Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Bhavishya Malika Viral 2025 : नवीन वर्षात शनिचे संक्रमण! भारतासह अनेक देशात संकटांची चाहूल, वाचा भविष्य मालिकाची भयंकर भविष्यवाणी

6

Shani Gochar Meen rashi : ज्योतिषशास्त्रानुसार २९ मार्च २०२५ रोजी शनि मीन राशीत प्रवेश करणार आहे. मीन राशीत शनीचे संक्रमण जगात अनेक बदल घडवून आणेल. मीन राशीमध्ये शनीचा प्रवेश अनेकांच्या जीवनात नकारात्मक परिणाम आणू शकतो.२०२५ मध्ये शनि मीन राशीत प्रवेश करेल तेव्हा भविष्यात काय होईल जाणून घेऊया.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
Bhavishya Malika Viral 2025 : नवीन वर्षात शनिचे संक्रमण! भारतासह अनेक देशात संकटांची चाहूल, वाचा भविष्य मालिकाची भयंकर भविष्यवाणी

Bhavishya Malika 2025 :
ज्योतिषशास्त्रानुसार २९ मार्च २०२५ रोजी शनि मीन राशीत प्रवेश करणार आहे. मीन राशीत शनीचे संक्रमण जगात अनेक बदल घडवून आणेल. मीन राशीमध्ये शनीचा प्रवेश अनेकांच्या जीवनात नकारात्मक परिणाम आणू शकतो.
मागच्या अनेक दशकापासून भूतकाळातील घडामोडी पाहिल्या आहेत. जेव्हा शनी मीन राशीतून संक्रमण झाला तेव्हा देशात आणि जगात अनेक विध्वंसकर घटना घडल्या आहे. १९३७ मध्ये शनीने मीन राशीत प्रवेश केला तेव्हा दुसरे महायुद्ध सुरु झाले.
भारतात १९६५-६६ मध्ये शनिने मीन राशीत संक्रमण केले होते तेव्हा भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरु झाले. भविष्य मालिकेनुसार यासंबंधित भविष्यवाणी करण्यात आली होती. २०२५ मध्ये शनि मीन राशीत प्रवेश करेल तेव्हा भविष्यात काय होईल जाणून घेऊया.

मीन राशीत शनि संक्रमणामुळे जगात युद्ध

ज्योतिषशास्त्रानुसार २९ मार्च २०२५ रोजी शनि मीन राशीत प्रवेश करेल. भविष्य मालिकेनुसार देश आणि जगासाठी अत्यंत घातक ठरेल. २०२५ मध्ये तिसऱ्या महायुद्धाचा पहिला टप्पा सुरु होऊ शकतो. विविध कारणांमुळे अनेक देशांमध्ये तणावाची स्थिती पाहायला मिळेल. भविष्य मालिकाच्या मते शनि २०२५ ते २०२७ पर्यंत मीन राशीत राहिल. भविष्य मालिकेनुसार अणुबॉम्ब स्फोटाशी संबंध जोडण्यात येत आहे.

मीन राशीत शनिच्या संक्रमणामुळे भारतावर संकट

भविष्य मालिकामध्ये संत अच्युतानंद यांनी भाकीत केले आहे की, २०२५ मध्ये जेव्हा शनि मीन राशीत प्रवेश करेल. तेव्हा भारतावर संकटे येतील. भारतात गृहयुद्धाची परिस्थिती निर्माण होईल. आगीचे अपघात वाढतील. जातीय हिंसाचाराची प्रकरणे वाढतील. आंदोलने वाढतील, ज्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण होईल.

मीन राशीत शनिच्या संक्रमणामुळे मनुष्य जीवन विस्कळीत

भविष्य मालिकेनुसार मीन राशीत शनीचे संक्रमण लोकांच्या मानसिक स्थितीवर परिणाम करेल. बहुतेक लोक अशांततेचा अनुभवतील. वैयक्तिक इच्छा पूर्ण करण्यासाठी मनुष्य नकारात्मक भूमिका पत्करेल. छोट्या मुद्द्यांवरुन भांडणे होऊ शकतात. २०२५ ते २७ मध्ये अनेक हिंसक घटना वाढतील.

मीन राशीत शनि संक्रमणामुळे आरोग्यावर परिणाम

भविष्य मालिकेनुसार शनि जेव्हा मीन राशीत प्रवेश करेल तेव्हा नैसर्गिक आपत्तींमध्ये वाढ होईल. जगातील अनेक भागात दुष्काळ पडेल. पिक नष्ट होतील. ज्यामुळे उपासमारीची समस्या निर्माण होईल. काही भागात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण होऊ शकते. पिकांचे नुकसान होऊल. भूकंप आणि पूर सारख्या आपत्तींनी जगभर हाहाकार माजवला जाईल.

शनि मीन राशीत गेल्यानंतर कसे असेल सत्ता परिवर्तन

भविष्य मालिकेनुसार शनी जेव्हा मीन राशीत संक्रमण करेल त्यानंतर जगात नवीन महामारीचा प्रलय येईल. आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी अनेक देश एकमेकांवर तुटून पडतील. जगभरातील सरकार लोकांचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरतील. ज्यामुळे सत्तापरिवर्तन धक्कादायक वळण घेईल.

कोमल दामुद्रे

लेखकाबद्दलकोमल दामुद्रेकोमल दामुद्रे मागच्या साडेचार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये लिखाण करत आहे. लाईफस्टाइल, टेक, ऑटो, धार्मिक, प्रवास आणि बिझनेस क्षेत्रातील विविध विषयांवर लिखाण. मागच्या दोन वर्षांपासून धार्मिक विषयांवर लिखाण करत आहे. कालनिर्णयमध्ये संपादकीय सहाय्यक. कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक, कालनिर्णय मुख्य एडिशन, कालनिर्णय आरोग्य व कालनिर्णय स्वादिष्ट यावर काम करण्याचा अनुभव. यापूर्वी कोमलने २०१९ मधील लोकसभा निवडणुकांसाठी पीआर म्हणून काम केले. कोमल ला कामाव्यतिरिक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून कविता आणि लेख लिहायला आवडतात. नवीन पुस्तके आणि धार्मिक गोष्टी वाचण्यात अधिक रस…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.