Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
आजचे राशिभविष्य, ८ डिसेंबर २०२४ : कर्कसह ४ राशींना कामात पदोन्नती! बोलण्यात गोडवा ठेवा, वाचा रविवारचे राशीभविष्य
Today Horoscope 8 december in Marathi, आजचे राशीभविष्य:
आज रविवार, 8 डिसेंबर रोजी चंद्राचे कुंभ राशीत भ्रमण झाले असून चंद्राच्या बाराव्या व द्वितीय भावातील ग्रहांच्या स्थितीमुळे दुर्धार नावाचा योगही तयार होत आहे. मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील सप्तमी तिथी असून या दिवशी दुर्धारा योग आणि शतभिषा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचे महत्त्व वाढले आहे. चला जाणून घेऊया मेष ते मीन राशीच्या सर्व 12 राशींसाठी रविवारचा दिवस कसा आहे.
आज रविवार, 8 डिसेंबर रोजी चंद्राचे कुंभ राशीत भ्रमण झाले असून चंद्राच्या बाराव्या व द्वितीय भावातील ग्रहांच्या स्थितीमुळे दुर्धार नावाचा योगही तयार होत आहे. मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील सप्तमी तिथी असून या दिवशी दुर्धारा योग आणि शतभिषा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचे महत्त्व वाढले आहे. कुटुंबात तणावाची स्थिती राहील. व्यवसायानिमित्त बाहेर जाण्याचा विचार करत असाल तर काम पुढे ढकला. विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम करावे लागेल. राजकारणात असणाऱ्यांनी सावध राहावे. आज पैसे सहज उधार मिळतील. आज कुठेतरी गुंतवणूक केल्यास नशिब साथ देणार नाही. कोणाचाही सल्ला घेऊ नका. जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाल. जाणून घेऊया ज्योतिषी चिराग दारुवालांकडून आजचे राशीभविष्य
मेष – तणावाची स्थिती राहिल
आज तुमच्या महत्त्वकांक्षा पूर्ण झाल्याने मन प्रसन्न राहील. कायदेशीर वादाचा निकाल तुमच्या बाजूने लागेल. कुटुंबात तणावाची स्थिती राहील. व्यवसायानिमित्त बाहेर जाण्याचा विचार करत असाल तर काम पुढे ढकला. विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम करावे लागेल.
आज भाग्य ९३ टक्के तुमच्या बाजूने असेल. पिंपळाच्या झाडावर दूध मिश्रित पाणी अर्पण करा.
वृषभ – मन अस्वस्थ राहिल.
आज तुम्ही घरातील दैनंदिन गरजांसाठी काही खरेदी कराल. तुमचे उत्पन्न लक्षात घेऊन खर्च करा. भविष्यात आर्थिक अडचणी येतील. व्यवसायात विरोधक त्रास देतील. मन अस्वस्थ राहिल.
आज भाग्य ७७ टक्के तुमच्या बाजूने असेल. गाईला हिरवा चारा खाऊ घाला.
मिथुन – पैसे उधार मिळतील
आजचा दिवस राजकीय कामात अडथळे निर्माण करेल. राजकारणात असणाऱ्यांनी सावध राहावे. आज पैसे सहज उधार मिळतील. कुटुंबातील सदस्य शुभ कार्यात सहभागी होतील. काही प्रभावशाली लोकांना भेटाल. बोलण्यात गोडवा ठेवा.
आज भाग्य ८६ टक्के तुमच्या बाजूने असेल. शिवलिंगावर दूध अर्पण करा.
कर्क – पदोन्नती मिळेल
आज व्यवसायाशी संबंधित लोकांना काही चढ-उतारांना सामोरे जावे लागेल. दैनंदिन कामांसाठी वेळ काढू शकाल. व्यवसाय करणाऱ्यांना अधिक माहिती मिळेल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळेल. तुम्हाला मानसिक शांती मिळेल. तणाव असल्यास दूर होईल.
आज भाग्य ७४ टक्के तुमच्या बाजूने असेल. पांढरी वस्तू दान करा
सिंह – नशिबाची साथ मिळणार नाही.
