Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

जुगार व अवैध दारू अड्ड्या वर पुणे शहर सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा 5 लाख 26 हजार रुपयेच मुद्देमाल जप्त

4

पुणे,दि.१४:-पुणे शहरातील काही पोलिस ठाण्य हद्दीतील जुगार अड्डा सह अवैध धंदे पुणे शहरातील  खुलेआम पाहण्यास मिळत आहे तसेच लाॅटरीच्या नावाखाली सोरट, तसेच मटका,व तिकडम, विडिओ गेम,वर जुगार घेण्यात येत आहे तर काल सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा मध्ये उघड पाहण्यास मिळत आहे दर्शन रीव्हर साईड हाॅटेल, सांगवी स्पायसर रोड, सर्व्हे क्र्. १३/१/१, न्यु रीव्हर साईड, शितोळे पेट्रोल पंपाच्या पुढे, औंध, पुणे जुगार अड्ड्यावर  गुन्हे शाखेच्या  सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने छापा घातला.हाॅटेलमध्ये व हाॅटेलबाहेरील मोकळ्या जागेत बाईकवर सुरू असलेल्या पैशावर मटका, सोरट, पंकी पाकोळी, वगैरे जुगार गैरकारदेशीरीत्या खेळत व
जुगार घेणार्‍यांवर कारवाई करण्यात आली आहे.त्यात खेळणारे ४ जुगार खेळवणारे, ४ जुगार खेळणारे व पाहीजे आरोपी ९ (त्यात जुगारासह अवैध विदेशी दारूचा साठा व विक्री करणारे) असे एकुण १७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यांच्याकडून ५२ हजार८४० ची रोख रक्कम, रु. ३ लाख ७५ हजार रुपये किमतीचे ४ दुचाकी व १ चारचाकी वाहने, रु. ५१ हजार,२८४ रूपये किंमतीचा विदेशी दारूचा अवैध साठा, रु.९ हजार,२०० किंमतीची जुगार साधने त्यात जुगार साहित्यासह ६ टेबल्स, ६ खुर्च्या, १० सोफे), रु. ३८,५००/- किंमतीची एकुण १३ मोबाईल हॅंन्डसेट, एकुण रु.५ लाख २६ हजार ८२४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. घटना स्थळावरुन पळून गेलेले जुगार अड्डा मालक, विदेशी दारूचा साठा व विक्री करणारे मालक, मॅनेजर व इतर पाहिजे आरोपींची नांवे १) मोहम्मद झुलकार मजहर खान, धंदा जुगार अड्डा मालक व हाॅटेल चालक, २) प्रमोद रमेश धेंडे, वय सुमारे ४० वर्षे, धंदा जुगार अड्डा मॅनेजर व हाॅटेल चालक,३) नवल नहाडे, धंदा – जुगार मॅनेजर व हाॅटेल चालक, वय अंदाजे ३५ वर्षे, ४) चंद्रकांत कबीर जाधव, वय अंदाजे ३५ वर्षे, धंदा जुगार अड्डा मॅनेजर व हाॅटेल चालक, हाॅटेलमध्ये बसून जुगार खेळणारे आरोपी.५) विजयसिंग दलपतसिंग चौहान, वय-३० वर्ष, ६) सुरज प्रितीश साळुंखे, वय ३३ वर्षे, ७) संकेत नंदू कदम, वय २३ वर्षे, ८) फारुख सैफ खान, वय २३ वर्षे, ५) ईश्वर बाबुराव दामोदर, वय ३२ वर्षे, ९) लादे नागेश त्र्यंबक, वय २८ वर्षे, १०) सचिन सुभाष सीताफळे, वय ३० वर्षे, ८) मुगलअप्पा बसप्पा कानकुर्ती, वय ३५ वर्षे, ११) विजयसिंग दलपतसिंग चौहान, वय-३० वर्ष,१२) सुरज प्रितीश साळुंखे, वय ३३ वर्षे,
१३) संकेत नंदू कदम, वय २३ वर्षे,
१४) फारुख सैफ खान, वय २३ वर्षे,
१५) ईश्वर बाबुराव दामोदर, वय ३२ वर्षे, १६) लादे नागेश त्र्यंबक, वय २८ वर्षे,१७) सचिन सुभाष सीताफळे, वय ३० वर्षे, १८) मुगलअप्पा बसप्पा कानकुर्ती, वय ३५ वर्षे, अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत.दर्शन रीव्हर साईड हाॅटेल, सांगवी स्पायसर रोड,औंध, पुणे .मटका जुगार व अवैध दारू विक्री चालू असल्याची गोपनीय माहिती सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक यांना मिळाली. त्यानुसार, पोलीस पथकाने बुधवारी रात्री ११ वाजता येथे छापा घातला. त्यावेळी १७ असे घटनास्थळावरून पळून गेलेले पाच आरोपीत इसम.गुन्हा दाखल करण्यात आले आहे त्यांच्याकडून ५ लाख २६ हजार रुपयांचा माल जप्त केला.
