Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हायलाइट्स:
- महाराष्ट्रात घरगुती वीज मीटर होणार स्मार्ट.
- मुंबईसह प्रमुख महानगरांपासून होणार सुरुवात.
- ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले निर्देश.
वाचा: अजित पवारांचा ग्रामीण भागाला खूप मोठा दिलासा; घेतला ‘हा’ निर्णय
स्मार्ट मीटर योजनेबाबत मंत्रालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी याबाबत आज निर्देश दिले. राज्यात लवकरच घरगुती वीज ग्राहकांना अत्याधुनिक पद्धतीचे स्मार्ट मीटर देण्यासाठी राज्य सरकार पावले उचलत आहे. यासाठी काढण्यात आलेल्या निविदेत केंद्र सरकारने अलीकडेच जारी केलेल्या निर्देशानुसार दुरुस्ती करण्याच्या सूचनाही डॉ. राऊत यांनी दिल्या. या बैठकीस ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, महावितरणचे संचालक (संचालन) संजय ताकसांडे, उत्तम झाल्टे, महावितरणचे संचालक (वित्त) रविंद्र सावंत, महावितरणचे कार्यकारी संचालक अरविंद भादीकर उपस्थित होते.
वाचा: केंद्राला झटका; सहकाराचा विषय राज्यांकडेच, कोर्टाकडून ‘ती’ घटनादुरुस्ती रद्द
हे आहेत स्मार्ट मीटरचे फायदे…
मोबाइलच्या सिम कार्ड वापराप्रमाणे प्रीपेड आणि पोस्टपेड रूपात हे स्मार्ट मीटर उपलब्ध असतील. यामुळे ग्राहकांना आपल्या वीज वापरावर नियंत्रण ठेवता येईल. वीज वापरानुसारच बिल येईल तसेच प्री पेड मीटर मध्ये तर जितके पैसे जमा आहेत त्यानुसारच वीज वापरता येईल. परिणामी विजेची बचत होण्यास यामुळे फायदा होईल. स्मार्ट मीटरमुळे वीज बिलातील त्रुटी दूर होतील. अचूक बिल येईल. मीटरमध्ये फेरफार करून कुणी वीज चोरीचा प्रयत्न करीत असेल तर त्याची कल्पना मुख्यालयाला लगेच येऊन ती रोखणे शक्य होईल. यामुळे वीजचोरीस आळा बसेल. तसेच विजेचा काटकसरीने वापर करण्याला प्रोत्साहन मिळेल. स्मार्ट मीटरमुळे दूरस्थ पद्धतीने माहितीची देवाणघेवाण आणि वीजभाराचे व्यवस्थापन अगदी कमीतकमी वेळेत करता येईल. याचा फायदा म्हणजे ग्रीडचे व्यवस्थापन स्मार्ट पद्धतीने करता येईल. दूरस्थ पद्धतीने मीटर चालू किंवा बंद करता येईल ज्यामुळे खर्चावर नियंत्रण येईल. तसेच दूरस्थ पद्धतीने मीटरमध्ये संचित झालेला डेटा मुख्यालयात परिक्षणासाठी घेता येईल.
वाचा: पेगॅसस: ‘जेव्हा जेव्हा भारत पुढे जातो, तेव्हा तेव्हा असे कट शिजतात’
जीवनप्रकाश योजनेची व्याप्ती वाढवणार
अनुसूचित जाती व जमातीतील ग्राहकांना नाममात्र दरात वीज जोडणी देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनप्रकाश योजनेची व्याप्ती वाढविण्यासाठी पावले उचलण्याचे निर्देशही डॉ. राऊत यांनी आज या विषयावर झालेल्या बैठकीत दिले. गरजूंना नाममात्र अनामत रक्कम जमा करून वीज जोडणी देणारी ही योजना केवळ दोन समाजापुरती मर्यादित न राहता सर्वसमावेशक करायला हवी. यासाठी प्रस्ताव तयार करून सादर करा, असे निर्देश डॉ. राऊत यांनी सर्व संबंधितांना दिले.
वाचा: राज कुंद्राची कंपनी कशी करत होती तरुणींची फसवणूक? पोलिसांचा खळबळजनक खुलासा