आज सामाजिक कार्य केल्याने चांगली प्रतिमा निर्माण होईल. तुमचे नवीन मित्र बनतील. आज कुठेतरी गुंतवणूक केल्यास नशिब साथ देणार नाही. कोणाचाही सल्ला घेऊ नका. जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाल.
आज भाग्य ६९ टक्के तुमच्या बाजूने असेल. शिव चालीसाचे पठण करा.
कन्या – पद- प्रतिष्ठा वाढेल
आज तुमचे जोडीदाराशी वैचारिक मतभेद होतील. तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. तुम्हाला ताण सहन करावा लागेल. तुमचे पद आणि प्रतिष्ठा वाढेल. एखाद्याकडून कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर अजिबात घेऊ नका. फेडणे कठीण होईल. व्यवसायातील प्रगतीमुळे आनंदी असाल.
आज भाग्य ९१ टक्के तुमच्या बाजूने असेल. वरिष्ठांचा आशीर्वाद घ्या.
तुळ – धावपळ होईल
आज व्यावसायिक पार्टनरशीपमध्ये मदत मागितल्यास सहज मिळेल. विवाहयोग्य लोकांसाठी चांगले विवाहाचे प्रस्ताव येतील. कुटुंबाची मान्यता मिळेल. भावाला आरोग्याच्या समस्या असतील. तुम्हाला थोडी धावपळ करावी लागेल. काही पैसे खर्च होतील. सासरच्यांकडून आदर मिळेल.
आज भाग्य ९२ टक्के तुमच्या बाजूने असेल. भगवान श्रीकृष्णाची पूजा करा.
वृश्चिक – मेहनत करावी लागेल
आज इतरांना मदत करण्याची संधी मिळेल. ज्यामुळे आत्मसन्मान वाढेल. नोकरीत अधिक मेहनत करावी लागेल. सहकाऱ्यांचा मदत मिळेल. पालकांची सेवा कराल. सासरच्या व्यक्तीकडून पैसे उधार घ्यावे लागतील.
आज भाग्य ९७ टक्के तुमच्या बाजूने असेल. देवी सरस्वतीची पूजा करा
धनु – मतभेद होतील
आज तुमची सर्व कामे पूर्ण होतील. कुटुंबातील सदस्यासोबत मतभेद होईल. काही समस्यांपासून मुक्त व्हाल. बहिण-भावाच्या लग्नातील अडथळे दूर होतील. कुटुंबात शुभ कार्यक्रमाची चर्चा होईल. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल. मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या.
आज भाग्य ८५ टक्के तुमच्या बाजूने असेल. पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा.
मकर – नुकसान होईल
आज नवीन डील फायनल झाली तर व्यवसायात भरपूर आर्थिक नफा मिळेल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. पत्नीची अचानक तब्येत बिघडेल. तुमची धावपळ होईल. मित्रामुळे तुमचे नुकसान होईल.
आज भाग्य ७२ टक्के तुमच्या बाजूने असेल. भगवान विष्णूचे स्मरण करा.
कुंभ – रखडलेले काम पूर्ण होईल
आज तुम्हाला मोठी रक्कम मिळेल. तुमचे मन प्रसन्न होईल. तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची मदत कराल. तुमचे एखादे रखडलेले काम पूर्ण होईल. जोडीदारासोबत काही वाद होतील. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल.
आज भाग्य ७९ टक्के तुमच्या बाजूने असेल. पिवळी वस्तू दान करा.
मीन – मन प्रसन्न राहिल.
आज तुम्हाला ऑफिसमध्ये तुमची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल. ज्यामुळे तुम्ही आनंदी असाल. विद्यार्थांना उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल. सामाजिक कार्यात रुची वाढेल, मन प्रसन्न होईल. मित्राच्या मदतीने तुम्ही पुढे याल. भविष्यात फायदा होईल.
आज भाग्य ७६ टक्के तुमच्या बाजूने असेल. गायत्री चालीसाचे पठण करा.