Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
डिसेंबर राशीभविष्य २०२४ : मार्गशीर्ष महिन्यात ४ राशींवर देवीची कृपा! आरोग्याची काळजी घ्या, मान-सन्मानात वाढ, पदोन्नती मिळेल, वाचा डिसेंबरचे राशीभविष्य
Monthly Horoscope December 2024 in marathi : डिसेंबर महिन्यात मोठ्या ग्रहांचे संक्रमण होणार आहे. मंगळ आणि शुक्राचे संक्रमण होईल. त्यामुळे चढ-उतारासह आर्थिक चणचण कमी होईल. या महिन्यात शुक्र पहिल्यांदा धनु राशीतून मकर राशीत येईल. त्यानंतर मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करेल. तुमची राशी काय सांगते त्यासाठी सविस्तरपणे वाचा राशिभविष्य.
डिसेंबर महिन्यात मोठ्या ग्रहांचे संक्रमण होणार आहे. मंगळ आणि शुक्राचे संक्रमण होईल. त्यामुळे चढ-उतारासह आर्थिक चणचण कमी होईल. या महिन्यात शुक्र पहिल्यांदा धनु राशीतून मकर राशीत येईल. त्यानंतर मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करेल. त्यामुळे अनेक राशींना फायदा होणार. धनुसह काही राशींची आर्थिक स्थिती सुधारेल. कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला वडिलांचे विशेष सहकार्य मिळेल. कर्ज आणि आजारपणापासून मुक्त होण्यात यशस्वी व्हाल. समाजात मान-सन्मान वाढेल. नोकरदारांनी आपले काम दुसऱ्यावर सोपवू नका. कामात घाई करणे टाळावे, काम बिघडू शकते. वाहन काळजीपूर्वक चालवावे. या काळात काही मोठे यश मिळू शकते. डिसेंबर महिन्याचे राशीभविष्य सविस्तर जाणून घेऊया.
मेष – प्रगतीच्या संधी मिळतील.
मेष राशीच्या लोकांसाठी डिसेंबरचा महिना शुभ असणार आहे. कामात अपेक्षित लाभ मिळतील. तुमचा सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्ही तुमची सर्व कामे बुद्धिमत्तेने, विवेकबुद्धीने आणि वाणीने पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. व्यावसायिक दृष्टीकोनातून कमिशन, कंत्राटी, कामगारांसाठी हा काळ शुभ राहिल. करिअर आणि व्यवसायात प्रगतीच्या अनेक नवीन संधी मिळतील. बेरोजगारांना रोजगार मिळू शकतो. या काळात तीर्थयात्रा होण्याची शक्यता अधिक आहे. परदेशात करिअर आणि व्यवसायातील अडथळे दूर होतील. कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला वडिलांचे विशेष सहकार्य मिळेल. कर्ज आणि आजारपणापासून मुक्त होण्यात यशस्वी व्हाल. समाजात मान-सन्मान वाढेल. मालमत्तेशी संबंधित लाभ होईल. व्यवसाय विस्ताराच्या योजनेतून प्रत्यक्षात लाभ होईल. मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळेल. अविवाहित लोकांचे विवाह निश्चित होऊ शकतात. प्रेमसंबंधात कुटुंबाकडून ग्रीन सिग्नल मिळेल.
वृषभ – आरोग्याची काळजी घ्या
वृषभ राशीच्या लोकांसाठी हा महिना संमिश्र असणार आहे. या महिन्यात पैसा, आरोग्य, वेळ काळजीपूर्वक सांभाळावा लागेल. काही जुने आजार त्रास देतील. शारीरिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागू शकते. आरोग्यामुळे कामावर परिणाम होऊ शकतो. खाण्याच्या पिण्याची विशेष काळजी घ्या. व्यवसायात पैसे गुंतवणूक करताना शुभचिंतकांचा सल्ला घ्या. नोकरदारांनी आपले काम दुसऱ्यावर सोपवू नका. कामात घाई करणे टाळावे, काम बिघडू शकते. वाहन काळजीपूर्वक चालवावे. या काळात काही मोठे यश मिळू शकते. प्रेमसंबंधात सावध राहावे लागेल. जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करणे टाळा. नात्यात दूरावा येऊ शकतो.
