Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे पंचांग 10 नोव्हेंबर 2024: कूष्मांड नवमी, अक्षय नवमी ! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

25

Today Panchang 10 November 2024 in Marathi: रविवार १० नोव्हेंबर २०२४, भारतीय सौर १९ कार्तिक शके १९४६, कार्तिक शुक्ल नवमी रात्री ९-०१ पर्यंत, चंद्रनक्षत्र: धनिष्ठा सकाळी १०-५९ पर्यंत, चंद्रराशी: कुंभ, सूर्यनक्षत्र: विशाखा

Maharashtra Times

राष्ट्रीय मिति कार्तिक ९, शक संवत १९४६, कार्तिक शुक्ल नवमी, रविवार, विक्रम संवत २०८१, सौर कार्तिक मास प्रविष्टे २५, रबी उल्लावल ०७, हिजरी १४४६ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख १० नोव्हेंबर २०२४. सूर्य दक्षिणायन, दक्षिण गोल, हेमंत ऋत. राहुकाळ संध्याकाळी साडे चार ते ६ वाजेपर्यंत. नवमी तिथी रात्री ११ वाजून २ मिनिटांपर्यंत त्यानंतर दशमी तिथी प्रारंभ,
धनिष्ठा नक्षत्र सकाळी ११ वाजेपर्यंत त्यानंतर शतभिषा नक्षत्र प्रारंभ, ध्रुव योग मध्यरात्री १ वाजून ४२ मिनिटांपर्यंत त्यानंतर व्याघात योग प्रारंभ, बालव करण सकाळी ९ वाजून ५४ मिनिटांपर्यंत त्यानंतर तैतील करण प्रारंभ, चंद्र दिवस रात्री कुंभ राशीत संचार करेल.

  • सूर्योदय: सकाळी ६-४४
  • सूर्यास्त: सायं. ६-००
  • चंद्रोदय: दुपारी २-००
  • चंद्रास्त: उत्तररात्री १-५०
  • पूर्ण भरती: सकाळी ६-१२ पाण्याची उंची ३.६७, सायं. ७-१३ पाण्याची उंची ३.०८ मीटर
  • पूर्ण ओहोटी: दुपारी १-१२ पाण्याची उंची २.०० मीटर, रात्री १२-५४ पाण्याची उंची १.७८ मीटर
  • सण आणि व्रत : कूष्मांड नवमी, अक्षय नवमी, आवळा नवमी, आरोग्य व्रत, जगधात्री पूजा

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ५५ मिनिटांपासून ते ५ वाजून ४७ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी १ वाजून ५३ मिनिटांपासून ते २ वाजून ३६ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ३९ मिनिटांपासून ते १२ वाजून ३२ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ५ वाजून ३० मिनिटांपासून ते ५ वाजून ५६ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ९ वाजून २३ मिनिटांपासून १० वाजून ४३ मिनिटांपर्यंत

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ संध्याकाळी साडे चार ते ६ वाजेपर्यंत, दुपारी साडे तीन ते साडे चार वाजेपर्यंत गुलीक काळ, दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ४ वाजून ३ मिनिटांपासून ते ४ वाजून ४६ मिनिटांपर्यंत. पंचक पूर्ण दिवस राहणार आहे.

आजचा उपाय
आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करा.
(आचार्य कृष्णदत्त)

अनिता किंदळेकर

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.