Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे राशिभविष्य, २९ नोव्हेंबर २०२४ : मिथुनसह ३ राशींनी अनावश्यक खर्च थांबवा! कामात नुकसान, वाचा शुक्रवारचे राशीभविष्य

4

Today Horoscope 29 november in Marathi, आजचे राशीभविष्य:  
आज २९ नोव्हेंबर शुक्रवार आहे. शिवरात्री असून कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. स्वाती नक्षत्र आणि विष्टि करणाचा शुभ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे काही राशींना आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागेल. प्रियजनांसोबत मजा करण्यात वेळ घालवाल. सरकारकडूनही सन्मान मिळण्याची शक्यता आहे. जुन्या मित्र तुम्हाला मिळेल.चला जाणून घेऊया मेष ते मीन राशीच्या सर्व 12 राशींसाठी शुक्रवारचा दिवस कसा आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
आजचे राशिभविष्य, २९ नोव्हेंबर २०२४ : मिथुनसह ३ राशींनी अनावश्यक खर्च थांबवा! कामात नुकसान, वाचा शुक्रवारचे राशीभविष्य

Aaj che Rashi Bhavishya 29 november 2024 :
आज २९ नोव्हेंबर शुक्रवार आहे. शिवरात्री असून कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी आहे. स्वाती नक्षत्र आणि विष्टि करणाचा शुभ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे काही राशींना आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागेल. प्रियजनांसोबत मजा करण्यात वेळ घालवाल. सरकारकडूनही सन्मान मिळण्याची शक्यता आहे. जुन्या मित्र तुम्हाला मिळेल. पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस चांगला आहे. शुभ कार्यात सहभागी व्हाल. आईकडून प्रेम आणि आपुलकी मिळत आहे. पैसे खर्च करण्याची गरज नाही. तुमचे शत्रू पाहून अस्वस्थ होतील. भावाच्या मदतीने व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे. जोडीदारासाठी भेटवस्तू खरेदी कराल. ज्यामुळे आनंदी असाल. जाणून घेऊया ज्योतिषी चिराग दारुवालांकडून आजचे राशीभविष्य

मेष – जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल.

आज काही उधार घेण्याचा विचार करत असाल फेडणे कठीण होईल. तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. प्रियजनांसोबत मजा करण्यात वेळ घालवाल. सरकारकडूनही सन्मान मिळण्याची शक्यता आहे. जुन्या मित्र तुम्हाला मिळेल.
आज भाग्य ९२ टक्के तुमच्या बाजूने असेल. संकटनाशक गणेश स्तोत्रचे पठण करा.

वृषभ – पायाला दुखापत होऊ शकते.

तुमची काही प्रलंबित कामे पूर्ण होतील. सावधगिरी बाळगावी लागेल. पायाला दुखापत होण्याची भीती आहे. तुमचे मन प्रसन्न राहिल. पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस चांगला आहे. शुभ कार्यात सहभागी व्हाल.
आज भाग्य ९७ टक्के तुमच्या बाजूने असेल. कुत्र्याला चपाती खाऊ घाला.

मिथुन – अनावश्यक खर्च थांबवा

आज तुम्हाला फालतूचा खर्च थांबवावा लागेल. काही अनावश्यक खर्च तुम्हाला थांबवावे लागेल. ज्यामुळे पैसे वाचतील. शारीरिक आजाराने त्रस्त असाल तर त्रास वाढेल. मुलांकडून आनंददायक बातम्या ऐकायला मिळतील. तुमचे मन प्रसन्न राहील.
आज भाग्य ८५ टक्के तुमच्या बाजूने असेल. देवी सरस्वतीची पूजा करा.

कर्क – नवीन व्यवसाय सुरु कराल

आज तुम्ही नवीन व्यवसाय सुरु करण्याचा विचार कराल. तुमच्या मुलांवरचा विश्वास वाढेल. कोणाच्याही बद्दल वाईट भावना ठेवू नका. आईकडून प्रेम आणि आपुलकी मिळत आहे. पैसे खर्च करण्याची गरज नाही. तुमचे शत्रू पाहून अस्वस्थ होतील.
आज भाग्य ६३ टक्के तुमच्या बाजूने असेल. भगवान श्रीकृष्णाची पूजा करा

सिंह – व्यवसायात नफा

आज तुमच्या सासरच्या लोकांबद्दल नाराजी व्यक्त कराल. वडिलांच्या डोळ्यांशी संबंधित समस्या वाढतील. भावाच्या मदतीने व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे. जोडीदारासाठी भेटवस्तू खरेदी कराल. ज्यामुळे आनंदी असाल.
आज भाग्य ९८ टक्के तुमच्या बाजूने असेल. गणपतीला लाडू अर्पण करा

कन्या – पैसे खर्च करावे लागतील

आज तुमची सर्व कामे पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करावा लागेल. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणातील अडथळे दूर होतील. तुम्हाला पालकांचा पाठिंबा मिळेल. तब्येतीची काळजी घ्या. घरी पाहुणे येऊ शकतात. तुम्हाला काही पैसे खर्च करावे लागतील.
आज भाग्य ८६ टक्के तुमच्या बाजूने असेल. देवी पार्वतीची पूजा करा.

