Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
जागर मुंबईचा अभियानांतर्गत १४ वी सभा माहीम विधानसभेत प्रभादेवी येथे आज पार पडली. त्यावेळी आशीष शेलार बोलत होते. ते म्हणाले, ‘प्रभादेवी मंदिरासमोर सापडलेला अन्य धर्मीयांचा दगड आमच्या मंदिराच्या दरवाज्यात तुमच्या नगरसेविकेने का ठेवला?, माहिमचं दत्त मंदिर पुनर्निर्माण करण्याऐवजी ते तोडलं पाहिजे अशी नोटीस निघते कशी? कोरोना काळात याकूब मेमनच्या थडग्याचं सुशोभीकरण केले जाते. दाऊदशी संबंध असणारे नवाब मलिक यांच्या मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळात बसतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांकडे पुरावे मागितले जातात.’
‘मुस्लीम मतांसाठी लांगुलचालन सुरू आहे’
श्रद्धा वालकरने महाराष्ट्र पोलिसांना पत्र लिहिले होते. पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. पोलिसांनी टेबलवर सेटलमेंट केली. तिला तक्रार मागे घ्यायला लावली. त्याला एक महिना उशीर लावला. त्यावर दबाव कुणाचा होता? मनामध्ये प्रश्न येतो की, ती वालकर होती म्हणून तर तिच्यावर दबाव नव्हता ना की, तो आफताब होता म्हणून पोलिसावर दबाव नव्हता ना? ,उद्धव ठाकरे त्यावर एक चकार शब्द काढला तयार होत नाहीत. केवळ मुस्लिम मतासाठी हे लांगुलचालन सुरू आहे. ग्यानव्यापी मशिदीच्या बाबतीत उत्खनन झाले पाहिजे तरी उद्धवजी स्वागत करायला तयार नाहीत. बाळासाहेबांची शिवसेना मर्दाची भाषा करायची उद्धव ठाकरे यांची शिवसेना मुस्लिम मतांसाठी हिरव स्वप्न पडल्याची भाषा करते.
‘कटोरा घेऊन पुढे पुढे करणारी उद्धवजी यांची शिवसेना’
२०१९ च्या आधी शिवसेनेने काँग्रेसबरोबर जाणार होते ते भाजपाला संपविण्यासाठी ना? लाल किल्ल्यावर गेलेल्या बांधवांना भेटून मोदींना संपविण्याचा प्रयत्न तुम्ही केली ना? भाजपाला संपविण्यासाठी शिवसेनेने खोदलेल्या खड्ड्यात ती स्वतः पडली. काँगेस आणि राष्ट्रवादीबरोबर भाजपाला संपविण्यासाठी गेला ना? पृथ्वीवर एकच पक्ष असा आहे ज्याला आत्मपरीक्षण करता येत नाही तो म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष..स्वतःची चूक यांना दिसत नाही. उरलेली शिवसेना उसनवारीची आहे. ती मुंबईचं करू शकत नाही. आदित्य ठाकरे कटोरा घेवुन बिहारला भिक मागायला गेले. कटोरा घेवुन पुढे पुढे करणारी उद्धवजी यांची शिवसेना आहे. गाफील राहू नका. या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी एका मंचावर यायला आम्ही तयार आहोत.
आमदार आशीष शेलार म्हणाले, २२ ऑक्टोबरला सामनामध्ये मराठी मुस्लिमांचे आम्ही स्वागत करत आहोत असे लिहिले गेले. आम्ही कुठल्याही धर्माच्या, जातीच्या विरोधात नाही आहोत. आम्ही ‘सबका साथ सबका विकास’ आहोत. तुष्टीकरण्याच्या आणि लांगुलचालनाच्या विरोधात आम्ही आहोत. मुस्लिम मराठी अशी मांडणी केली जात आहे. मराठी गुजरातीला विरोध का? मराठी जैनच्या विरोधात उभे का राहता? मराठी उत्तर भारतीय तुम्हाला का चालत नाहीत? मराठी हिंदू या शब्दांशी तुमचे वैर का आहे? असा सवाल ॲड. आशीष शेलार यांनी केला.
ते पुढे म्हणाले, प्रत्येक वार्डात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून मराठी आणि मुस्लिम मताचं गणित जुळवलं जात आहे. सलग २५ वर्ष राज्य करून तुम्हाला जाती धर्माच्या आधारावर मतं मागण्याची वेळ का आली? केलेल्या कामाच्या आधारावर मतं मागा? सांगा तुम्ही किती प्रकल्प केले, रस्ते बांधले, किती शाळा बांधल्या? यातील काहीही त्यांना सांगता येत नाही. मुंबई महापालिकेची सत्ता हातातून जात असल्याने शेवटचा डाव हा रडीचा म्हणजेच कलीचा डाव खेळला जात आहे. जाती आणि धर्माच्या आधारावर मतं मागण्याचा कार्यक्रम हा अजेंडा उद्धव यांच्या शिवसेनेचा आहे. मराठी आणि मुस्लिमांना फसवण्याचे काम सुरू आहे. हिंदू मराठी आणि मुस्लिम मते भारतीय जनता पार्टीला मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.आम्ही कुठल्याही धर्माच्या, जातीच्या विरोधात नाही आहोत. आम्ही ‘सबका साथ सबका विकास’ आहोत. तुष्टीकरण्याच्या आणि लांगुलचालनाच्या विरोधात आहोत. हिंदुंमध्ये तट पाडण्याचे काम सुरू आहे ते कधीही यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा आमदार आशीष शेलार यांनी दिला.