Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे अंकभविष्य, 10 नोव्हेंबर 2024: आक्रमक बोलणे घातक ! प्रियजनांच्या भेटी, करतील ताणतणाव कमी ! जाणून घ्या, अंकशास्त्रानुसार तुमचे राशीभविष्य

11

Numerology Prediction, 10 November 2024 : 10 नोव्हेंबर, मूलांक 1 लाठी तुम्ही घेतलेला निर्णय फायदा देणारा असून स्वभावात सौम्यपणा ठेवा. मूलांक 2 ला मित्रांच्या भेटी होतील त्यामुळे ताण तणाव कमी होईल. मूलांक 4 च्या जातकांचा ताण काम वाढल्यामुळे वाढणार आहे. मूलांक 6 च्या लोकांनी कोणतीही गोष्ट करताना संयम ठेवावा तसेच सखोल विचार करून निर्णय घ्यावा. मूलांक 10 च्या जातकांनी स्वतःवर विश्वास ठेवा, संकटांचा सामना करा, तुम्हाला यश नक्की मिळेल. आज मूलांक 1 ते 9 साठी आजचा दिवस कसा आहे? तुमचा मूलांक काय सांगतो?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
आजचे अंकभविष्य, 10 नोव्हेंबर 2024: आक्रमक बोलणे घातक ! प्रियजनांच्या भेटी, करतील ताणतणाव कमी ! जाणून घ्या, अंकशास्त्रानुसार तुमचे राशीभविष्य

Aajche Ank bhavishya, 10 November 2024: 10 नोव्हेंबर, मूलांक 1, मूलांक २ सह या मूलांकाचा ताणतणाव कमी होईल. प्रियजन आणि मित्रांच्या भेटी होतील. स्वभावात सौम्यपणा हवा म्हणजे लोकं प्रभावीत होतील. मूलांक 6 सह या मूलांकाच्या लोकांनी संयम ठेवावा कारण अती घाई संकटात नेई हे लक्षात ठेवा. मूलांक 1 ते 9 या क्रमांकाचे कोणते लोक आज भाग्यशाली आहेत ते पाहूया.

मूलांक 1 – निर्णय फायदा देणार, स्वभावात सौम्यपणा ठेवा

मूलांक 1 असलेल्यांसाठी आजचा दिवस ठिक असून तुम्ही घेतलेले निर्णय फायदेशीर संधी घेवून येणार आहेत. तुमच्या स्वभावात थोडा सौम्यपणा ठेवा, कारण तुम्ही आक्रमकपणे वागलात तर लोकं काही वेगळाच अर्थ काढतील. कार्यक्षेत्रात वातावरण ठिक असेल पण कामाचे नियोजन व्यवस्थित करा.

मूलांक 2 – मित्रांच्या भेटीमुळे ताण कमी होईल

मूलांक 2 असणाऱ्या जातकांसाठी आजचा दिवस ठिक असून जुन्या मित्रांच्या भेटी होतील. जुन्या आठवणींना उजाळा द्याल तसेच मित्र कामात मदत करतील. प्रियजनांच्या सहवासामुळे ताण तणाव कमी होईल. एकसाथ अनेक काम करणे तुमच्यासाठी त्रासदायक असू शकते.

मूलांक 3 – तुमचे बोलणे सुधारा

मूलांक 3 असणाऱ्या लोकांसाठी दिवस ठिक आहे, पण तुमच्यातील संवाद कौशल्य सुधारण्याची गरज आहे. समोरच्या व्यक्तीसोबत बोलताना आदर ठेवा. तुमचे लेखन चांगले आहे आणि त्यामुळे सगळेजण प्रभावीत होतील. वादविवादापासून दूर राहा.

मूलांक 4 – खूप काम केल्यामुळे तणातणाव जास्त

मूलांक 4 साठी आजचा दिवस मेहनतीचा आहे. खूप काम केल्यामुळे तुम्हाला थकवा आणि ताण जाणवू शकतो. तब्येतीची काळजी घ्या. कामात एकाग्रतेची गरज आहे तरच कामे पटापट मार्गी लागतील.

मूलांक 5 – निर्णय घेताना घाई नको, संपूर्ण परिस्थितीचा विचार करा

मूलांक 5 साठी आजचा दिवस ठिक आहे पण आज परिस्थिती तुमच्यासमोर आहे त्यामध्ये दोन्ही बाजूने विचार करा. तुम्ही घाईघाईत निर्णय घेतला तर तो आव्हानात्मक ठरु शकतो. तुम्हाला संकटात मित्राच मदत मिळेल.

मूलांक 6 – संयम ठेवा, सखोल विचार महत्त्वाचा

मूलांक 6 साठी आजचा दिवस फारसा ठिक नाही. तुमच्या मनातील विचार इतरांसमोर मांडण्यापूर्वी सखोल विचार करा. आजची वेळ तुमच्यासाठी अनुकूल नाही, संयम ठेवणे तुमच्यासाठी योग्य आहे. घरात वातावरण ठिक असेल.

मूलांक 7 – शांतपणे आणि संयमाने काम करा

मूलांक 7 साठी आजचा दिवस ठिक आहे पण एखादे काम शांतपणे करणे आणि संयम ठेवणे गरजेचे आहे. तुमचे विचार इतरांसमोर मांडताना वाणीवर नियंत्रण ठेवा, समजून घ्या मग बोला अन्यथा अर्थाचा अनर्थ होवू शकतो.

मूलांक 8 – विद्यार्थ्यांना परिक्षेत यश, नवीन गोष्ट शिकण्याची संधी

मूलांक 8 साठी दिवस चांगला आहे तुमचे विचार इतरांना पटतील आणि संवाद योग्य प्रकारे होईल. विद्यार्थ्यांना परिक्षेत यश मिळेल, तसेच नवीन काही शिकण्याची संधी आहे त्याचा लाभ घ्या. घरात वातावरण ठिक असेल, घरातील कामांना वेळ द्या.

मूलांक 9 – स्वतःवर विश्वास ठेवा, संकटांचा सामना करा

मूलांक 9 साठी आजचा दिवस चांगला आहे. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा आणि धैर्याने प्रत्येक संकटाला सामोरे जा. तुम्ही संकटांचा सामना करु शकता. तुमचा स्वभाव आणि बोलण्याची पद्धत यामुळे समोरच्या व्यक्ती नक्की आकर्षीत होतील.

अनिता किंदळेकर

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.