Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आर्थिक राशिभविष्य 26 नोव्हेंबर 2024: मेषसाठी ऑफिसमध्ये वादाची शक्यता ! तुळ राशीने आळस सोडावा, कामे मार्गी लागतील ! पाहा, तुमचे राशिभविष्य

4

Finance Horoscope Today 26 November 2024 In Marathi : 26 नोव्हेंबर, मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फारसा ठिक नाही. ऑफिसमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत वादविवादाची शक्यता आहे. वृषभ राशीचे जे जातक सरकारी कामे करतात त्यांना अधिकाऱ्यांना ओरडा पडू शकतो. कर्क राशीचे लोक कामात खूप व्यस्त राहतील. कन्या राशीला व्यवसायात उत्तम नफा मिळेल. तुळ राशीचे मन अस्वस्थ असेल पण तुम्ही लक्षात ठेवा आळस सोडा कामे होतील. धनूसाठी धनलाभाचे योग तर कुंभ राशीला प्रत्येक कामात यश आहे. मीन राशीचा प्रत्येक स्पर्धेत विजय होणार, चला तर करिअर आणि आर्थिक बाबतीत आजचा दिवस कसा असेल ते पाहूया.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
आर्थिक राशिभविष्य 26 नोव्हेंबर 2024: मेषसाठी ऑफिसमध्ये वादाची शक्यता ! तुळ राशीने आळस सोडावा, कामे मार्गी लागतील ! पाहा, तुमचे राशिभविष्य

Aaj che Aarthik Rashi Bhavishya 26 November 2024 : मंगळवार मेष, वृषभसह या राशीच्या लोकांनी सतर्क रहावे वरिष्ठांकडून ओरडा पडण्याची शक्यता आहे. कामात फोकस ठेवा. कर्कसह या राशीचे लोक कामात व्यस्त राहतील. तुळसह या राशीच्या लोकांनी आळस सोडावा म्हणजे कामे मार्गी लागतील. आर्थिक स्थिती ठिक आहे पण त्याला उत्तम करण्यासाठी कठोर परिश्रम करावा लागेल. चला तर पाहूया करिअर आणि आर्थिक बाबतीत मेष ते मीन राशीपर्यंतच्या सर्व राशींची आर्थिक कुंडली काय म्हणते आहे, जाणून घेऊया.

मेष आर्थिक राशिभविष्य : ऑफिसमध्ये वादाची शक्यता

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फारसा ठिक नाही. ऑफिसमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत वादविवाद होवून नुकसान होण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवा. काही नवीन ओळखी होतील त्यामुळे भविष्यात लाभ मिळेल. मान-सन्मान वाढणार असून आर्थिक स्थिती ठिक असेल. प्रवासाचा योग असून त्यात लाभ होईल.

वृषभ आर्थिक राशिभविष्य : सरकारी अधिकाऱ्यांना ओरडा पडण्याची शक्यता

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ठिक आहे पण जे व्यवसाय करत आहेत त्यांना अधिक परिश्रम करावे लागतील. सरकारी नोकर असाल तर वरिष्ठ अधिकाऱ्याचा राग ओढवून घेणार आहात. सामाजिक संबंध फायदेशीर ठरतील. नवीन योजनांवर लक्ष द्या कारण अचानक फायदा होऊ शकतो.

मिथुन आर्थिक राशिभविष्य : अडचणीतून मार्ग काढाल

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ठिक असून नोकरी आणि व्यवसायात लाभ आहे. जे मुद्दे सुटत नव्हते त्यातून मार्ग काढाल. कोणताही व्यवसाय लहान किंवा मोठा असे नसते, अनुभव मिळाल्यावर तुम्ही जग जिंकू शकता हे लक्षात ठेवा. रात्री मित्रांसोबत मनोरंजनाच्या कार्यक्रमाला जाणार आहात.

कर्क आर्थिक राशिभविष्य : कामात खूप व्यस्त राहणार

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ठिक असून तुम्ही कामात खूप व्यस्त राहणार आहात. विरोधकांच्या टीकेकडे लक्ष न देता जे काम करत आहात त्याकडे फोकस करा. आज प्रत्येक कामात यश मिळायला हवे. सामाजिक क्षेत्रात चांगले संबंध प्रस्थापित होतील. आर्थिक स्थिती ठिक आहे.

