Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
शरद पोंक्षे यांची फेसबुक पोस्ट काय?
“बदल स्वागतार्ह. काही दिवसांपूर्वी लग्नातल्या मंत्रांची टिंगल करून खिदळणाऱ्या मंत्र्यांच्या घरातल्या लग्नात मंत्र म्हटले असतील का? मंगलाष्टक म्हणून अक्षता टाकणारे नेते दिसले, म्हणून ही शंका आली” अशा शब्दात शरद पोंक्षे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून अमोल मिटकरी आणि जयंत पाटील यांना टोले लगावले आहेत.
अमोल मिटकरी काय म्हणाले होते?
सांगलीतील इस्लामपूरमध्ये झालेल्या सभेत बोलताना राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक किस्सा सांगितला होता. “मी एका लग्नाला गेलो, त्यावेळी कन्यादान सुरु होतं. मी म्हटलं अन्नदान ऐकलंय, नेत्रदान ऐकलंय, रक्तदान ऐकलंय. कन्या हा काय दान करण्याचा विषय असतो का? म्हणे असतो ना… नवरदेव पीएचडी, नवरी एमए झालेली. लग्न लावणारे महाराज म्हणत होते तुमचा आणि तुमच्या पत्नीचा हात माझ्या हातात द्या. म्हणा ‘मम भार्या समर्पयामी’ मी नवरदेवाच्या कानात कुजबुजलो, अरे येड्या, ते महाराज म्हणतायत, मम म्हणजे माझी.. भार्या म्हणजे बायको… आणि समर्पयामी म्हणजे घेऊन जा… आरारारा.. कधी सुधरणार” अमोल मिटकरींनी नकलेसह भाषण रंगत आणली होती.
हेही वाचा : राज ठाकरे अमित ठाकरेंसह करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनाला
नुकतेच जयंत पाटील यांचे सुपुत्र प्रतीक पाटील विवाहबंधनात अडकले. इस्लामपूरमध्ये अत्यंत शाही विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्याला राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती.
हेही वाचा : मंगलप्रभात लोढा यांच्याकडून शिंदेंच्या बंडाची शिवरायांच्या आग्र्यातील सुटकेशी तुलना!