Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
आजचे पंचांग 13 डिसेंबर 2024: शुक्र प्रदोष व्रत, शिव योग, सिद्ध योग ! तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ
Today Panchang 13 December 2024 in Marathi: शुक्रवार, १३ डिसेंबर २०२४, भारतीय सौर २२ अग्रहायण शके १९४६, मार्गशीर्ष शुक्ल त्रयोदशी सायं. ७-४० पर्यंत, चंद्रनक्षत्र: भरणी सकाळी ७-४९ पर्यंत, कृत्तिका उत्तररात्री ५-४७ पर्यंत, चंद्रराशी: मेष दुपारी १-१९ पर्यंत, सूर्यनक्षत्र: ज्येष्ठा
त्रयोदशी तिथी सायंकाळी ७ वाजून ४१ मिनिटांपर्यंत त्यानंतर चतुर्दशी तिथी प्रारंभ, भरणी नक्षत्र सकाळी ७ वाजून ५० मिनिटांपर्यंत त्यानंतर कृतिका नक्षत्र प्रारंभ, शिव योग सकाळी ११ वाजून ५४ मिनिटांपर्यंत त्यानंतर सिद्ध योग प्रारंभ, कौलव करण दुपारी १ वाजून १९ मिनिटांपर्यंत, चंद्र दिवस-रात्र वृषभ राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ७-०४
- सूर्यास्त: सायं. ६-०२
- चंद्रोदय: सायं. ४-०५
- चंद्रास्त: पहाटे ४-४१
- पूर्ण भरती: सकाळ ९-३२ पाण्याची उंची ३.८५ मीटर, रात्री १०-५९ पाण्याची उंची ४.६६ मीटर
- पूर्ण ओहोटी: पहाटे ३-५० पाण्याची उंची १.९९ मीटर, सायं. ४-०५ पाण्याची उंची ०.४३ मीटर
- सण आणि व्रत : शुक्र प्रदोष व्रत, शिव चतुर्दशी व्रत, शिव योग, सिद्ध योग
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून १९ मिनिटांपासून ते ६ वाजून १३ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ६ मिनिटांपासून ते २ वाजून ४८ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ५४ मिनिटांपासून ते १२ वाजून ४९ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ५ वाजून ३३ मिनिटांपासून ते ६ वाजेपर्यंत, अमृत काळ सकाळी ७ वाजून ४० मिनिटांपासून १० वाजून ५८ मिनिटांपर्यंत
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत, सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत गुलीक काळ, दुपारी साडे तीन ते साडे चार वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ९ वाजून १३ मिनिटांपासून ते ९ वाजून ५५ मिनिटांपर्यंत
आजचा उपाय
मध आणि दूध एकत्र करून शंभोशंकरावर अभिषेक करा.
(आचार्य कृष्णदत्त)