Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

साप्ताहिक अंकशास्त्र, 11 To 17 नोव्हेंबर 2024 : मूलांक 3 ऑफिसमध्ये अहंकारामुळे संघर्ष ! मूलांक 9 साठी आर्थिक स्थितीत सुधारणा ! मूलांक 1 ते 9 साठी अंकशास्त्रानुसार जाणून घ्या तुमचे राशीभविष्य

10

Weekly Numerology Prediction 11 To 17 November 2024 : नोव्हेंबर महिन्यातील हा दुसरा आठवडा आहे. या आठवड्यात शनी मार्गी होत असल्यामुळे त्याचा प्रभाव सर्व मूलांकावर पडेल. मूलांक 1 असणाऱ्यांना या आठवड्यात नोकरी-व्यवसायात यश आहे, तर मूलांक 2 चे प्रोजेक्ट यशस्वी होतील. मूलांक 4 चे जातक ऑफिसमध्ये खूप बिझी राहणार आहेत. मूलांक 5 साठी ऑफिस आणि व्यवसायात प्रगतीचे योग आहेत. मूलांक 7 चे लोक ऑफिसच्या कामात आळशीपणा करतील तर मूलांक 8 साठी कार्यक्षेत्रात प्रगतीचे शुभ योग आहेत. मूलांक 9 साठी आर्थिक स्थितीत सुधारणा आहे. तुमचा मूलाकं काय सांगतो? मूलांक 1 ते मूलांक 9 साठी आठवडा कसा असेल ते पाहूया.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
साप्ताहिक अंकशास्त्र, 11 To 17 नोव्हेंबर 2024 : मूलांक 3 ऑफिसमध्ये अहंकारामुळे संघर्ष ! मूलांक 9 साठी आर्थिक स्थितीत सुधारणा ! मूलांक 1 ते 9 साठी अंकशास्त्रानुसार जाणून घ्या तुमचे राशीभविष्य

Weekly Numerology 11 To 17 November 2024: नोव्हेंबर महिन्यातील दुसरा आठवडा असून मूलांक 1, मूलांक 2 सह या मूलांकांसाठी आठवडा चांगला आहे. नोकरी- व्यवसायात प्रगतीचे मार्ग खुले होणार आहेत. आर्थिक स्थितीत सुधारणा आहे पण खर्चाकडे कटाक्षाने लक्ष द्या. मूलांक 4 सह या मूलांकाचे लोक ऑफिसमध्ये व्यस्त राहतील. घरातील कामांकडे लक्ष देण्याची गरज आहे. चला तर जाणून घेऊया मूलांक 1 ते मूलांक 9 पैकी कोणत्या मूलांकाचे लोक या आठवड्यात भाग्यशाली ठरतील.

मूलांक 1 (जन्म तारीख १, १०, १९, २८): नोकरी-व्यवसायात यश

हा आठवडा तुमच्यासाठी नोकरी आणि व्यवसायासाठी शुभ आहे. तुमचे प्रोजेक्ट पूर्ण होणार असून उत्तम यश मिळेल. आर्थिक बाबतीत काही अडचणी आणि खर्च जास्त होण्याची शक्यता आहे. लवलाइफ चांगली आहे. आठवड्याच्या शेवटी मन उदास होवून तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे.

मूलांक 2 (जन्म तारीख २, ११, २०, २९): प्रोजेक्टमध्ये यश, धनलाभाचे योग

हा आठवडा तुमच्यासाठी चांगला असून ऑफिस आणि व्यवसायात शुभ योग आहेत. तुमचे प्रोजेक्ट यशाच्या मार्गावर पुढे जात आहेत. तुम्ही जेवढा विचार करून निर्णय घ्याल तेवढे तुम्ही अधिक यशस्वी होणार आहात. आर्थिक बाबतीत परिस्थिती अनुकूल आणि धनलाभाचे योग आहेत. लवलाइफ ठिक आहे. तुमच्या मेहनतीचे फळ आठवड्याच्या शेवटी मिळेल.

मूलांक 3 (जन्म तारीख ३, १२, २१, ३०): ऑफिसमध्ये अहंकारामुळे संघर्ष

हा आठवडा तुमच्यासाठी आर्थिक बाबतीत अनुकूल असून धनलाभाचे योग आहेत. ऑफिसमध्ये अहंकारामुळे संघर्ष होऊ शकतो आणि टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. लवलाइफ ठिक असेल, थोड्याफार तक्रारी असतील. आठवड्याच्या शेवटी खूप मेहनत करावी लागेल आणि मालमत्ते संदर्भात ताणतणावात वाढ होईल.