मिथुन – व्यवसायात लाभ होईल
डिसेंबरचा महिना मिथुन राशीसाठी संमिश्र असणार आहे. तुम्हाला घरातून आणि बाहेरील सर्वांचे पूर्ण सहकार्य मिळेल. बॉस तुमच्याशी नीट वागेल. पदोन्नती होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अतिशय शुभ राहिल. आवडत्या ठिकाणी बदली होण्याची शक्यता आहे. व्यवसाय वाढवण्यासाठी हा काळ शुभ राहिल. दुकान किंवा नवीन व्यवसाय सुरु कराल. कुटुंबासोबत फिरायला जाण्याचा प्लान कराल. प्रवास आनंददायी आणि मनोरंजक असेल. कामाच्या ठिकाणी काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. विरोधक तुमच्या कामात अडथळे निर्माण करतील. कामाकडे दुर्लक्ष करु नका. संयमाने काम केल्यास फायदा होईल. व्यवसायाशी संबंधित लोकांना या काळात पैशाच्या व्यवहारात काळजी घ्यावी लागेल. व्यवसायात पैसे गुंतवणे टाळा. प्रेमसंबंधात मोठे पाऊल उचलण्यापूर्वी विचार करा, पश्चाताप करावा लागू शकतो. वैवाहिक जीवनाक छोट्या गोष्टींवरुन वाद होतील.
कर्क – जबाबदाऱ्या वाढतील
डिसेंबरचा महिना कर्क राशीसाठी संमिश्र परिणाम देईल. महिन्याच्या सुरुवातीला कामात अपेक्षित यश मिळेल. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने तुम्ही मोठी समसम्या सोडवाल. या काळात मित्र आणि नातेवाईकांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. वडिलोपार्जित मालमत्ता मिळविण्यात येणारे अडथळे दूर होतील. नोकरदार लोकांसाठी हा काळ अनुकूल राहिल. कामावर बॉसकडून प्रशंसा होईल. मोठ्या प्रकल्पाची जबाबदारी मिळेल. आरोग्याची विशेष काळजी घ्या, तब्येत बिघडल्याने कामावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मोठ्या संधी हातातून जाऊ शकतात. या काळात घरातील छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करु नका. कुटुंबासोबत फिरायाला जाण्याचा प्लान कराल. आरोग्याची आणि सामानाची पूर्ण काळजी घ्या. खाण्याच्या सवयींची विशेष काळजी घ्यावी. नोकरदार लोकांना पदोन्नती मिळू शकते. व्यवसाय वाढवण्यासाठी हा काळ तुमच्यासाठी अनुकूल असेल. प्रेमसंबंधात तुम्हाला पूर्ण ताकदीने पुढे जावे लागेल. प्रेमसंबंधात प्रामाणिक राहा. एक्स्ट्रा अफेअर्समुळे वैवाहिक जीवनावर परिणाम होईल.
सिंह – घरात शुभ कार्य घडतील
हा महिना तुमच्यासाठी सौभाग्य आणि शुभ ठरणार आहे. मेहनतीचे आणि प्रयत्नांचे शुभ परिणाम मिळतील. नोकरीत बढतीची शक्यता आहे. इच्छित ठिकाणी बदलीची इच्छा पूर्ण होईल. राजकारणाशी संबंधित लोकांना उच्च पद आणि महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळतील. या काळात समजाता तुमचा मान-सन्मान वाढेल. व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी हा महिना शुभ असणार आहे. व्यवसायात अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळेल. व्यवसाय विस्ताराच्या योजना प्रत्यक्षात येतील. परदेशाशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ अतिशय शुभ असेल. व्यवसायात काही बदल करण्याचा विचार करत असाल तर हा काळ चांगला आहे. विद्यार्थ्यांना मोठे यश मिळेल. इच्छुकांचे लग्न जमेल. घरात शुभ कार्य घडतील. कामाचा अतिरिक्त दबाव राहिल. पोटाशी संबंधित समस्या त्रास देतील. व्यवसायात गुंतलेल्या लोकांना कठीण स्पर्धेला सामोरे जावे लागेल. जोडीदारासोबत आनंदाचे क्षण घालवाल.
