Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पारोळा- प्रतिनिधी | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे स्थगिती दिलेल्या वृक्ष लागवडीचे कामे सुरू करण्यासाठी बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात आले. याबाबत अधिक असे की पारोळा तालुक्यात मागिल काही दिवसामध्ये अंदाजित म.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत वैयक्तिक वृक्षलागवड च्या १०६७ शेतकऱ्यांच्या प्र.मा. वर्क ऑर्डर निघाली असुन सदर कामांचे मस्टर काही दिवसांपूर्वी झिरो करण्यांत आले होते . व नविन कामांना थांबविण्यात आले होते , त्यानुसार स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ८/१०/२०२१ रोजी निवेदन दिले होते , कामे सुरु न झाल्यास १४/१०/२०२१ रोजी रास्तो रोको करु असा इशारा दिला होता . त्या निवेदनाला गट विकास अधिकारी यांनी लेखी उत्तर १३ रोजी दिले होते त्यात म्हटले होते की , या पुढे मस्टर मागणी नुसार वृक्ष लागवडीचे मस्टर सुरु करण्यात येइल , त्यांनी लेखी उत्तर दिल्यामुळे शेतकरी संघटनेने आंदोलन मागे घेतले होते , काही दिवस काम सुरु करुन परत आता त्यांनी ग्रामसेवकांच्या सह्या आणा व मस्टर सुरु करा अशी अट घातली आहे . परंतु ग्रामसेवक राज्य संघटनेने वैयक्तिकवृक्ष लागवड या कामांवर बहिष्कार टाकल्यामुळे ग्रामसेवक मस्टरवर सह्या करीत नाहीत . त्यामुळे परत कामे बंद झालेली आहेत , ज्या वेळी मागिल निवेदनं दिले गेले त्या वेळी सुध्दा हाच प्रश्न होता . म.गट विकास अधिकारी यांनी कामे सुरु करण्याचे लेखी पत्र देऊन थोडे दिवस चालु ठेऊन परत कामे बंद करुन दिली आहेत . त्यांनी शेतकऱ्यांची फसवणुक केलेली आहे . त्यामुळे आम्ही सर्व शेतकरी यांनी पंचायत समितीच्या प्रांगणात ठिया मांडुन धरणे आंदोलन सुरू केले.यावेळी ग्रामसेवक आणि मस्टरवर सह्या करण्याचं ग्रामसेवक संघटनेतर्फे भोसले यांनी मान्य केले. म्हणून या आंदोलनातून मार्ग निघाला.व गट विकास अधिकारी यांनी उद्यापासून मास्टर सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनाला या, मंत्री डॉ,सतीश पाटील यांनी ही भेट देऊन अधिकार्यांशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले व उद्यापर्यंत मार्ग न निघाल्यास मी स्वता तुमच्या बरोबर उपोषणाला बसेल असे आश्वासन दिले,आंदोलनाला शिवसेनेचे आमदार चिमणराव पाटील यांनीही भेट देऊन ग्रामसेवक संघटनेला व त्यातून मार्ग काढायला सांगितले आंदोलनाला ग्राम रोजगार सेवक संघटनांने पाठिंबा दिला. पारोळा काँग्रेस वंचित बहुजन आघाडी यांनी हि पाठिंबा दिला,यावेळी माजी आमदार डॉक्टर सतीश पाटील यांनी ग्राम विकास अधिकारी यांना दूरध्वनीवरून यातून मार्ग काढण्याची सूचना केली,आमदार चिमणराव पाटील यांनी उपोषणाला भेट देऊन जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करून चर्चा केली, व ग्रामसेवक संघटनेला सह्या करण्यासाठी प्रोत्साहित केले. व गटविकास अधिकारी यांना उद्यापासून मस्टर वर सह्या करण्याच्या सूचना केल्या.स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष वाल्मीक पाटील, किशोर पाटील,ग्रामसेवक संघटनेकडून भोसले आप्पा, सुनील आप्पा , शिवसेना तालुकाध्यक्ष आर बी पाटील, सुधाकर पाटील, पिंटू भाऊ,डॉ राजेंद्र पाटील, गोकुळ भाऊ चौधरी, ईश्वर मोरे, विनोद पाटील, बी एन पाटील, मधुकर पाटील, हरिभाऊ पाटील, नामदेव पाटील,दत्तू नाना ,पोपट पाटील ,अनिल पाटील,समाधान मगर, राजू जाधव,महेंद्र पाटील,भैय्या पाटील, नंदलाल पाटील,गुलाब नाना,सुनील वाणी,नरेंद्र गिरासे,रावसाहेब गिरासे,चेतन पाटील,सतीश संदांशिव,रमेश संदांशिव,छोटू महाजन,संजय पाटील,नंदकिशोर महाजन,विनोद पाटील,संजय पाटील,सुशील पाटील,मोतीलाल पाटील,दिलीप पाटील यांच्यासह तालुक्यातील अनेक शेतकरी यावेळी उपस्थित होते,