Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
खोपोली हद्दीमध्ये हा अपघात झाला असून. विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू असून पोलिस घटनास्थळी रवाना झाले आहेत. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून स्थानिक आणि पोलिसांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. चेंबूरमधील एका क्लासचे विद्यार्थी सहलीसाठी खोपोलीला आले होते. विद्यार्थ्यांची सह वेट एँण्ड जॉयला गेल्याची माहिती आहे.
क्लिक करा आणि वाचा- पंतप्रधान मोदींच्या हस्ते ‘समृद्धी’चे लोकार्पण, उद्धव ठाकरेंचे टीकास्त्र; वाचा, टॉप १० न्यूज
कसा झाला अपघात?
ही बस खासगी क्लासेसचे विद्यार्थी घेऊन जात होती. त्यामध्ये सुमारे ३०-३५ विद्यार्थी होते. या अपघातात त्यांपैकी २०-२५ विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. काही वेळापूर्वी हा अपघात झाला असून रायगड जिल्ह्यात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ही बस मुंबईच्या दिशेने येत होती. त्यावेळी बसच्या वाहकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि काही कळण्याच्या आत ही बस उलटली.
क्लिक करा आणि वाचा- मंत्री गिरीश महाजन यांनी नाव न घेता मंदा खडसेंवर केला मोठा आरोप, थेट म्हणाले…
बचावकार्य सुरू
या भीषण अपघातानंतर माहिती मिळताच लागलीच बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. दरम्यान, या अपघातामुळे मुंंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात घडला त्या परिसरात वाहतूक कोंडी झाली आहे. ही वाहतूक कोंडी दूर करण्याचेही काम सुरू करण्यात आले आहे.
क्लिक करा आणि वाचा- धक्कादायक! धावत्या गाडीतून १० महिन्यांच्या मुलीला फेकले; विनयभंग झाल्याचाही पीडित महिलेचा आरोप