कन्या – रागामुळे नुकसान होईल
कन्या राशीसाठी हा महिना इच्छित यश आणि सर्व पूर्तीच्या दिशेने असेल. तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल. काही धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. तुमचा मान-सन्मान वाढेल. कामाच्या निर्णयाची प्रशंसा कराल. ज्यामुळे उत्साह आणि आत्मविश्वास वाढेल. तब्येतील सुधारणा होईल. तुम्ही उत्साहाने काम कराल. न्यायालयातील प्रकरणे तुमच्या बाजूने येतील. काही प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने मालमत्तेशी संबंधित वाद मिटतील. ज्यामुळे तुम्हाला मन:शांती मिळेल. रागावर थोडे नियंत्रण ठेवा. रागामुळे तुमचे नुकसान होईल. प्रेमसंबंधात ग्रीन सिग्नल मिळेल. वैवाहिक जीवन आनंदी राहिल.
तुळ – इच्छूकांचे लग्न जमेल
तुळ राशीच्या लोकांसाठी हा महिना शुभ आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी संबंध चांगले होतील. काम वेळेत पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. तुमचे पद आणि प्रतिष्ठा वाढेल. नोकरदार लोकांसाठी उत्पन्नाचे अतिरिक्त स्त्रोत निर्माण होतील. संपत्तीत वाढ होईल. बुद्धिमत्ता आणि विवेकाच्या मदतीने विजय मिळवण्यात यशस्वी व्हाल. या काळात अशक्य असलेले काम सहज कराल. व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. विद्यार्थ्यांना हा काळ शुभ असेल. कुटुंबासोबत तीर्थस्थळी जाल. भविष्यात लाभदायक योजनांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. नवीन व्यवसाय सुरु करु शकता. मित्रांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. प्रेमसंबंधात हा महिना अनुकूल राहिल. जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. प्रेमसंबंधातील नाते लग्नात बदलू शकते. वैवाहिक जीवन आनंदी राहिल.
वृश्चिक – पार्टनरशीपमधून फायदा होईल
हा महिना तुमच्यासाठी संमिश्र परिणाम देणारा असेल. या काळात नोकरदार लोकांच्या प्रगतीत वाढ होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी वरिषठ आणि कनिष्ठ यांचे सहकार्य मिळेल. व्यवसायात अपेक्षित नफा मिळेलय छोटे-मोठे प्रवास सुखकर आणि फायदेशीर ठरतील. नवीन व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असाल तर यशस्वी व्हाल. पार्टनरशीपमध्ये व्यवसाय करणाऱ्यांना विशेष लाभ मिळेल. सत्तेत असलेल्यांना सरकारकडून लाभ मिळेल. बुद्धिमत्ता, वाणी आणि विवेकबुद्धीच्या जोरावर कोणत्याही अपेक्षित यश मिळवण्यात यशस्वी व्हाल. या काळात तुमच्यात आत्मविश्वास अधिक असेल. कौटुंबिक विषयावर महत्त्वाचे निर्णय घ्याल. कुटुंबातील सर्व सदस्यांचे सहकार्य मिळेल. या काळात चांगली बातमी मिळू शकते. बेरोजगारांनी प्रयत्न केल्यास अपेक्षित रोजगार मिळेल. सहकाऱ्यांशी कामाच्या ठिकाणी वाद होतील. व्यावसायिकांसाठी हा काळ आव्हानात्मक असेल. प्रेमसंबंधात गोष्टी सामान्य राहातील. जोडीदाराची साथ मिळेल. आरोग्य सामान्य राहिल.
धनु – उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण होईल
हा महिना धनु राशीच्या लोकांसाठी शुभ आणि सौभाग्याचा असेल. कामासाठी लांबचा प्रवास करावा लागेल. प्रवासात अनेक प्रभावशाली लोक भेटतील. ज्यांच्या मदतीने फायदा होईल. अविवाहिताचे लग्न जमेल. कुटुंबात शुभ कार्य घडेल. आर्थिकदृष्टीकोनातून हा काळ तुमच्यासाठी शुभ असेल. नोकरदार लोकांसाठी उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होतील. व्यवसायात अपेक्षित लाभ मिळतील. व्यवसाय वाढवण्याचा विचार करत असाल तर पार्टनरशीपमधून फायदा होईल. वरिष्ठाचे सहकार्य मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमची विश्वासार्हता निर्माण होईल. धार्मिक- सामाजिक कार्यात सन्मान मिळेल. रागावर नियंत्रण ठेवा, काम बिघडू शकते. छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा. आरोग्य आणि नातेसंबंधांकडे लक्ष द्यावे लागेल. प्रेमसंबंधात हा महिना अनुकूल राहिल.
