Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे अंकभविष्य, 2 जानेवारी 2025: बदल सकारात्मक, लाभदायक ! कामात कठोर मेहनत ! जाणून घ्या, अंकशास्त्रानुसार तुमचे राशीभविष्य

7

Numerology Prediction, 2 January 2025 : आज 2025 वर्षातील पहिला दिवस अर्थात 2 जानेवारी असून मूलांक 1 असणारे प्रत्येक काम उत्साहाने करणार. मूलांक 3 साठी आर्थिक स्थिती उत्तम, मूलांक 4 असणाऱ्यांना कायदेशीर प्रकरणात .यश मिळेल. मूलांक 5 च्या लोकांनी आर्थिक व्यवहार करताना सावध राहा, मूलांक 6 साठी नातेसंबंधं अधिक मजबूत होतील, मूलांक 7 च्या लोकांना जुन्या समस्येवर समाधान सापडेल तर मूलांक 9 चे जातक अडचणींवर मात करणार आहेत. आज मूलांक 1 ते 9 साठी आजचा दिवस कसा आहे? तुमचा मूलांक काय सांगतो?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

Aajche Ank bhavishya, 2 January 2025: 2 जानेवारी, गुरुवार मूलांक 1 सह या मूलांकासाठी दिवस उत्तम आहे. सकारात्मक विचारांनी दिवसाची सुरुवात होईल. नातेसंबध अधिक दृढ होतील. मूलांक 8 साठी प्रत्येक कामात कठोर मेहनत आहे पण टेन्शन घेऊ नका, मेहनतीचे फळ मिळेल. या मूलांकाच्या जातकांनी आर्थिक व्यवहार करताना सावध राहा तसेच स्वतःलाही थोडा वेळ द्या. चला तर माहिती घेऊया मूलांक 1 ते 9 या क्रमांकाचे कोणते लोक आज भाग्यशाली आहेत.

मूलांक 1 – प्रत्येक काम उत्साहाने करणार

मूलांक 1 साठी आजचा दिवस सकारात्मक विचारांनी भरलेला असून प्रत्येक कामात उत्साह असेल. तुम्ही उत्तम नेतृत्व करणार आहात. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात यश मिळेल. प्रत्येक गोष्टीत तुमचा आत्मविश्वास दिसेल पण इतरांच्या विचारांनाही महत्त्व द्या.

मूलांक 2 – अडचणीवर संयमाने मात करा

मूलांक 2 साठी आजचा दिवस भावनिक चढ-उताराने भरलेला आहे. जुन्या वादावर तोडगा मिळेल. शांतपणे अडचणीवर मात करा तसेच संयमाने निर्णय घ्या. स्वतःला वेळ द्या आणि मानसिक शांती मिळवण्यासाठी योग किंवा ध्यानधारणा करा. नातेसंबंधात समतोल ठेवा.

मूलांक 3 – आर्थिक स्थिती उत्तम

मूलांक 3 साठी आजचा दिवस चांगला असून तुम्ही क्रिएटीव्ह काम करणार आहात. नवीन विचार आणि योजना घेऊन पुढे जाणार आहात. आर्थिक बाबतीत उत्तम लाभ असून सामाजिक क्षेत्रात तुमचे कौतुक होणार आहे. प्रत्येक कामासाठी वेळ उत्तम आहे पण संयमाने पुढे जा.

मूलांक 4 – बदल सकारात्मक असेल

मूलांक 4 साठी दिवस आजचा दिवस ठिक असून काही बदल होणार आहेत, जे तुमच्यासाठी सकारात्मक असतील. काही महत्त्वपूर्ण योजनांमध्येही बदल होतील, पण त्यामुळे फायदा होईल. कायदेशीर प्रकरणात तुमच्या बाजूने निकाल लागेल. सहकाऱ्यांची कामात मदत मिळेल.

मूलांक 5 – आर्थिक व्यवहार करताना सावध राहा

मूलांक 5 साठी आजचा दिवस ठिक असून सामाजिक आणि संवाद कौशल्य वाढेल. एखाद्या महत्त्वपूर्ण चर्चेत किंवा बैठकीत भाग घेणार आहात. तुमचे विचार स्पष्ट आणि प्रभावीपणे व्यक्त करण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक कामात मित्र मंडळी आणि कुटुंबीयांची साथ असेल. आर्थिक व्यवहार करताना सावध राहा.

मूलांक 6 – नातेसंबंधं अधिक मजबूत होतील

मूलांक 6 असलेल्यांसाठी दिवस चांगला असून घरासाठी काही खरेदी करणार आहात. नातेसंबंधं अधिक मजबूत होतील आणि नाराजीचा सुर दूर होईल. एखाद्या खास व्यक्तीसोबत वेळ व्यतीत करणार आहात. कामात संतुलन ठेवा आणि भावनांच्या आहारी वाहून जावू नका. मानसिक शांतता गरजेची आहे, स्वतःसाठी वेळ काढा.

मूलांक 7 – जुन्या समस्येवर समाधान सापडेल

मूलांक 7 असणाऱ्यांसाठी दिवस आध्यात्मिकता आणि आत्मपरीक्षण करण्यात जाणार आहे. तुम्ही प्रत्येक गोष्टीचा सखोल विचार करणार आहात. एखाद्या जुन्या समस्येवर समाधान सापडेल. ध्यानधारणेमुळे मानसिक शांती मिळेल. एखाद्या तिर्थयात्रेचा प्लॅन करणार आहात.

मूलांक 8 – दिवसभर कठोर मेहनत

मूलांक 8 असणाऱ्यांसाठी दिवस ठिक आहे पण प्रत्येक कामासाठी कठोर मेहनत घ्यावी लागेल. तुमचे धैर्य आणि दृढ निश्चय यामुळे यश प्राप्त होईल. मेहनत जास्त असली तरी त्याचे उत्तम फळ मिळेल. आर्थिक बाबतीत काळजी घ्या आणि जोखीम घेणे टाळा. घर आणि ऑफिस यामध्ये संतुलन ठेवा.

मूलांक 9 – अडचणींवर मात करणार

मूलांक 9 साठी दिवस आजचा दिवस एकात्मता आणि परिपूर्णतेचा आहे. एखादे जुने काम पुर्ण करण्याची उत्तम संधी मिळेल. तुमचा दृढ निश्चय आणि संकल्प यामुळे कोणत्याही अडचणींवर मात करणार आहात. प्रवासाची शक्यता आहे. तब्येतीची काळजी घ्या. जोडीदारासोबत संबंध चांगले असतील.

अनिता किंदळेकर

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते.आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.