Warning: array_key_exists() expects parameter 2 to be array, bool given in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/onesignal-free-web-push-notifications/v3/onesignal-init.php on line 11
Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे पंचांग 10 डिसेंबर 2024: समसप्तक योग, रवि योग ! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

12

Today Panchang 10 December 2024 in Marathi: मंगळवार, १० डिसेंबर २०२४, भारतीय सौर १९ अग्रहायण शके १९४६, मार्गशीर्ष शुक्ल दशमी उत्तररात्री ३-४२ पर्यंत, चंद्रनक्षत्र: उत्तरा भाद्रपदा दुपारी १-३० पर्यंत, चंद्रराशी: मीन, सूर्यनक्षत्र: ज्येष्ठा

Maharashtra Times

राष्ट्रीय मिति मार्गशीर्ष ९, शक संवत १९४६, मार्गशीर्ष शुक्ल, दशमी, मंगळवार, विक्रम संवत २०८१, सौर मार्गशीर्ष मास प्रविष्टे २५, जमादी उल्सानी ०७, हिजरी १४४६ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख १० डिसेंबर २०२४. सूर्य दक्षिणायन, दक्षिण गोल, हेमंत ऋत. राहुकाळ दुपारी ३ ते साडेचार वाजेपर्यंत
दशमी तिथी मध्यरात्री ३ वाजून ४३ मिनिटांपर्यंत त्यानंतर एकादशी तिथी प्रारंभ, उत्तरभाद्रपदा नक्षत्र दुपारी १ वाजून ३० मिनिटांपर्यंत त्यानंतर रेवती नक्षत्र प्रारंभ, व्यतीपात योग रात्री १० वाजून ३ मिनिटांपर्यंत त्यानंतर वरीयान योग प्रारंभ, तैतील करण सायंकाळी ४ वाजून ५३ मिनिटांपर्यंत त्यानंतर वणीज करण प्रारंभ, चंद्र दिवस रात्र मीन राशीत संचार करेल.

  • सूर्योदय: सकाळी ७-०२
  • सूर्यास्त: सायं. ६-०१
  • चंद्रोदय: दुपारी १-५४
  • चंद्रास्त: उत्तररात्री २-३६

  • पूर्ण भरती: सकाळी ६-१९ पाण्याची उंची ३.९१ मीटर, रात्री ८-०७ पाण्याची उंची ३.६४ मीटर
  • पूर्ण ओहोटी: दुपारी १-२३ पाण्याची उंची १.३३ मीटर, उत्तररात्री १-३६ पाण्याची उंची २.०६ मीटर
  • सण आणि व्रत : समसप्तक योग, रवि योग

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून १७ मिनिटांपासून ते ६ वाजून ११ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ५ मिनिटांपासून ते २ वाजून ४७ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ५३ मिनिटांपासून ते १२ वाजून ४७ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ५ वाजून ३२ मिनिटांपासून ते ५ वाजून ५९ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी १० वाजून ५६ मिनिटांपासून १२ वाजून १४ मिनिटांपर्यंत

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी ३ ते साडे चार वाजेपर्यंत, दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत गुलीक काळ, सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ९ वाजून ११ मिनिटांपासून ते ९ वाजून ५३ मिनिटांपर्यंत, पंचक काळ पूर्ण दिवस राहील.

आजचा उपाय
हनुमान चालीसाचे पठण करा.
(आचार्य कृष्णदत्त)

अनिता किंदळेकर

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.