Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
आर्थिक राशिभविष्य 31 जानेवारी 2025 : वृषभची किचकट कामे पूर्ण होणार ! तूळ राशीसाठी व्यवसायात उतारचढाव ! पाहा, तुमचे राशिभविष्य
Finance Horoscope Today 31 January 2025 In Marathi : शुक्रवार रोजी माता लक्ष्मीचा आशीर्वाद सर्व राशीच्या लोकांवर असून त्याचा प्रभाव आर्थिक स्थितीवर पहायला मिळेल. मेष राशीवर महत्त्वाची जबाबदारी वाढणार आहे. कर्क राशीच्या लोकांनी कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवावे. कुंभसाठी प्रवासाचा योग तर मीन राशीच्या जातकांची आर्थिक स्थिती ठिक असेल. चला तर करिअर आणि आर्थिक बाबतीत तुमचा दिवस कसा असेल ते पाहूया.
मेष आर्थिक राशिभविष्य : महत्त्वाची जबाबदारी मिळेल

मेष राशीच्या लोकांना आज करिअरच्या विषयांत लाभाचा दिवस आहे. तुमच्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाईल आणि त्यात तुम्हाला यश मिळेल. आज इतर कोणाताही विचार किंवा शंका मनात न आणता तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करावे. काम कोणतेही असो, ते यशस्वीरीत्या पूर्ण केले तर तुमचे मान होईल आणि तुमची विश्वासार्हता वाढेल.
वृषभ आर्थिक राशिभविष्य : किचकट कामे पूर्ण होतील

वृषभ राशीच्या लोकांना आजचा दिवस चांगला राहील आणि तुम्हाला यश प्राप्त होईल. एखादे किचकट काम पूर्ण झाल्याने तुम्ही आनंदी असाल आणि व्यापारातील अडथळे दूर होतील. कौटुंबिक जीवन चांगल्यापैकी व्यतित करायचे असेल तर जोडीदाराप्रति प्रामाणिक राहा आणि तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. आज महत्त्वाची कामे आधी पूर्ण करावीत.
मिथुन आर्थिक राशिभविष्य : व्यावसायिक संबंधातून लाभ

मिथुन राशीच्या लोकांना आजचा दिवस यशाचा आहे. तुम्ही तुमची किचकट कामेही सहजरीत्या पूर्ण कराल. एखादी महत्त्वाची समस्या तुमच्या वरिष्ठांच्या लक्षात येईल, त्यातून त्यांचे लक्ष तुमच्याकडे जाईल आणि तुम्हाला फायदा होईल. तुमच्यासाठी आज लाभाचा दिवस आहे, व्यावसायिक संबंधातून लाभ होईल.
कर्क आर्थिक राशिभविष्य : मोठी जबाबदारी येईल.

कर्क राशीच्या लोकांसाठी दिवस त्रासाचा असेल. तुमच्या एखादी मोठी जबाबदारी येऊ शकते. तुमचा जर व्यवसाय असेल तर हाताखालील कर्मचाऱ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवा अन्यथा नुकसान होऊ शकते. आर्थिक स्थिती ठिक असून त्यात हळूहळू सुधारणा होईल.
सिंह आर्थिक राशिभविष्य : जास्तीचे कष्ट करावे लागतील

सिंह राशीच्या लोकांना करिअमध्ये आजचा दिवस शानदार सिद्ध होईल, पण तुम्हाला तुमचे यश कायम ठेवण्यासाठी जास्तीचे कष्ट घ्यावे लागतील. तुमच्यावर टीकाही होऊ शकते. चांगला अधिकारी बनण्यासाठी आधी चांगला कार्यकर्ता व्हावे लागते, तरच तुम्हाला चांगले यश मिळू शकते.
कन्या करिअर राशिभविष्य : व्यापारात चढउतार, लक्ष द्या

