Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

संत सेवालाल यांचे कार्य आजही प्रासंगिक –  राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

15

मुंबई दि. ७ : थोर संत सेवालाल महाराज यांनी तीनशे वर्षांपूर्वी पाण्याचा अपव्यय न करण्याचा तसेच पाणी जपून वापरण्याचा दिलेला विचार आजच्या युगात विशेष प्रासंगिक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी (दि. ७) बंजारा भाषेतील संत मारो सेवालाल या चित्रपटाच्या पोस्टर, माहितीपत्रक व टीजरचे  राजभवन येथे प्रकाशन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

देशातील आदिवासी, वनवासी तसेच बंजारा समाजाचे देशाच्या विकासात फार मोठे योगदान आहे. समाजाने पर्यावरण, वृक्ष संवर्धन व औषधी वनस्पतींच्या उपयोगाचा मार्ग दाखवला, असे राज्यपालांनी सांगितले. बंजारा समाजाच्या पारंपरिक ज्ञानाचा समाजाने उपयोग केला पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले.

संत सेवालाल महाराज यांनी बंजारा समाजाला उत्तम जीवन जगण्याचा मार्ग दाखवला व समाज उद्धाराचे काम केले. ‘एक दिवस पाणी मोल देऊन विकत घ्यावे लागेल’ असा इशारा त्यांनी तीनशे वर्षांपूर्वी दिला होता, असे चित्रपटाच्या सहनिर्मात्या दिपाली भोसले सय्यद यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाला संत सेवालाल यांचे वंशज महंत जितेंद्र महाराज, लेखक-दिग्दर्शक अरुण मोहन राठोड, जितेश राठोड तसेच चित्रपटातील कलाकार व तंत्रज्ञ उपस्थित होते.

००००

Maharashtra Governor launches Poster and Teaser of Banjara film on Sant Sevalal Maharaj

Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari released the Poster, Brochure and Short Teaser of the Banjara language film ‘Sant Maro Sevalal’ at Raj Bhavan Mumbai on Wed (7 Dec). The film based on the life and message of the 18th century Saint, Sevalal Maharaj gives the message of conserving water.

Descendant of Sant Sevalal Maharaj Mahant Jitendra Maharaj, co-producer of the film Deepali Bhosale Sayyad, Director and Writer Arun Rathod, Jitesh Rathod and cast and crew of the film were present on the occasion.

००००

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.