Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

लग्न सोहळ्याहून येताना बसशी जोरदार धडक, चौघा वऱ्हाड्यांचा मृत्यू, कारचा चक्काचूर

44

यवतमाळ (प्रतिनिधी) : नातेवाईकांकडील लग्न सोहळा आटोपून यवतमाळला परत येत असलेल्या वऱ्हाडींच्या कारला भीषण अपघात झाला. यामध्ये चौघा प्रवाशांना जागीच प्राण गमवावे लागले, तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. टाटा टियागो कार आणि बस यांची धडक इतकी भीषण होती, की कारचा अक्षरशः चुराडा झाला. या दुर्दैवी अपघातामुळे लग्नघरावर शोककळा पसरली आहे.

टाटा टियागो कार आणि बस यांचा लोणी येथे भीषण अपघात झाला आहे. यामधे एकूण चार जणांचा मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमधे यवतमाळ येथील मायलेकासह वाशिम जिल्ह्यातील मायलेकीचा समावेश आहे.

अमरावती जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यामधील वडुरा येथील गणेश रीते यांच्या मुलाचा लग्न सोहळा आटोपून यवतमाळकडे येत असलेल्या टाटा टियागो (कार क्रमांक एम एच २९ बीसी ९१७३) ला विरुद्ध दिशेने येणारी राळेगाव डेपोची बस (क्रमांक एम एच ०६ एस ८८२६) ने जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, कारचा अक्षरशः चुराडा झाला. घटनास्थळी रक्ताचा सडा पसरला होता.

मृतक रजनी अशोक इंगोले (वय ५० वर्ष) भंडारा येथे जलसपंदा विभागात कार्यरत असलेले राधेश्याम अशोक इंगोले (वय ३० वर्ष, रा. रूपनगर यवतमाळ) या मायलेकाचा जागीच मृत्यू झाला. तर वैष्णवी संतोष गावंडे (वय २० वर्ष) आणि सविता संतोष गावंडे (वय ४० वर्ष, रा. ता. कन्हेरगाव जिल्हा वाशिम) या मायलेकीचा यवतमाळ येथे उपचारासाठी जात असताना वाटेत मृत्यू झाला.

कारमधील प्रमोद पांडुरंग चौधरी (४५), सरिता प्रमोद चौधरी (३५), साक्षी प्रमोद चौधरी (१८) सर्व रा. पिंपळगाव ता. पुसद हे गंभीर जखमी झाले आहेत. या मधील दोघांना उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले आहे.

हेही वाचा : घडले ते धक्कादायक! पुण्यातील पर्यटक दापोलीत फिरायला गेला, कपड्यांना वाळू लागली म्हणून समुद्रात धुवायला गेला आणि…

विरुद्ध दिशेने येणाऱ्या राळेगाव डेपोच्या बसमधील प्रवासी सुद्धा यात किरकोळ जखमी झाले आहेत. यामधे राजेंद्र यशवंत कडे (४४), अनिता राजेंद्र कडे (३८), जान्हवी राजेंद्र कडे (१५) सर्व रा. मसली ता. काटोल जिल्हा नागपूर, शोभा श्रावण काळे (६०) रा. मोझर ता. नेर, कृष्णा रामचंद्र तोडसाम (५८), रेणुका कृष्णा तोडसाम (५०) ढोकी ता. केळापुर जि. यवतमाळ, सचिन शेंद्रे (४०) रा. यवतमाळ यांचा समावेश आहे.

हेही वाचा : अमरावतीत १०० हून अधिक नागरिकांना अन्नातून विषबाधा, अचानक होऊ लागल्या उलट्या, अतिसाराचा त्रास

घटनेची माहिती मिळताच ठाणेदार रामकृष्ण जाधव, पोलीस उपनिरीक्षक गणेश हिरुळकर, दीपक बदरके, सुरेश सदने, राजेश चौधरी, गजानन पत्रे, नरेंद्र सूर्यवंशी, सचिन ठाकरे, सय्यद अनिस यांनी घटनास्थळ गाठून मृतकांना बाहेर काढत जखमींना तत्काळ नेर ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. नेर पोलिसांनी दोन्ही वाहने ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करीत पुढील तपास ठाणेदार रामकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनात सुरू केला आहे.

हेही वाचा : लोहगडावर फिरणे पडले महागात!, पेण येथील विद्यार्थ्यांची बस ४० फूट खोल दरीत कोसळली

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.