Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे अंकभविष्य, 19 नोव्हेंबर 2024: फसवुणकिची शक्यता, सतर्क राहा ! संवाद साधा मार्ग मिळेल ! जाणून घ्या, अंकशास्त्रानुसार तुमचे राशीभविष्य

5

Numerology Prediction, 19 November 2024 : 19 नोव्हेंबर, मूलांक 1 ने कामात आळशीपणा टाळावा. मूलांक 2 चे लोक दिवसभर व्यस्त असतील आणि नवीन नाती जोडली जातील. मूलांक 4 च्या लोकांनी तब्येतीची काळजी घ्या. मूलांक 6 असणाऱ्यांनी स्वतःवर जास्त लक्ष द्यायला हवे. मूलांक 8 साठी मेहनतीचा दिवस असून तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. मूलांक 9 चे जातक खूप छान मूडमध्ये असतील आणि नवीन लोकांशी संपर्क होईल.आज मूलांक 1 ते 9 साठी आजचा दिवस कसा आहे? तुमचा मूलांक काय सांगतो?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
आजचे अंकभविष्य, 19 नोव्हेंबर 2024: फसवुणकिची शक्यता, सतर्क राहा ! संवाद साधा मार्ग मिळेल ! जाणून घ्या, अंकशास्त्रानुसार तुमचे राशीभविष्य

Aajche Ank bhavishya, 19 November 2024: 19 नोव्हेंबर, मूलांक 2 सह या मूलांकाचे जातक दिवसभर व्यस्त असतील. या मूलांकाच्या लोकांनी वादविवादापासून दूर रहावे. कामावर फोकस ठेवणे जास्त गरजेचे आहे. मूलांक 4 सह या मूलांकांनी तब्येत सांभाळावी आणि खाण्यापिण्याकडे लक्ष द्यावे. मूलांक 1 ते 9 या क्रमांकाचे कोणते लोक आज भाग्यशाली आहेत ते पाहूया.

मूलांक 1 – कामात आळशीपणा नको

मूलांक 1 असलेल्यांसाठी आजचा दिवस ठिक आहे पण एक लक्षात ठेवा तुम्ही सगळ्यांना एकावेळी आनंदी ठेवू शकत नाही. प्रत्येकासाठी थोडं कार्य नक्कीच करू शकता आहात. कामाच्या बाबतीत हलगर्जीपणा करू नका. कामात फोकस राहा म्हणजे कामे वेळेत पूर्ण होतील.

मूलांक 2 – दिवसभर व्यस्त, नवीन नाती जोडली जाणार

मूलांक 2 असणाऱ्या जातकांसाठी आजचा दिवस ठिक असून तुम्ही दिवसभर व्यस्त राहणार आहात. आज नवीन गोष्टी तुमच्या आयुष्यात घडणार आहेत. नवीन नाती जोडली जाणार आहेत. काही लोकांना खास वेळ देणार आहात.

मूलांक 3 – फसवणुकिची शक्यता, सतर्क राहा

मूलांक 3 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस थोडा टेन्शन देणारा असेल. तुम्ही कुटुंबाबद्दल जरा जास्तच विचार कराल. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगेल नातेसंबंध प्रस्थापीत करण्याचा प्रयत्न करा. आज तुमच्या जवळची व्यक्ती तुम्हाला फसविण्याचा प्रयत्न करेल तेव्हा सतर्क राहा.

मूलांक 4 – तब्येतीची काळजी घ्या

मूलांक 4 साठी आजचा दिवस ठिक आहे पण तब्येतीकडे लक्ष द्या. खाण्यापिण्याकडे लक्ष द्या आणि अस्वस्थ जाणवले तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या. ध्यान धारणा, योगा यात खंड पडू देवू नका. कुटुंबात वातावरण ठिक असेल.

मूलांक 5 – वादविवादापासून दूर राहा.

मूलांक 5 साठी आजचा दिवस ठिक आहे. तुम्ही वादविवादापासून दूर राहा. आज जास्त वेळ घरात देण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला खूप धावपळीमुळे ताणतणावाचा सामना करावा लागू शकतो. तब्येतीची काळजी घ्या.

मूलांक 6 – भेटीसाठी जाताना स्वतःवर जास्त लक्ष द्या

मूलांक 6 साठी आजचा दिवस ठिक असून तुम्ही कामात व्यस्त राहणार आहात. तुम्ही कोणाला भेटायला जात असाल तर स्वतःवर लक्ष केंद्रीत करा. कुटुंबातील एखाद्या सदस्यासोबत वाद होवू शकतो पण तुम्ही शांत राहा आणि कटू शब्द बोलू नका.

मूलांक 7 – संवाद साधा मार्ग निघेल

मूलांक 7 साठी आजचा दिवस ठिक असून तुम्ही मनापासून काम करणारा आहात. तुमची कामे वेळेत पूर्ण होतील. संवाद साधताना थोडा संकोच असेल पण मनातील गोष्टी इतरांसोबत शेअर केल्या तर मन हलकं होईल. तसेच काही संकट असतील तर त्यातून मार्ग निघेल.

मूलांक 8 – मेहनतीचा दिवस, प्रयत्नांना यश मिळेल

मूलांक 8 साठी आजचा दिवस ठिक आहे पण तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल. तुमच्या कौशल्यांबद्दल लोकांना शंका असेल पण तुम्ही हार मानू नका. प्रयत्न करा तुम्ही सफल नक्की व्हाल. कामाच्या बाबतीत समस्या येणार नाही असे पाहा.

मूलांक 9 – नवीन लोकांशी संपर्क होईल

मूलांक 9 साठी आजचा दिवस ठिक आहे. तुम्हाला नवीन लोकांशी बोलण्याची संधी मिळेल. आज बाहेर जाण्याचा मूड असेल. पुढे जाण्याची संधी मिळणार आहे. कामे भरपूर आहेत तुम्ही नीट नियोजन करा.

अनिता किंदळेकर

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.