Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे अंकभविष्य, 27 नोव्हेंबर 2024: व्यावसायिक दिवसभर व्यस्त ! वरिष्ठ खडे बोल सुनावण्याची शक्यता ! जाणून घ्या, अंकशास्त्रानुसार तुमचे राशीभविष्य

2

Numerology Prediction, 27 November 2024 : 27 नोव्हेंबर रोजी मूलांक 1 साठी कामात अडचणी आणि मन अस्वस्थ राहणार. मूलांक 2 असणाऱ्यांनी लक्षात ठेवा चेष्टा करताना सावध राहा, अनर्थ होण्याची शक्यता आहे. मूलांक 4 चे जातक आवडीचे काम करणार असून मित्रांची मदत मिळेल. मूलांक 7 च्या लोकांनी दुसऱ्यांचा सल्ला ही विचारात घ्यावा. मूलांक 9 च्या व्यावसायिकांना त्रासाची शक्यता तसेच काम करताना सावध राहा. याबद्दल अधिक जाणून घेऊया. आज मूलांक 1 ते 9 साठी आजचा दिवस कसा आहे? तुमचा मूलांक काय सांगतो?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
आजचे अंकभविष्य, 27 नोव्हेंबर 2024: व्यावसायिक दिवसभर व्यस्त ! वरिष्ठ खडे बोल सुनावण्याची शक्यता ! जाणून घ्या, अंकशास्त्रानुसार तुमचे राशीभविष्य

Aajche Ank bhavishya, 27 November 2024: 27 नोव्हेंबर, मूलांक 1 सह या मूलांकांना कामात अडचणी येतील. मूलांक 3 सह या मूलांकाचे जातक दिवसभर व्यस्त राहतील. या मूलांकांसाठी दिवस उत्तम असून आवडीचे काम करायला मिळेल. चला तर माहिती घेऊया मूलांक 1 ते 9 या क्रमांकाचे कोणते लोक आज भाग्यशाली आहेत.

मूलांक 1 – कामात अडचणी, मन अस्वस्थ राहणार

मूलांक 1 असलेल्यांसाठी आजचा दिवस फारसा ठिक नाही. काही कारणांमुळे मन अस्वस्थ असेल. दिवसाची सुरुवात उत्साहाने होईल पण काही अडचणी येतील. व्यवसायात समस्या येवू शकतात. जोडीदारासोबत काही कारणामुळे वादाची शक्यता आहे.

मूलांक 2 – चेष्टा करताना सावध राहा, अनर्थ होण्याची शक्यता

मूलांक 2 असणाऱ्या जातकांसाठी आजचा दिवस ठिक आहे पण खर्च जास्त होईल. मानसिक दृष्ट्या तुम्ही काही गोष्टींमध्ये गोंधळलेले असू शकता किंवा कोणासोबत बोलताना अचानक भांडण होण्याची शक्यता आहे. लवलाइफमध्ये तुमच्यावर जबाबदारी वाढेल. दुसऱ्यांवर विनोद करताना किंवा एखाद्याची चेष्टा करताना सावध राहा, अन्यथा विचित्र काही होण्याची शक्यता आहे.

मूलांक 3 – व्यावसायिक दिवसभर व्यस्त

मूलांक 3 असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस ठिक आहे पण व्यवसायिकांसाठी आजचा दिवस धावपळीचा आहे. तुम्ही दिवसभर व्यस्त राहणार आहात. इतरांच्या दबावामुळे किंवा काही कारणांमुळे तुमची इच्छा व्यक्त करता येणार नाही. महिलांनी तब्येतीची काळजी घ्यावी. नवीन कामे सुरु होणार पण ती सुस्थितीत यायला थोडा वेळ लागू शकतो.

मूलांक 4 – आवडीचे काम करणार, मित्रांची मदत मिळेल

मूलांक 4 साठी आजचा दिवस चांगला आहे. तुम्हाला आवडीचे काम करायला मिळणार त्यामुळे समाधानी असाल. कामात मित्राची मदत मिळेल पण कुटुंबातील सदस्यांकडून मदतीची शक्यता कमी आहे. समस्यांपासून दूर राहून तुमचे काम करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही किती हुशार आहात हे तुम्ही लोकांना दाखवून द्याल.

मूलांक 5 – व्यवसायात तोटा होण्याची शक्यता, मनात विचारांचा गोंधळ

मूलांक 5 साठी आजचा दिवस ठिक आहे पण सावधगिरीने काम करावे लागेल. कामात दुर्लक्ष टाळावा. आज मनात अनेक विचार येतील, नक्की काय करावे ते कळणार नाही. तुम्ही थोड्या गोंधळलेल्या अवस्थेत असाल. आवडत्या गोष्टी करण्याचा एकूणत सकारात्मक विचार करा. व्यवसायात काही तोटा होण्याची शक्यता आहे.

मूलांक 6 – वरिष्ठ अधिकारी खडे बोल सुनावतील

मूलांक 6 साठी आजचा दिवस ठिक नाही. कोणामुळे तुमच्या कामात अडथळा येऊ शकतो. वरिष्ठ अधिकारी तुम्हाला खडे बोल सुनावतील. तुम्ही चिडचिड करू नका, फोकस राहा आणि सांभाळून कामे करणे तुमच्यासाठी हिताचे आहे. एखाद्या पुरूषाकडून कामात त्रास होण्याची शक्यता आहेय

मूलांक 7 – दुसऱ्यांचा सल्ला विचारात घ्या

मूलांक 7 साठी आजचा दिवस ठिक असून कामाच्या बाबतीत सजग राहणे गरजेचे आहे. तुम्ही काही गोष्टींवर अधिक विचार करत असाल, त्याचबरोबर दुसऱ्यांच्या सल्ला देखील महत्त्वाचा माना आणि त्यावरही विचार करा. काही महत्त्वाच्या कागदपत्रांबाबत तुम्हाला अडचण येऊ शकते. आर्थिक स्थिती ठिक आहे.

मूलांक 8 – सहकाऱ्यांकडून अडचणी, सतर्क राहा

मूलांक 8 साठी आजचा दिवस थोडा तणावाचा असू शकतो. तुमचे काम खराब करण्याचा काही लोक प्रयत्न करतील. स्वतःवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. संपत्तीच्या बाबतीत काही अडचणी येऊ शकतात. एखाद्या व्यक्तीकडून एखादी वस्तू मिळण्याची शक्यता आहे. सहकाऱ्यांकडून अडचणी येऊ शकतात, तेव्हा सतर्क राहा.

मूलांक 9 – काम करताना सावध राहा

मूलांक 9 साठी आजचा दिवस ठिक आहे पण कोणतेही काम करताना सावध राहा. व्यवसायिकांना कच्चा माल मिळवताना अडचण येवू शकते. नवीन कामाची सुरुवात करताना थोडी अडचण येईल. पोटदुखीचा त्रास येवू शकतो त्यामुळे मसालेदार खाणे टाळावे.

अनिता किंदळेकर

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.