूलांक 7 साठी आजचा दिवस ठिक आहे पण समस्यांचा सामना करावा लागेल. तुम्हाला स्वत:साठी उभे राहण्याची गरज आहे तरच तुम्ही पुढे जाणार. तुमच्याबद्दल इतरजण काही विचार करतात त्यापेक्षा तुम्ही काय विचार करता ते महत्त्वाचे आहे. काहीतरी वेगळे केले तर यश मिळेल.

मूलांक 8 – संकटात मित्रांची मदत मिळेल

मूलांक 8 साठी दिवस चांगला असून प्रवासाचा योग आहे. तुम्हाला संकटात मित्रांची मदत मिळेल. तुम्ही काही तरी वेगळे काम करण्याचा विचार करत असाल तर त्याबद्दल नियोजन करा. मालमत्ता किंवा संपत्ती यासंदर्भात काही वाद असतील तर ते सुटतील.

मूलांक 9 – वेगाने प्रगती करणार, रागावर नियंत्रण ठेवा

मूलांक 9 साठी आजचा दिवस चांगला असून तुम्ही वेगाने पुढे जाणार आहात. तसेच तुम्हाला नवीन संधी मिळेल. एखाद्या वरिष्ठ व्यक्तीचा सल्ला तुमच्यासाठी उपयोगी ठरेल. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा.

अनिता किंदळेकर

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.