Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Today Horoscope आजचे राशीभविष्य १२ फेब्रुवारी २०२२ : मिथुन राशीत चंद्राचा संचार,जाणून घेऊया आजचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील

6

शनिवार १२ फेब्रुवारी रोजी चंद्र मिथुन राशीमध्ये संचार करेल. सूर्य आज रात्री उशिराने मकर राशीमधून निघून कुंभ राशीत प्रवेश करेल. ग्रहांच्या स्थितीत होणाऱ्या या बदलांमुळे सर्व राशीतील व्यक्तींच्या जीवनावर परिणाम होईल. विशिष्ट ग्रह स्थितीमुळे आजचा दिवस कर्क राशीतील व्यक्तींसाठी अनुकूल राहील. इतर राशीतील व्यक्तींसाठी आजचा दिवस कसा असेल हे जाणून घेण्यासाठी पाहुयात आजचे सविस्तर राशीभविष्य.

मेष :
या राशीतील व्यक्तींच्या घरामध्ये प्रेम आणि समजूतदारपणा पाहायला मिळेल. आज तुम्ही एखाद्या रिसर्च प्रोजेक्टवर काम करू शकता. व्यापाराशी संबंधित व्यक्तींनी आपली कामे इमानदारीने करावीत. कोर्टकचेरीच्या कामातून आज तुमची सुटका होऊ शकते. जर तुम्ही परदेश प्रवासाचा विचार करत असाल तर लवकरच त्या दिशेने पावले उचलावीत. आज तुम्ही आपली कर्तव्ये योग्य वेळेवर पार पाडू शकाल. आज नशीब तुम्हाला 60 टक्के साथ देईल. आपल्या आई-वडिलांचा आशीर्वाद घ्यावा.

वृषभ :
वृषभ राशीतील व्यक्तींना शुभवार्ता ऐकायला मिळेल. एखाद्या सन्माननीय व्यक्तीकडून तुम्हाला मार्गदर्शन लाभेल. धनलाभाचे नवे स्रोत सापडतील. लहान मोठ्या प्रलोभनांपासून लांब राहणे फायद्याचे ठरेल. वडिलोपार्जित संपत्तीशी संबंधित एखादा खटला लांबणीवर पडला असेल तर आज तुमच्या बाजूने निर्णय लागण्याची शकता आहे. आपल्या संपत्ती विषयी गर्वाची भावना तुमच्या मनात निर्माण होईल. बऱ्याच काळापासून अडलेल्या गोष्टी आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. आज नशीब तुम्हाला 85 टक्के साथ देईल. गायीला हिरवा चारा खाऊ घाला.

मिथुन :
व्यक्ती स्वतःसाठी वेळ काढण्यात यशस्वी होतील. नात्यातील दृढ विश्वासामुळे नातेसंबंध सुधारण्यास मदत होईल. शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित व्यक्तींसाठी आजचा दिवस शुभ आहे. आज तुम्हाला योग्य उत्पन्न मिळेल. तुम्ही यश आणि कीर्ती मिळवण्यात यशस्वी व्हाल. झटपट यशप्राप्ती करण्यासाठी चुकीची कामे करणे टाळावे. आज नशीब तुम्हाला 82 टक्के साथ देईल. लक्ष्मी मातेची पूजा करा.

कर्क :
कर्क राशीतील व्यक्तींना आपले म्हणणे मांडण्याची संधी मिळेल. एखाद्या कौटुंबिक सदस्यामुळे तुमच्या प्रतिष्ठेत वाढ होईल. प्रगतीसाठी नवीन मार्गांचा शोध घेण्याची गरज आहे. आज तुम्ही आपली योग्यता सिद्ध करण्यासाठी उत्तम संधीचा लाभ घ्याल. प्रॉपर्टी डीलरसाठी आजचा दिवस लाभदायक ठरेल. अनावश्यक खर्चाला आळा घाला. आज नशीब तुम्हाला 72 टक्के साथ देईल. वरिष्ठ आणि गुरूजनांचे आशीर्वाद घ्या.

सिंह :
या राशीतील व्यक्तींनी इतर व्यक्तींचेही म्हणणे ऐकून घेणे गरजेचे आहे. अधिकारी वर्गाशी ओळख वाढवाल. आज तुम्ही इतरांना दिलेले पैसे परत मिळू शकतात. अनावश्यक खर्च करणे टाळा. कामाच्या ठिकाणी तुमच्यासाठी अनुकूल बदल घडून येतील. एखाद्या मोठ्या कार्यक्रमात मित्रांचे सहकार्य लाभेल. आपल्या जोडीदारासोबत मिळून एखादी नवी योजना बनवू शकता. आज नशीब तुम्हाला ९२ टक्के साथ देईल. श्री गणेशाला लाडवांचा नैवेद्य दाखवा.

