Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

श्री संताजी महाराज जयंतीनिमित्त पारोळ्यात गुणगौरव समारंभ व मान्यवरांचा सत्कार

17

प्रतिनिधी : पारोळा | तेली समाजाचे आराध्य दैवत ग्रंथकार श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रदेश तेली महासंघ व युवक महासंघ वतीने तालुक्यातील तेली समाजाचे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा विविध मान्यवरांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.राष्ट्रीय महामार्ग 6 वरील नव्या तेली भवनात 8 डिसेंबर दुपारी चार वाजता हा कार्यक्रम होत आहे. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून माजी आमदार शिरीष चौधरी, बीडचे नगराध्यक्ष डॉ भारतभूषण शीरसागर, प्रदेश तेली महासंघाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी, जिल्हाध्यक्ष के डी चौधरी, जिल्हा अध्यक्ष महिला निर्मला चौधरी सह विविध पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमासाठी नाव नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनी पालकांनी उपस्थित राहावे तसेच आमंत्रित मान्यवरांनी व समाज बांधव यांनी उपस्थित राहावे असे प्रदेश तेली महासंघाचे तालुका अध्यक्ष भागवत चौधरी, शहराध्यक्ष प्रवीण चौधरी व कार्यकारिणीने केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.