Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Aries Horoscope 2025 : शनिच्या साडेसातीसह गुरु संक्रमणाचा प्रभाव! नोकरी-व्यवसायासाठी कसे असेल मेष राशीसाठी नवीन वर्ष
Mesh Horoscope 2025 In marathi : ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीच्या लोकांसाठी २०२५ हे वर्ष चढ-उतारांनी भरलेले असणार आहे. या वर्षी शनि आणि गुरुच्या संक्रमणाचा तुमच्यावर प्रभाव राहिल. मार्च महिन्यापर्यंत तुमच्यासाठी हा काळ अत्यंत चांगला राहिल. परंतु, एप्रिलपासून तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल.जाणून घेऊया मेष राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष नोकरी, व्यवसाय आणि आरोग्यदृष्टीने कसे असेल.
Mesh Rashifal 2025 In Marathi :
ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीच्या लोकांसाठी २०२५ हे वर्ष चढ-उतारांनी भरलेले असणार आहे. या वर्षी शनि आणि गुरुच्या संक्रमणाचा तुमच्यावर प्रभाव राहिल. मार्च महिन्यापर्यंत तुमच्यासाठी हा काळ अत्यंत चांगला राहिल. परंतु, एप्रिलपासून तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. २९ मार्चपासून शनि साडेसातीचे मेष राशीवर पहिले चरण सुरु होणार आहे. त्याचा परिणाम पाहायला मिळेल. जाणून घेऊया मेष राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष नोकरी, व्यवसाय आणि आरोग्यदृष्टीने कसे असेल.
मेष राशी २०२५ आरोग्य –
ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीच्या लोकांना आरोग्याच्या बाबतीत अधिक जागरुक राहावे लागणार आहे. आरोग्याच्या संबंधित कोणत्या समस्या असतील तर अधिक सर्तक राहा. यावर्षी जोखीम टाळावी लागेल. हाडांच्या समस्या उद्भवतील.
मेष राशी २०२५ नोकरी –
मेष राशीच्या लोकांसाठी २०२५ नोकरी आणि व्यवसायाच्या दृष्टीने नवीन संधी घेऊन येईल. कामाच्या ठिकाणी तुमच्यासोबत अधिक वाद होतील. अधिकाऱ्यांकडून ताण सहन करावा लागेल. या वर्षी तुम्ही नोकरी बदलण्याचा प्रयत्न कराल, ज्यात तुम्हाला यश मिळेल. व्यापारात अधिक मानसिक तणाव सहन करावा लागेल. तांत्रिक अडचणी आणि खर्चाला सामोरे जावे लागेल. तुम्ही नवीन काम सुरु करु शकता. सहकाऱ्यांशी समन्वय राखा.
मेष राशी २०२५ आर्थिक –
मेष राशीच्या लोकांसाठी हे वर्ष अधिक खर्चिक असणार आहे. मालमत्ता खरेदी करायची असेल तर नवीन आशेचा किरण मिळेल. तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होतील. महिन्याच्या मध्यात तुम्हाला अनपेक्षित नफा आणि पैसा मिळेल. जोखमीच्या क्षेत्रात गुंतवणूक करणे टाळा. आरोग्यासाठी अधिक पैसे खर्च होतील. कोर्टाच्या प्रकरणापासून दूर राहा.
मेष राशी २०२५ प्रेम जीवन –
मेष राशीच्या लोकांसाठी हे वर्ष घर, कौटुंबिक आणि प्रेमसंबंधांच्या बाबतीत संमिश्र असेल. या वर्षी तुम्हाला वैवाहिक जीवनात आणि कुटुंबात अनेक समस्या आणि तणावांना सामोरे जावे लागेल. काही भांडणे तणावाचे कारण बनतील. प्रियकराशी मतभेद होण्याची शक्यता आहे. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. इच्छुकांचे यावर्षी लग्न जमेल. सासरच्या लोकांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवा. उधारीचे व्यवहार टाळा.
मेष राशी २०२५ उपाय –
- मेष राशीच्या लोकांनी २०२५ मध्ये नियमितपणे शनि स्त्रोताचे पठण करावे.
- मेष राशीच्या लोकांसाठी २०२५ मध्ये सात मुखी रुद्राक्ष धारण करणे फायदेशीर ठरेल.
- तुम्ही तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा, राग सहन करायला शिका, तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
- जर तुम्ही तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवले आणि राग सहन करायला शिकलात तर ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल.