Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
आजचे अंकभविष्य, 13 नोव्हेंबर 2024: प्रत्येक कामात कुटुंबाची साथ ! रागावर ठेवा नियंत्रण ! जाणून घ्या, अंकशास्त्रानुसार तुमचे राशीभविष्य
Numerology Prediction, 13 November 2024 : 13 नोव्हेंबर, बुधवार, मूलांक 1 असलेल्यांसाठी आजचा दिवस चांगला असून तुम्हाला वडिलांची संपूर्ण साथ मिळेल. व्यवसायाशी संबंधित नवे प्रस्तावर येतील. मूलांक 2 च्या लोकांना प्रत्येक कामात कुटुंबाची साथ तर मूलांक 4 च्या जातकांना सरकारकडून नोटीस मिळण्याची शक्यता आहे. मूलांक 6 च्या लोकांनी वादविवादापासून दूर राहा. मूलांक 8 च्या जातकांना समस्यांचा सामना करावा लागेल. मूलांक 9 ची प्रत्येक काम मार्गी लागणार असून समस्यांचे निराकरण होईल. आज मूलांक 1 ते 9 साठी आजचा दिवस कसा आहे? तुमचा मूलांक काय सांगतो?
मूलांक 1 – व्यवसायासंदर्भात नवे प्रस्तावर येणार
मूलांक 1 असलेल्यांसाठी आजचा दिवस चांगला असून तुम्हाला वडिलांची संपूर्ण साथ मिळेल. व्यवसायाशी संबंधित नवे प्रस्तावर येणार आहेत त्याचा विचार करायला हरकत नाही. सरकारी कामात यश मिळेल. आज दिवसभर तुम्ही उत्साहाता काम करणार आहात फक्त तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. तब्येत सांभाळा कारण पचनशक्तीवर परिणाम होवू शकतो. सूर्याल नियमीत अर्घ्य द्या, समस्या कमी होतील.
मूलांक 2 – प्रत्येक कामात कुटुंबाची साथ
मूलांक 2 असणाऱ्या जातकांसाठी आजचा दिवस अनुकूल असून तुमच्या प्रत्येक कामात तुम्हाला घरच्यांची साथ मिळेल. तुमचा मान सन्मान वाढणार आहे. तसेच अचानक धनलाभाचे योग आहेत. घरातल्यांसोबत संबंध सुखद राहतील. करिअरमध्ये प्रगतीचे योग आहेत. सहकारी कामात मदत करतील.
मूलांक 3 – तुमच्या कामाची प्रशंसा
मूलांक 3 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असून तुमच्या विचारांची आणि कामाची प्रशंसा होणार आहे. तुमचा सल्ला घेवून सहकारी काम करतील. सरकारी शैक्षणिक संस्थेशी संबंधित काही काम करण्याची इच्छा असेल तर करू शकता. आजचा दिवस एखादी नवीन सुरूवात करण्यासाठी चांगला आहे.
मूलांक 4 – सरकारकडून नोटीस मिळण्याची शक्यता
मूलांक 4 साठी आजचा दिवस फारसा ठिक नाही. सरकारी कामे नीट झालेली नसल्यामुळे तुम्हाला सरकारकडून नोटीस मिळण्याची शक्यता आहे. वडिलांची तब्येत अचानक खराब होवू शकते. धनसंपत्तीच्या बाबतीत अडचणी वाढू शकतात. कोणीतरी तुमचा अपमान करेल त्यामुळे तुम्ही दुःखी होवू शकता. जोडीदारासोबत संंबंध चांगले ठेवा, त्यांची प्रत्येक कार्यातील साथ तुमच्यासाठी फायद्याची आहे.
मूलांक 5 – रखडलेल्या योजना पुन्हा सुरू होतील
मूलांक 5 साठी आजचा दिवस अनुकूल असून खूप काळापासून रखडलेल्या योजना पुन्हा सुरू होतील. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी वेळ उत्तम आहे. गुंतवणूकिबाबत सावध राहा, अन्यथा पैसे अडकण्याची भीती आहे. करिअरमध्ये कामे वाढणार आहे. काम करताना नियोजन ठेवा म्हणजे कामे पटापट मार्गी लागतील.
मूलांक 6 – वादविवादापासून दूर राहा
मूलांक 6 साठी आजचा दिवस सामान्य आहे. तुम्ही वादविवादापासून दूर राहा. शांत राहण्याचा प्रयत्न करा. ऑफिसमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. घरातल्यांसोबत संबंध चांगले ठेवा आणि त्यांच्या म्हणण्यानुसार गुंतवणूक करा. आर्थिक स्थिती ठिक आहे.
मूलांक 7 – समस्यांचे समाधान मिळणार
मूलांक 7 साठी आजचा दिवस ठिक आहे. समस्यांचे समाधान मिळणार आहे पण वडिलांची तब्येत सांभाळा. तुमचे खर्च वाढू शकतात, ज्यामुळे मानसिक ताण वाढेल. मुलांच्या तब्येतीची विशेष काळजी घ्या. कुटुंबातील एखादा सदस्य तुमच्यावर आरोप करू शकतो, तुम्ही अपशब्दांचा वापर करू नका.
मूलांक 8 – समस्यांचा सामना करा
मूलांक 8 साठी आजचा दिवस फारसा ठिक नाही. प्रत्येक कार्यात अनेक अडचणी आणि समस्यांचा सामना करावा लागू शकतो. घरात वादविवाद होऊ शकतात, पण तुम्ही रागावर नियंत्रण ठेवा. कामे येत आहेत पण एकावेळी अनेक कामे करताना तणाव वाढू शकतो. टेन्शन कमी घ्या.
मूलांक 9 – प्रत्येक काम मार्गी लागणार, समस्यांचे निराकरण होईल
मूलांक 9 साठी आजचा दिवस चांगला असून नशिब तुमच्याबाजूने आहे. तुम्ही जे काही काम करायचा विचार केला आहे ते सगळं पूर्ण होणार आहे. धन संपत्तीच्या बाबतीत काही समस्या असेल तर मार्गी लागेल. तब्येत सांभाळा. आज एखाद्या नवीन कामाची सुरूवात करायला वेळ चांगली आहे. दिवसभर आनंदी राहाल आणि ताण तणाव कमी असेल.