जुगार खेळणारे तसेचष अवैध रीत्या विदेशी मद्याचा साठा व विक्री करणारे आरोपी मिळून आलेने, महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम ४(अ), ५ व १२ (अ) व महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ई) अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
सदर अटक/कारवाई केलेल्या आरोपीविरुद्ध चतुःश्रृंगी पोलिस स्टेशन येथे गु. र. क्र. ‌३११/२२, महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम ४ अ, ५ व १२ (अ) तसेच महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५(ई) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.गेल्या काही दिवसांपासून सामाजिक सुरक्षा विभागाकडून जुगार धाड सत्र सुरू असल्याने जुगार चालकांनी नविन शक्कल लढवून मोबाईल जुगार सुरू केला आहे. यात जुगार खेळणारे व खेळवणारे हे एखाद्या कारमध्ये, रिक्षात अथवा दुचाकी वर बसून खेळी कडून मटका आकडा, सोरट व रक्कमेची देवाण घेवाण करतात. पोलीस कारवाईची थोडी जरी खबर लागल्यास त्याच गाडीतून पसार होतात. पण आजच्या कारवाईत ज्या चारचाकी व दुचाकी वाहनांववरून घटनास्थळी मोबाईल जुगार खेळला जात होता ती वाहने सुद्धा जप्त करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे सदरचा जुगाराचा अड्डा मागील अनेक वर्षांपासून स्पायसर रोड जवळील औंध सांगवी नदी पुलाच्या अलीकडेच, सुरू होता. गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे, नदीकाठी पाण्याची पातळी वाढल्याने, सदरचा जुगाराचा अड्डा हा तेथेच असलेल्या दर्शन रीव्हर साईड हाॅटेलमध्ये व आसपासचे परीसरात सुरु करण्यात आला होता. या हाॅटेलमध्ये बेकायदेशीर जुगाराबरोबरच विदेशी दारूचा अवैध साठा व विक्री देखील सुरू होती. त्यामुळे जुगार कारवाई बरोबरच दारुबंदी कायद्यानुसारही कारवाई करण्यात येऊन, विदेशी दारुचाही सर्व साठा जप्त करण्यात आलेला आहे.सदर हाॅटेल चालकाकडे, नमुद हाॅटेल चालवणेबाबत, तसेच तेथे विदेशी मद्य साठवणे व विक्री करणेबाबत कुठल्याही प्रकारचा प्रशासकीय परवाना आढळून आलेला नाही.सदरची कारवाई अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर, संदीप कर्णिक, पोलीस सह आयुक्त, रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे व श्रीनिवास घाटगे, पोलीस उपायुक्त, गुन्हे यांचे आदेश व मार्गदर्शनखाली, सामाजिक सुरक्षा विभागाकडील व. पो. नि. राजेश पुराणिक, महीला पोलीस उप निरीक्षक सुप्रिया पंधरकर, मपोह शिंदे, मपोह मोहीते, पोना कांबळे, पोना बरडे, पोना ढापसे यांच्या पथकाने केली आहे.
विशेष म्हणजे मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांचे आदेशानुसार सदर कारवाईत परीविक्षाधिन पोलीस उपनिरीक्षकांचे एक पथकही सहभागी झाले होते.यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Leave A Reply

Your email address will not be published.