मकर – कामात अडथळे येतील
मकर राशीच्या लोकांसाठी डिसेंबर महिना संमिश्र असेल. या महिन्यात अपेक्षित यश मिळविण्यासाठी लोकांसोबत काम करावे लागेल. नियोजित कामे वेळेवर पूर्ण कराल. जीवनाशी संबंधित सर्व अडथळे सहज पार कराल. कामाच्या ठिकाणी विरोधक तुमच्यावर वर्चस्व गाजवतील. ध्येयापासून तुमचे लक्ष विचलित होईल. खूप शांत राहून आव्हानांना सामोरे जावे लागेल. कामाच्या ठिकाणी तुमची परीक्षा घेतली जाईल. वडिलोपार्जित संपत्ती मिळवण्यात अडथळे येतील. वाद सोडवण्यासाठी कोर्टात जावे लागेल. तुम्हाला सर्व समस्यांतून काही प्रमाणास दिलासा मिळेल. नियोजित कामे वेळेवर पूर्ण कराल. आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. जुने आजार त्रास देतील. कामाच्या दृष्टीकोनातून हा काळ शुभ असेल. सत्ता आणि सरकारशी संबंधित बाबींमध्ये यश मिळेल. करिअर आणि व्यवसायाच्या संदर्भात केलेले प्रवास शुभ ठरतील. व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. गोंधळामुळे मोठे निर्णय घेणे टाळा. प्रेमसंबंधात भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. जोडीदाराची साथ मिळेल.
कुंभ – रखडलेले पैसे मिळतील
डिसेंबरची सुरुवात तुमच्यासाठी शुभ आणि सौभाग्य घेऊन येईल. या काळात तुम्हाला मेहनतीचे आणि प्रयत्नांचे फळ मिळेल. सरकारी मदतीतून आर्थिक लाभ होतील. नोकरदार लोकांची इच्छित ठिकाणी बदली होईल. नोकरी शोधणाऱ्यांना नव्या संधी मिळतील. कौटुंबिक समस्या दूर झाल्याने तुम्ही आनंदी असाल. मित्रांसोबत फिरायला जाण्याचा प्लान कराल. प्रिय व्यक्तीच्या यशामुळे घरात आनंदाचे वातावरण असेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना खूप शुभ राहिल. रखडलेले पैसे अनपेक्षिपणे मिळतील. विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळेल. व्यावसायिक अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना या आठवड्यात अपेक्षित निकाल मिळतील. धार्मिक कार्यात अधिक रस मिळेल. प्रेमसंबंधात हा महिना तुमच्यासाठी सामान्य राहिल. जोडीदारासोबत प्रेम आणि सौहार्द राहिल.
मीन – मोठी जबाबदारी मिळेल
मीन राशीच्या लोकांसाठी हा महिना शुभ राहिल. कामात अपेक्षित यश मिळेल. कामात सहकार्य मिळेल. स्वत:चा व्यवसाय चालवत असाल तर चांगले परिणाम मिळतील. व्यावसायिक लोकांसाठी हा काळ कामाच्या ठिकाणी अपेक्षित यश देईल. तुमचे वर्चस्व वाढून अपेक्षित नफा मिळेल. तुम्हाला मोठे प्रोजेक्ट मिळतील. राजकारणात असणाऱ्या लोकांसाठी हा काळ अतिशय शुभ राहिल. काही विशेष पद आणि जबाबदारी मिळू शकते. तुमचा मान-सन्मान वाढेल. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर हितचिंतकांचा सल्ला जरुर घ्या. विद्यार्थ्यांसाठी हा काळ शुभ राहिल. कुटुंबासह फिरायला जाल. प्रेमसंबंधात हा महिना अनुकूल असेल. नात्यात विश्वास वाढेल. वैवाहिक जीवन आनंदी राहिल. मुलांशी संबंधित समस्या दूर होतील. आरोग्य सामान्य राहिल.