Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे पंचांग 22 नोव्हेंबर 2024: ब्रह्म योग, रवि योग ! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

5

Today Panchang 22 November 2024 in Marathi: शुक्रवार २२ नोव्हेंबर २०२४, भारतीय सौर १ अग्रहायण शके १९४६, कार्तिक कृष्ण सप्तमी सायं. ६-०६ पर्यंत, चंद्रनक्षत्र: आश्लेषा सायं. ५-०८ पर्यंत, चंद्रराशी: कर्क सायं. ५-०८ पर्यंत, सूर्यनक्षत्र: अनुराधा

Maharashtra Times

राष्ट्रीय मिति कार्तिक २०, शक संवत १९४६, कार्तिक कृष्ण सप्तमी, शुक्रवार, विक्रम संवत २०८१, सौर कार्तिक मास प्रविष्टे ०७, रबी उल्लावल १९, हिजरी १४४६ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख २२ नोव्हेंबर २०२४. सूर्य दक्षिणायन, दक्षिण गोल, हेमंत ऋत. राहुकाळ सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत.
सप्तमी तिथी सायंकाळी ६ वाजून ८ मिनिटांपर्यंत त्यानंतर अष्टमी तिथी प्रारंभ, आश्लेषा नक्षत्र सायंकाळी ५ वाजून १० मिनिटांपर्यंत त्यानंतर मघा नक्षत्र प्रारंभ, ब्रह्म योग ११ वाजून ३४ मिनिटांपर्यंत त्यानंतर ऐन्द्र योग प्रारंभ, बव करण सायंकाळी ६ वाजून ८ मिनिटांपर्यंत त्यानंतर कौलव करण प्रारंभ, चंद्र सायंकाळी ५ वाजून १० मिनिटांपर्यंत कर्क राशीत त्यानंतर सिंह राशीत संचार करेल.

  • सूर्योदय: सकाळी ६-५१
  • सूर्यास्त: सायं. ५-५८
  • चंद्रोदय: रात्री १२-१३
  • चंद्रास्त: दुपारी १२-३८

  • पूर्ण भरती: पहाटे ४-३४ पाण्याची उंची ३.९४ मीटर, सायं. ४-३७ पाण्याची उंची ३.०४ मीटर
  • पूर्ण ओहोटी: सकाळी ११-१२ पाण्याची उंची २.०३ मीटर, रात्री १०-२९ पाण्याची उंची १.९४ मीटर
  • सण आणि व्रत : ब्रह्म योग, रवि योग

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून २ मिनिटांपासून ते ५ वाजून ५६ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी १ वाजून ५३ मिनिटांपासून ते २ वाजून ३५ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ४० मिनिटांपासून ते १२ वाजून ३४ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ५ वाजून २२ मिनिटांपासून ते ५ वाजून ४९ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ८ वाजून ९ मिनिटांपासून ९ वाजून २८ मिनिटांपर्यंत

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत, सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत गुलीक काळ, दुपारी साडे तीन ते साडे चार वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ८ वाजून ५७ मिनिटांपासून ते ९ वाजून ३९ मिनिटांपर्यंत. त्यानंतर दुपारी १२ वाजून २८ मिनिटांपासून ते १ वाजून ११ मिनिटांपर्यंत

आजचा उपाय
घरात लवंग आणि कापूर घालून आरती करा.
(आचार्य कृष्णदत्त)

अनिता किंदळेकर

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.