सिंह आर्थिक राशिभविष्य : अफवांपासून सावध राहा, प्रत्येक कामात मेहनत फार

सिंह राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस ठिक आहे पण तुम्हाला सतर्क रहावे लागेल. शत्रूंनी आखलेले षडयंत्र तसेच अफवांपासून सावध राहा. अनावश्यक काळजी मनाला पोखरणार आहे. आज प्रत्येक कामात कठोर मेहनत आहे पण यश मिळणार. तुमची सामाजिक जबाबदारी वाढलेली आहे. अनोळखी व्यक्तीसोबत आर्थिक व्यवहार नको.

कन्या आर्थिक राशिभविष्य : व्यवसायात उत्तम नफा

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभलाभाचा आहे. व्यवसायात उत्तम नफा झाल्यामुळे तुम्ही आनंदी असाल. नोकरीत वातावरण ठिक आहे. कुटुंबातील सदस्यांकडून तुम्हाला प्रेम आणि सहकार्य मिळेल. क्रिएटीव्ह कामात मन रमेल. दिवसभरात एखादी विपरीत परिस्थिती येवू शकते त्यावेळी रागावर नियंत्रण ठेवा. घरगुती समस्या सुटतील. सरकारी मदत मिळण्याची शक्यता आहे. संध्याकाळी अचानक धनलाभाची शक्यता आहे.

तुळ आर्थिक राशिभविष्य : मन अस्वस्थ असेल, आळस सोडा कामे होतील

तुळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फारसा ठिक नाही. समस्यांचे समाधान मिळाले नाही म्हणून तुम्ही काळजी करत राहणार आहात. प्रवास करायचे ठरवणार पण काही कारणामुळे ते पुढे ढकलले जावू शकतात. तुमचा आळस तुम्हाला नुकसान देतो आहे हे वेळीच ओळखा. व्यवसायात आळसामुळे कामे होत नाहीत तसेच घरी देखील तुम्हाला बोलणी ऐकावी लागतात.

वृश्चिक आर्थिक राशिभविष्य : सकारात्मक विचार करा

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडा गोंधळात जाणार आहे. निराशाजनक विचारांपासून स्वतःला दूर ठेवा. सरकारी संस्थांकडून तुम्हाला लाभ होईल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. नोकरी आणि व्यवसायात खूप कष्ट करावे लागतील.

धनू आर्थिक राशिभविष्य : धनलाभाचे योग, कामात आळस नको

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असून धनलाभाचे योग आहेत. तुम्ही धार्मिक कार्यात अधिक रूची घेणार आहात. रोजच्या कामांमध्ये आळस करू नका त्यामुळे तुम्हाला त्रास होवू शकतो. नवीन संपर्कामुळे तुमचा लाभ होईल. रागावर नियंत्रण ठेवा. घरातील कामे देखील मार्गी लावा.

मकर आर्थिक राशिभविष्य : वरिष्ठांसोबत वादाची शक्यता

मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फारसा ठिक नाही कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वाद होऊ शकतो. विरोधक आज शांत असतील तुमचा कामातील वेग पाहून काहीच करु शकणार नाही. संध्याकाळी पाहुण्यांचे आगमन होणार आहे त्यामुळे खर्च वाढतील. चांगली कर्म केलीत तर त्याचा लाभ तुम्हाला नक्की मिळेल हे लक्षात ठेवा.

कुंभ आर्थिक राशिभविष्य : प्रत्येक कामात यश

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ठिक असून ग्रहांच्या शुभ योगामुळे तुम्हाला कामात यश मिळेल. काही कारणामुळे जीवनात अस्थिरता निर्माण होवू शकते. वाहन किंवा जमीन खरेदीसाठी सुखद योग आहे. रिलोकेशनचा विचार फायनल करु शकता. घरासाठी खरेदी करणार आहात.

मीन आर्थिक राशिभविष्य : स्पर्धेत विजयी होणार

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ठिक आहे. मुलांकडून चांगली बातमी समजेल, मन प्रसन्न होईल. समस्यांचे निराकरण होणार आहे. कोणत्यातरी स्पर्धेत तुम्ही विजयी होऊ शकता. दिवस समाधान देणारा असला तरी हवामान बदलामुळे तब्येतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे काळजी घ्या.

अनिता किंदळेकर

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.