मूलांक 4 (जन्म तारीख ४, १३, २२, ३१): ऑफिसमध्ये कामात वाढ, बिझी राहणार

हा आठवडा तुमच्यासाठी चांगला असून ऑफिस आणि व्यवसाय स्थळी तुम्ही खूप व्यस्त राहणार आहात. कामे खूप वाढलेली आहेत योग्य नियोजन करा तरच तुम्हाला यश मिळेल. प्रोजेक्टमध्ये प्रगतीचे शुभ योग असून आर्थिक बाबतीत सुधारणा आहे, मात्र खर्चावर नियंत्रण हवे. लवलाइफ ठिक आहे पण काही कारणामुळे टेन्शन वाढेल. आठवड्याच्या शेवटी सुखसमृद्धीचे योग आहेत.

मूलांक 5 (जन्म तारीख ५, १४, २३): ऑफिस आणि व्यवसायात प्रगतीचे योग

हा आठवडा तुमच्यासाठी उत्तम असून ऑफिस आणि व्यवसायात प्रगतीचे शुभ संकते आहेत. सहकारी आणि प्रियजन प्रोजेक्टसाठी मदत करतील. आर्थिक बाबतीत शुभ योग असून बँक बॅलन्स वाढेल तसेच गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल. लवलाइफमध्ये अहंकारामुळे काही तणाव येऊ शकतात. आठवड्याच्या शेवटी परिस्थिती सुधारेल आणि तुम्ही रिलॅक्स व्हाल.

मूलांक 6 (जन्म तारीख ६, १५, २४): ऑफिसच्या कामात यश

हा आठवडा तुमच्यासाठी चांगला असून ऑफिसच्या कामात तुम्ही यशस्वी व्हाल. प्रोजेक्ट यशस्वी होतील. लवलाइफ फारशी ठिक नसेल, ज्यामुळे मन अस्वस्थ होईल. आर्थिक स्थिती फारश ठिक नाही, खर्च जास्त होत आहेत, लक्ष द्या. गुंतवणुकीवर भर द्यायला हवी. आठवड्याच्या शेवटी सुख-समृद्धीचे शुभ योग असून मेहनतीचे फळ नक्की मिळेल.

मूलांक 7 (जन्म तारीख ७, १६, २५): ऑफिसच्या कामात आळशीपणा

हा आठवडा ठिक आहे पण ऑफिसचे काम करताना तुम्ही आळशीपणा करणार आहात. आळसामुळे प्रोजेक्टमध्ये अडचणी येऊ शकतात. आर्थिक बाबतीत खर्च जास्त होणार आहे. लवलाइफ ठिक आहे. आठवड्याच्या शेवटी काही वाईट बातमी मिळेल त्यामुळे मन दुःखी होईल.

मूलांक 8 (जन्म तारीख ८, १७, २६): कार्यक्षेत्रात प्रगतीचे शुभ योग

हा आठवडा तुमच्यासाठी चांगला असून कार्यक्षेत्रात प्रगतीचे शुभ योग आहेत. कुटुंबातील जबाबदारी तुम्ही उत्तम सांभाळणार आहात. घरचे तुमचे कौतुक करतील. लवलाइफ चांगली आहे, एकमेकांना समजून घ्या. वादविवाद टाळा. आर्थिक स्थितीवर लक्ष ठेवा कारणम खर्च जास्त होतो आहे. आठवड्याच्या शेवटी योग्य निर्णय घेतल्यास चांगले परिणाम मिळतील.

मूलांक 9 (जन्म तारीख ९, १८, २७): आर्थिक स्थितीत सुधारणा

हा आठवडा तुमच्यासाठी उत्तम असून आर्थिक स्थितीत सुधारणाहोईल तसेच धनलाभाचे योग आहेत. ऑफिसच्या कामात तुम्ही घेतलेले निर्णय तुम्हाला त्रासदायक ठरतील. प्रोजेक्ट काळजीपूर्वक पुढे घेवून जा तुम्हाला लाभ होईल. लवलाइफ ओके आहे पण काही कारणाने लवलाइफमध्ये मानसिक त्रास होवू शकतो. आठवड्याच्या शेवटी संयमाने निर्णय घ्या, तुमची उत्तम प्रगती होईल.

अनिता किंदळेकर

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.