कन्या राशीच्या लोकांना करिअरमध्ये लाभाचा दिवस आहे आणि तुम्हाला प्रत्येक कामात सहकार्य मिळेल. तुम्हाला तुमचे सहकारी आणि वरिष्ठ अधिकारी यांच्याशी जास्त सल्लामसलत करावी लागेल. व्यापारात जो चढउतार येत आहे, त्यावर लक्ष द्या आणि कारणे शोधा. यशस्वी होण्यासाठी तुम्हाला इतरांसोबत संवाद साधणे आणि चांगले संबंध ठेवणे या गोष्टी कराव्या लागतील.
तूळ आर्थिक राशिभविष्य : दिवस अस्वस्थ जाईल

तूळ राशीच्या लोकांना आजचा दिवस त्रासाचा आणि अस्वस्थतेचा जाईल. तुमचे कोणत्याही कामात मन लागणार नाही आणि धावपळ फार जास्त होईल. काही दिवसांपासून व्यवसायाची स्थितीही नाजूक आहे. व्यापारात काही चढउतार राहतील, पण ते फक्त तुमच्यासाठी नाहीत हे लक्षात ठेवा.
वृश्चिक आर्थिक राशिभविष्य : नव्या योजना यशस्वी होतील

वृश्चिक राशीच्या लोकांना लाभ होईल आणि तुम्हाला आज अचानक चांगली बातमी मिळेल. कार्यक्षेत्र आणि व्यवसायातील तणाव तुमच्यावर वरचढ ठरणार नाही, याची काळजी घ्या. तुमच्या नव्या योजना यशस्वी होतील, तसेच आज जुन्या कटकटींपासून दूर राहा. अधिकारी वर्गाशी सामंजस्य वाढेल. निराशजनक विचार मनात येऊ देऊ नका, वेळ अतिशय अनुकूल आहे.
धनू आर्थिक राशिभविष्य : धनवृद्धीचे वेगळे योग बनत आहेत

धनू राशीच्या लोकांना नवे लाभ होतील आणि नवीन संपर्कातून तुम्हाला यश मिळण्याचे योग आहेत. अडकलेले पैसे अडचणीतून तुम्हाला मिळतील. रोजच्या कामांबद्दल निष्काळजीपणा करू नका. व्यवसायात प्रगती झाल्याने आत्मविश्वास वाढेल. रात्रीच्या वेळी मंगलकार्यात जाण्याची संधी मिळेल. तुमच्यासाठी धनवृद्धीचे योग बनत आहेत.
मकर आर्थिक राशिभविष्य : कामावर लक्ष केंद्रित करा

मकर राशीच्या लोकांना आज धनवृद्धीचा दिवस आहे. तुमचा सन्मान वाढेल. ग्रहांच्या चालीमुळे भाग्यात वृद्धीचे योग आहेत. काही खरेदीविक्रीत तुम्हाला नफा होईल. शुभवार्ता दिवसभर मिळतील. मित्रांसोबत हस्यविनोदात वाढ होईल. अनावश्यक कटकटींपासून दूर राहा आणि कामावर लक्ष केंद्रित करा.
कुंभ आर्थिक राशिभविष्य : प्रवासाचे योग आहेत

कुंभ राशीच्या लोकांना आज लाभाच दिवस आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी असलेल्या घनिष्ठ संबंधाचा लाभ घेण्याची आज सुसंधी आहे. आयात, निर्यातीच्या व्यवसायाची सुरुवात करण्याचा निर्णय आज होऊ शकतो. आजचा दिवस धार्मिक कार्यात जाईल. तुमच्यासाठी प्रवासाचे योग आहेत. वेळेचा सदुपयोग करा, आज ग्रहांची साथ तुम्हाला आहे.
मीन आर्थिक राशिभविष्य : उधारी नको, पैसे परत मिळणार नाहीत

मीन राशीच्या लोकांना आज ज्ञानवृद्धीचा दिवस आहे आणि आज तुम्हाला सुख प्राप्ती होईल. प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील. अभ्यास आणि अध्यात्माच्या क्षेत्रात रुची वाढेल, त्यामुळे मन प्रसन्न होईल. वादग्रस्त प्रकरण संपतील. गुप्तशत्रू, इर्षेखोर मित्रांपासून सावध राहा. आज कोणालाही पैसे उधार देऊ नका, ते परत मिळणार नाहीत.