कन्या :
व्यक्तींचा दिवस आनंदात जाईल. जाणकार किंवा वरिष्ठ व्यक्तींसोबत काम करण्याची संधी मिळाल्यास अवश्य लाभ घ्यावा. आज व्यापारी वर्गाने विचारपूर्वक काम करण्याची गरज आहे. आर्थिक समस्या कमी होतील. सामाजिक कार्यात एखाद्याला मदत केल्याने तुमचे कौतुक केले जाईल. आज नशीब तुम्हाला ८४ टक्के साथ देईल. शिवचालीसा वाचा.

तूळ :
व्यक्तींनी राजकारणापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. आज तुमच्या मनात नवीन गोष्टी करण्याचा उत्साह असेल. खानपानाशी संबंधित व्यवसाय असणाऱ्या व्यक्तींसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. विद्यार्थ्यांना आपल्या गुरूकडून सहकार्य लाभेल. एखाद्या व्यक्तीवर गरजेपेक्षा अधिक विश्वास ठेवणे घातक ठरू शकते. आज तुम्हाला नशीबाची ८५ टक्के साथ लाभेल. सरस्वती मातेची पूजा करा.

वृश्चिक :
व्यक्तींच्या उदारपणामुळे अनेक व्यक्ती प्रभावित होतील. नवीन दागिन्यांची ऑनलाईन खरेदी करण्याची संधी लाभेल. झटपट पैसे कमावण्यासाठी एखाद्या चुकीच्या योजनेत पैसे गुंतवणे टाळा. अभ्यासात तुम्ही उत्तम प्रगती कराल. विवाहित व्यक्तींना अपत्य सुख लाभेल. आज तुम्हाला नशीबाची ९५ टक्के साथ लाभेल. पांढऱ्या रंगाच्या वस्तू दान करा.

धनु :
धनु राशीतील व्यक्तींनी आज आपल्या दैनंदिन दिनचर्येत बदल करण्याचा प्रयत्न करावा. आपल्या आवडत्या एखाद्या छंद किंवा कलेत नैपुण्य मिळवण्याचा प्रयत्न करा. आज तुम्ही एखादे नवीन काम करण्याचा विचार कराल. आर्थिक कामात लक्ष घातल्याने मन शांत राहील. दुकानाशी संबंधित चिंता कायम राहतील. आज तुम्हाला नशीबाची ७२ टक्के साथ लाभेल. शिवलिंगावरती दुधाचा अभिषेक करा.

मकर :
या राशीतील व्यक्तींनी नव्या उमेदीने आजच्या दिवसाची सुरुवात करावी. वर्क फ्रॉम होम करणाऱ्या व्यक्तींची कामे आज अगदी योग्य वेळेत पूर्ण होतील. रियल इस्टेटशी संबंधित व्यक्ती डिस्काउंट देऊ शकतात. आपल्या व्यापारात काही बदल करण्यापूर्वी वरिष्ठ व्यक्तींकडून मार्गदर्शन अवश्य घ्यावे. घरामध्ये नवीन पाहुण्यांच्या आगमनाची सूचना मिळू शकते. आज तुम्हाला नशीबाची ८५ टक्के साथ लाभेल. गणपतीला मोदकांचा नैवेद्य दाखवा.

कुंभ :
आज तुम्ही बारीकसारीक गोष्टींमुळे चिडचिड करणे टाळायला हवे. एखाद्या विशेष गोष्टीबाबत आज तुमचे मत बदलू शकते. जर तुम्ही ऑनलाईन व्यापार करत असाल तर व्यापार विस्तारासाठी नवीन योजना बनवणे आवश्यक आहे. पूर्वी अर्धवट राहिलेल्या योजनेवर काम करता येईल. आज तुम्हाला नशीबाची ९५ टक्के साथ लाभेल. मुंग्यांना पीठ खाऊ घाला.

मीन :
आज तुमचा दिवस आनंदात जाईल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल. तसेच उत्पन्नात वाढ करण्यासाठी अनेक संधी देखील आज मिळू शकतात. सामाजिक स्तरावर नेटवर्किंगचा लाभ मिळेल. कुटुंबामध्ये तुमच्या सकारात्मक वर्तनामुळे लोकं प्रभावित होतील. आज तुम्हाला नशीबाची ९२ टक्के साथ लाभेल. मारुतीला शेंदूर अर्पण करा.

ज्योतिषमित्र चिराग दारूवाला ( मुलगा बेजन दारूवाला )

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.