तुळ – आर्थिक स्थिती मजबूत होईल

आज तुमच्या संपत्तीत वाढ होताना दिसेल. मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर इच्छा पूर्ण होतील. मित्राकडून भेटवस्तू घ्याल. व्यवसायात पैसे अडकले असतील तर ते आज मिळतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. कुटुंबाच्या सर्व महत्त्वकांक्षा पूर्ण कराल.
आज भाग्य ९१ टक्के तुमच्या बाजूने असेल. भगवान विष्णुचे १०८ वेळा नामस्मरण करा

वृश्चिक – संयम ठेवा

आजचा दिवस तुमच्यासाटी त्रासदायक असेल. घर आणि व्यवसायातील अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. संयम आणि कौशल्याच्या जोरावर शत्रूला पराभव कराल. ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहिल. बोलण्यात सौम्यता ठेवा.
आज भाग्य ६६ टक्के तुमच्या बाजूने असेल. ब्राह्मणांना दान करा

धनु – नुकसान होण्याची शक्यता

आज तुमच्यात परोपकाराची भावना वाढेल. धार्मिक ठिकाणी फिरायला जाल. ज्यामुळे तुमची कीर्ती वाढेल. सासरच्या व्यक्तीकडून पैसे घ्यावे लागतील. नात्यात दूरावा येईल. रोजगाराच्या दिशेने काम करणाऱ्या लोकांना सुवर्ण संधी मिळेल. पार्टनरशीपमध्ये व्यवसाय करत असाल तर मोठे नुकसान होईल.
आज भाग्य ७१ टक्के तुमच्या बाजूने असेल. गरीबांना अन्नदान करा

मकर – संपत्ती मिळेल

आज तुमच्या वडिलांच्या आशीर्वादाने काही मौल्यवान संपत्ती मिळेल. खर्चांना तुम्हाला सामोरे जावे लागेल. सासरच्या लोकांकडून आदर मिळेल. नवीन कामात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर भविष्यात त्याचा फायदा होईल.
आज भाग्य ७७ टक्के तुमच्या बाजूने असेल. चंदनाचा टिळा कपाळावर लावा.

कुंभ- जोडीदारासोबत वाद होईल

आज तुम्हाला शहाणपणाने आणि विवेकाने निर्णय घ्यावा लागणार आहे. कोणाच्या सल्ल्याने कोणताही निर्णय घेतल्याने भविष्यात नुकसान होईल. व्यवसायात प्रगती पाहून आनंदी व्हाल. बहिणीच्या लग्नातील अडथळे दूर होतील. जोडीदारासोबत काही मुद्द्यावरुन वाद होईल.
आज भाग्य ६५ टक्के तुमच्या बाजूने असेल. पांढरे रेशमी वस्त्र परिधान करा

मीन – आनंदी असाल

आज कुटुंबातील सदस्यांसोबत वैवाहिक जीवनाशी संबंधित समस्या चर्चा करुन संपतील. कामाच्या ठिकाणी तुम्ही आनंदी असाल. मित्राच्या मदतीसाठी पुढे याल. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना नवीन संधी मिळेल. मित्रांसोबत पार्टीला जाल.
आज भाग्य ८१ टक्के तुमच्या बाजूने असेल. शनिदेवाचे दर्शन घेऊन तेल अर्पण करा

कोमल दामुद्रे

लेखकाबद्दलकोमल दामुद्रेकोमल दामुद्रे मागच्या साडेचार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये लिखाण करत आहे. लाईफस्टाइल, टेक, ऑटो, धार्मिक, प्रवास आणि बिझनेस क्षेत्रातील विविध विषयांवर लिखाण. मागच्या दोन वर्षांपासून धार्मिक विषयांवर लिखाण करत आहे. कालनिर्णयमध्ये संपादकीय सहाय्यक. कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक, कालनिर्णय मुख्य एडिशन, कालनिर्णय आरोग्य व कालनिर्णय स्वादिष्ट यावर काम करण्याचा अनुभव. यापूर्वी कोमलने २०१९ मधील लोकसभा निवडणुकांसाठी पीआर म्हणून काम केले. कोमल ला कामाव्यतिरिक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून कविता आणि लेख लिहायला आवडतात. नवीन पुस्तके आणि धार्मिक गोष्टी वाचण्यात अधिक रस…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.